दिवसभरात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे भावनानुभव येतात . त्यातील काही अनुभव सुखद तर काही अनुभव दुःखद असतात . मानसिक स्वास्थ्यासाठी स्वत : च्या भावना स्वीकारा. अगदी राग , भीती , आक्रमता , हेवा , तिरस्कार या स्वत : च्या भावनासुद्धा मान्य करा . कारण दुसऱ्यांचा राग येणे , कधीतरी हेवा वाटणे हे नैसर्गिकच आहे . तेव्हा त्या भावना टाळण्याचा किंवा दडपून टाकण्याचा प्रयत्न करू नका . मात्र त्या भावनांच्या आहारी जावू नका . त्यांना चिकटून राहू नका . भावना सतत दडपण्याची सवय लागली, तर नंतर कधीतरी त्या विकृत रूपात उफाळून येण्याची किंवा भावनांचा उद्रेक होण्याची शक्यता असते . तेव्हा भावतरंग उमटू द्या. भावना नियंत्रित प्रमाणात व योग्य पद्धतीने व्यक्त करता आल्या पाहिजेत. मानसिक स्वास्थ्यासाठी एक भावना अत्यावश्यक असते. ती म्हणजे प्रत्येक दिवशी थोडेतरी मनमोकळे हसावे. आनंद व समाधान ही मानसिक स्वास्थ्याचा प्राणवायू आहे. हल्ली बऱ्याच मोठ्या शहरांतून हास्य क्लब ' सुरू झाले आहेत हे तुम्हाला माहितच असेल. हसण्यामुळे चेहऱ्याचे स्नायू, श्वसन संस्था व पचनसंस्था यांना चांगला व्यायाम मिळतो. तसेच हसण्याने जे जैवरस स्त्रवतात ते शारीरिक व मानसिक स्वास्थ्याला पोषक असतात, असे काही शास्त्रज्ञांनी संशोधनाअंती सांगितले आहे. म्हणून रोज आनंद , सुख या भावना जरूर अनुभवा. शिवाय तुम्ही हसतमुख असलात तर तुमचा सहवास इतरांना प्रिय वाटतो. तुमच्याबरोबर राहून तेही आनंदी होतात. हसतमुख राहायचे की स्वत : च्या दुःखाचे, तक्रारींचे रडगाण गात राहायच हे तुमच्याच ( हातात ) इच्छेवर अवलंबून असत . यासंदर्भात कवी मंगेश पाडगावकरांची एक छान कविता आहे.
सांगा ! कस जगायचं ?
कण्हत, कण्हत की गाण म्हणत
तुम्हीच सांगा !
No comments:
Post a Comment