तुम्हाला तुमचे आयुष्य घडवायची प्रामाणिक इच्छा असेल तर तुम्ही आपल्या पध्दतीने आयुष्य घडवू शकता. ही गोष्ट अविश्वसनीय वाटत असली तरी सत्य नक्कीच आहे. आयुष्य घडविणे याचा अर्थ आपले आयुष्य आपल्या नियंत्रणाखाली ठेवणे आणि आपले ध्येय, आपल्या इच्छा-आकांक्षा यांना आपल्या पध्दतीने आकार देणे.
याचा आणखी एक अर्थ असा की आपल्या आयुष्यातील दु:खद घटना योग्य रीतीने हाताळणे. जीवनातील औदासीन्य, अपयश, नाकारलेपण याची तिव्रता कमी करण्यासाठी स्वत:च प्रयत्न करणे.
बबीताने पदवीपर्यंत शिक्षण घेतले आणि त्यानंतर मात्र पुढील आयुष्यात काय करावे या विचाराने ती गोंधळून गेली. विवाह, उच्च शिक्षण, की नोकरी यापैकी कोणता मार्ग स्वीकारावा हे प्रश्नचिन्ह तिच्यासमोर उभे राहिले.
विवाह केला तर नवरा कसा मिळेल? प्रेमळ, श्रीमंत, सुंदर याची कल्पना करता येत नव्हती. नोकरीचा विचार करू लागल्यावर आपल्याला कोणती नोकरी मिळेल? ती मिळवायची कशी? त्यापासून आपल्याला त्यात रस वाटेल की नाही, अशा अनेक शंका तिच्या मनात येत होत. उच्च शिक्षणासंबधीही अनेक विचार मनात धैमान घालत होते. या वैचारीक गुंत्यातून बाहेर पडण्यासाठी ति माझ्याकडे आली आणि पुढील दोन महिन्यांच्या कालावधीत तिने आपल्या आयुष्याबद्दलचे निर्णय ठामपणे घेतले.
रमी ही चौदा वर्षाची मुलगी! तिचे व तिच्या आईवडिलांचे सतत खटके उडत. आईवडिल दोघेही त्याबद्दल तिलाच दोष देत. आई तर निष्कारण तिच्या अगांवर खेकसत असे आपल्या सांगण्याबरहुकूम तिचे वागणे नसेल तर आई आत्महत्येची धमकीही देई पालकांच्या अशा पध्दतीच्या वागणुकीमुळे त्या मुलींच्या आत्मविश्वासाचे खच्चीकरण झाले होते. रमा संशयी, चिडचिडी, उदसीन होत गेली. एकलकोंडी बनत चालली. पण नंतर पाच महिन्यातच तिने स्वत:ला सावरले.
आपल्या आयुष्याला मार्गी लावणे ही वाटते तितकी सोपी गोष्ट नव्हे. ही गोष्ट फार कठीण आहे, असेही नव्हे पण त्यासाठी जीवनातील वास्तवाला योग्य प्रकारे भिडायला हवे.
आपले आयुष्य सुरळीतपणे घालविण्यासाठी पुढे काही मार्गदर्शनपर सूचना क्रमवार दिलेल्या आहेत.
स्वत:ला ओळखा (स्वत:ची ओळख)
- आपण कोण आहोत, कसे आहोत हे जाणून घ्या. उदा. आपण स्वार्थी आहोत का?, लहरी आहोत का?, बुध्दीमान आहोत का?, वगैरे वगैरे! एखाद्या प्रसंगात आपण असे का वागलो? याचे पृथ:करण करा असे केल्याने तुम्ही स्वत:ला जास्त तुमच्या व्यक्तीमत्वाच्या सकारात्मक आणि नकारात्मक घटकांबद्दल जागरूक रहाल. तुमच्या व्यक्तीमत्वातील उणीवांवर दर वेळी कुरघोडी करण्याच्या फंदात पडू नका. कारण तो मार्ग नेहमीच शक्य नसतो.
- स्वत:बद्दल सजग राहा, तुमच्या इच्छा, आकांक्षा, विचार याबद्दल सतर्क राहा. आपली खाण्याची, बोलण्याची, चालण्याची पध्दत तपासून, जाणून घ्या. उदा. चालताना तुम्ही लांब ढांगा टाकता का, हात हलविता का, दुसऱ्याशी संभाषण करताना तुमच्या व समोरच्याच्या आवाजाची पट्टी व तीव्रता, चेहऱ्यांच्या स्नायूंची हालचाल, बोलण्याची लकब, हे नीट जाणून घेण्याचा प्रयत्न करा. परस्पर संभाषणाचा अभ्यास केलात तर बोलण्यातून निष्पन्न होणारे गैरसमज कळतील, टाळता येतील.तुम्ही स्वत:बद्दल जागरूक राहा. पण त्या जागरूकतेच्या जाणीवेत गुरफटून राहू नका.या मुद्द्याच्या स्पष्टीकरणासाठी पुढील उदहरण घेऊ. तुम्ही कॉलेजच्या आवारातून चालत आहात. तिथे जागोजाग कॉलेज विद्यार्थी, विद्यार्थीनी घोळक्या घोळक्याने उभे आहेत. अशा वेळी तुम्ही स्वत:बद्दल, अतिजागरूक (Concious) असाल तुम्ही तुमची केशभूषा, वेषभूषा, चालण्याची ढब यात टापटीपपणा, नीटनेटकेपणा आणाल, स्वत:चे रूप चांगले भासविण्यासाठी गंभीरपणे विचार कराल, मानसिक तणावात राहाल.या उलट तुम्ही तुमच्या पेहरावाबद्दल, चालण्याबद्दल सहज जाणकार (Overconcious नव्हे)असाल तर तुमचा माणसिक ताण नाहीसा होईल. स्वत:बद्दल सतर्क रहाल तर वेळोवेळी घडणाऱ्या चुका सुधाराल.
- जर तुम्ही स्वत:बद्दल सतर्क, रहात असाल तर युमच्या वेगवेगळ्या चित्तवत्तींच्या बाबतीतही तुम्ही डोळस रहाल, उदा. निराशा, अपयश, मत्सर, अस्थिर मनोवस्था, संताप, उद्वेग, गर्व... वगैरे! तुमच्या भावनांचे प्रकटीकरण, त्याची तीव्रता, त्यामागील कार्यकारणभाव, त्याचा तुमच्यार व इतरांवर होणारा परिणाम याचेही भान तुम्हाला हवे एकदा का तुम्ही भावभावनांचा उगम व पर्यावसन याबद्दल निष्कर्षाप्रत पोचू शकलात तर तुम्ही त्यांना आटोक्यात आणू शकाल/नकारात्मक भावनांचे प्रमाण कमी करू शकाल, त्यांच्यावर विजय मिळवू शकाल.
नकारात्मक भावभावनांवर विजय मिळविण्याचे काही मार्ग पुढीलप्रमाणे
अ. स्वयंसूचना (Autosuggestions)
याचा अर्थ आपण स्वत: काय करावे व करू नये यासंबंधीच्या सूचना स्वत:च्या स्वत:ला देणे, दिवसातून किमान पाच सहा वेळा स्वत:ला सूचना देत चला. अशा प्रकारे स्वयंसूचना देणे एक आठवडा किंवा त्यापेक्षा जास्त मुदतीपर्यंत चालू ठेवा. स्वयंसूचना देणे किती काळापर्यंत चालू ठेवायचे ते आपल्या नकारात्मक भावनांच्या तीव्रतेवर अवलंबून राहील.
ज्या दिवशी रमा नाराज होती त्या दिवशी रमाने स्वत:ला अस बजावलं की, ‘मला स्वत:ला आनंदी राहून इतरांना, आनंदी ठेवावयास हवे. आता कसोटीचा काळ आल्याने मी ठामपणे उभी रहाणे जरूरीचे आहे. मी माझे आयुष्य स्वतंत्रपणे, निर्धाराने घालविण्याचे ठरवले असल्याने माझ्या आनंदास्तव कोणी काही करेल अशी कल्पना करने गैर आहे कोणा परक्या व्यक्तीमुळे मी दु:खी होणार नाही हेही तेवढेच! मला माझ्या आयुष्यात व्यावहारीक दृष्टीकोन बाळगून वाटचाल करायची आहे. इतरांना माझ्या आयुष्याचे मातेरे करण्याचा अधिकार नाही’. स्वयंसूचनापध्दतीचा उपयोग जीवनाकडे होकारात्मक दृष्टीकोनातून बघण्यासाठी होतो. तसेच या दृष्टीकोनामुळे स्वत:तील आळशीपणा, अधीरपणा, धरसोडवृत्ती घालविण्यास मदत होते.
ब. नकारात्मक भावना निर्माण होण्याची पुर्वपीठिका शोधून काढा व त्यावर मात करा.
क. तुम्हाला का उदास वाटते याचा तुमचा तुम्ही शोध घ्या समोरच्या व्यक्तीचा दृष्टीकोनही समजावून घ्या. वास्तवाचा विचार तुम्ही अपघातात सापडलात पण बचावलात.
इथे तुमच्या वाईट मनस्थित्तीमुळे वाहन हाकताना झालेला निष्काळजीपणा - हे झाले अपघातांचे कारण! पण अपघातात तुम्हाला किंवा दुसऱ्या कोणाला इजा झाली नाही तेव्हा अपघातात दोन्ही पक्षांची काहीना काही चूक असू शकेल असे म्हणून विषय सोपविणे हा झाला सकारात्मक दृष्टीकोन!
ड. तुम्ही घटनेचा वस्तुनिष्ठपणे अभ्यास करा व सत्य स्वीकारायला शिका.
उदा.
- प्रत्येक माणसाला केव्हा ना केव्हा मृत्यूला सामोरे जायचे आहे.
- आयुष्यात जसे यश मिळते तसे अपयशही स्वीकारावे लागते.
- प्रत्येक व्यक्ती तिच्या आयुष्यापुरती एकमेवद्वितीयच असते. उदा. तुम्ही कितीही कष्ट घेतलेत तरी काही वेळा घडणारी गोष्ट मनाप्रमाणे घडू शकत नाही. मग तुम्ही निराश होता, अशा वेळी इतर गोष्टी विचारात घ्या आणि आयुष्याला सामोरे जा, त्यामुळे पुढील आयुष्याचा विचका होणे टळेल.
- आयुष्याला सामोर जाताना (ध्येयाप्रद पोह्चताना) वरील तीन सूचना साठ टक्क्यापर्यंत आत्मसात करा आणि मग पुढच्या आयुष्याची आखणी करा. तुमचे ध्येय कोणत्याही प्रकारचे असेल: व्यावसायिक निवड, विवाह, धंद्यातील यश, नोकरी, साधी ध्येये, वजन कमी करणे, एखाद्या समारंभाचे आयोजन, नोकरीतील पगारवाढीसंबंधी वरीष्ठांना सांगणे, वैगरे, वैगरे.
आपल्या ध्येयाप्रत जाताना नशिबाचा भाग लक्षात घ्या - कारण काही घटना घडणे हे अपरिहार्यच असते. उदा. असे म्हटले जाते की लग्नाच्या गाठी स्वर्गातच मारल्या जातात. पण तुमचा सहचर हा पुर्णपणे तुम्हाल पूर्णपणे अपरिचित असला तरी त्याच्याशी झालेला विवाह हा यशस्वी होणे पूर्णपणे नशिबावर अवलंबून नसते. यशस्वी वैवाहिक जीवनाचे बरेचसे श्रेय पतीपत्नीने घेतलेल्या कष्टांना (प्रयत्नांना) जाते
तात्पर्य: तुमचे आयुष्य जगताना तुम्ही वर उल्लेखलेल्या पायऱ्यावर वाटचाल केलीत तर तुम्ही तुमचे आयुष्य स्वत: घडवु शकाल. कोणत्याही झंझावातात तुमचे आयुष्य उधळू शकणार नाही. आयुष्याचा प्रवासकितीही खडतर असला तरीही तुम्ही सदैव समाधानी राहाल.
Vary nice and I feel its on going timr
ReplyDelete