💞 नाते या विषयावर आज खूप बोललं जातं आहे.आजकाल नात्यातली पारदर्शकता प्रत्येकाला अपेक्षित असते..
💞 आज वर्तमान समयी जी व्यक्ती आपेक्षा रहीत नाते निभावताना दिसते, त्याच व्यक्तीला सगळ्यात जास्त किंमत मोजावी लागते.
💞तुम्ही किती ही निस्वार्थ भावनेने नाती जपली तरी समोरच्या व्यक्तीला तुमच्या मध्ये स्वार्थ हा दिसणारच,
कारण त्याच्या कडे तुमच्या भावनांना साद घालण्याची समज आलेली नसते.
💞 अशा परिस्थिती मध्ये समोरची व्यक्ती किती ही चुकत असली तरी, तुम्ही त्याच्यावर दोषारोपण करण्यात आपला वेळ वाया घालू नका व आपल्या निस्वार्थ व्यक्तिमत्त्वावर ठाम रहा,
💞कारण समोरच्या व्यक्ती मध्ये तुमच्या प्रामाणिक भावनांना समजण्याची मानस दृष्टीच आलेली नसेल तर त्याला दोष देण्यात काहीच अर्थ नाही..
💞 अशा वेळी आपली पारदर्शकता, शुद्ध भावना टिकून ठेवणे हेच खूप महत्त्वाच आहे.
💞समोरची व्यक्ती तुमच्यावर दोषारोपण करत आहे म्हणून, तुम्ही ही त्याच्या चुका काढत त्याच्या वर दोषारोपण करण्यास सुरुवात केली तर तुमच्या व्यक्तिमत्त्वाला कधी ठेस लागेल हे तुम्हाला ही कळणार नाही.
💞 जर आपला स्वाभिमान टिकून ठेवायचा असेल तर कोणाच्या ही चुकांकडे लक्ष न देता आपल्या प्रामाणिक भावनांना आपण स्वतःच न्याय द्यावा....
- Ajay Dhage
No comments:
Post a Comment