💞बिरबलाच्या हजर जबाबीपणाची सतत परीक्षा घेणाऱ्या अकबरानं नेहमीप्रमाणे त्याला ‘अवघड’ कोडं घातलं.
💞 अकबर ने जमिनीवर एक रेष ओढली आणि बोलला ‘काढलेली रेषा न पुसता छोटी करून दाखव.’
💞बिरबलाचं उत्तर तयारच होतं. त्यानं त्याच रेषेजवळ एक मोठी रेष मारली आणि जुनी रेष आपसूकच ‘छोटी’ होऊन गेली.
💞तसंच माणसाच्या मनाचंही आहे. जेव्हा
मनात नकोसे वाटणारे विचार येतात तेव्हा ते त्रास देतात,असे दुःखाची अनुभूती करून देणारे विचार आपल्याच मनात निर्माण होतात
💞 अशा विचारांना पराभूत करून मनाला स्वास्थ्याकडे घेऊन जाणारे सामर्थ्य ही आपल्याच मनात दडलेले असते
💞 जेव्हा एखादी दुर्दैवी घटना घडते तेव्हा त्या घटने बाबत येणाऱ्या विचाराचे स्रोत आपोआप मनात सरू होते. आपले मन सातत्याने त्यावर विचार प्रवाहित करते.
💞आपण प्रवाहाला वेळीच लगाम न घातल्यामुळे जास्त विचार प्रवाहित होऊन मनाची शक्ती कमी कमी होत जाते आणि आपला तणाव वाढत जाऊन आपण तणावग्रस्त बनतो
💞अशा वेळी आपण बिरबला प्रमाणे नकारात्मक रेषे शेजारी एक सकारात्मक विचारांची मोठी रेषा ओडून नकारात्मक विचाराची लांबी वेळीच कमी करावी ....
💞 दुःखाला मोठ करायचं किंवा सुखाला मोठ करायचं हे मनाच्या हातात असते.
फक्त गरज असते तुम्ही सतर्क राहून वेळीच आपल्या मनाला आदेश देण्याची..
- अजय ढगे
No comments:
Post a Comment