अमेरिकेत एका कैद्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली तेव्हा तेथील काही शास्त्रज्ञांना वाटले की या कैद्यावर एक प्रयोग करून पहावा. प्रयोगाचा भाग म्हणून त्या कैद्याला फाशी देण्याऐवजी विषारी कोब्रा सापाचा चावा देऊन मारणार असल्याचे सांगण्यात आले. फाशीच्या दिवशी, त्याच्या समोर एक मोठा विषारी साप आणला गेला. त्या कैद्याला खुर्चीवर बसवून त्याचे डोळे बांधण्यात आले. त्यानंतर त्याला सापाचा दंश झाल्याचे भासवण्यात आले परंतु प्रत्यक्षात मात्र त्याला सेफ्टी पीन टोचवण्यात आली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सापाचा दंश न होतादेखील 2 सेकंदातच त्या कैद्याचा मृत्यू झाला. कैद्याच्या शरीराचे शवविच्छेदन करण्यात आले. त्या अहवालात कैद्याच्या शरीरात 'व्हेनम' सदृश्य विष सापडले. या विषामुळे त्या कैद्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. आता हे विष त्याच्या शरीरात कुठून आले, ज्यामुळे कैदी मरण पावला? याचे उत्तर असे की, हे विष त्या कैद्याच्या शरीरात मानसिक भीतीमुळे त्याच्याच शरीराने निर्माण केले होते.
याचा अर्थ असा आहे की, आपल्या शरीरात स्वतःच्या मानसिक स्थितीनुसार सकारात्मक किंवा नकारात्मक उर्जा निर्माण केली जाते. त्यानुसार आपल्या शरीरात विविध प्रकारच्या हार्मोन्सची निर्मिती होते. नकारात्मक उर्जेतून निर्माण झालेले रसस्त्राव विविध रोगांची निर्मिती करतात. सद्यस्थितीत मनुष्य चुकीच्या विचारांचा भस्मासूर निर्माण करून स्वत: चा नाश करीत आहे.
माझ्या मतानुसार, कोरोनाबाबत अवास्तव विचार करून त्याचा अवाजवी बाऊ करू नका. आज 5 वर्षांपासून ते 80 वर्षांपर्यंतचे जवळपास सर्वच लोक याबाबत नकारात्मक झालेले आहेत. अंतर्गत व बाह्य कारण घटक यास जबाबदार आहेत. प्रसार माध्यमातून परिस्थिती किती भयावह आहे, किती संख्या वाढली, किती लोकांचा मृत्यू झाला याची आकडेवारी ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवली जाते. त्यातून जनमानसामध्ये भीतीचे वातावरण तयार होते. हीच भीतीची मानसिकता नकारात्मक विचारांना जन्म देते व हे नकारात्मक विचार आजारांना जन्म देतात. दाखविण्यात येणाऱ्या आकडेवारीवर जाऊ नका कारण पॉझिटीव्ह झालेल्या लोकांपैकी निम्म्यापेक्षा जास्त लोक अगदी व्यवस्थित आहेत. त्रासदायक स्थितीतून जाणारे अनेक लोक बरेही होत आहेत. आजारातून बरे होण्याचा रुग्णांचा रिकव्हरी रेट देखील जास्त आहे.
मृत्यू पावणारे फक्त कोरोनामुळेच नव्हे तर त्यांना इतर आजारही होते, ज्यांचा सामना ते करू शकले नाहीत, हेही लक्षात घेतले पाहिजे. लक्षात ठेवा कोरोनामुळे घरी मरण पावणारे खूप कमी आहेत. बहुतांशी रुग्ण इस्पितळात मरण पावत आहेत. रुग्णालयाच्या वातावरणामुळे आणि मनाच्या भीतीमुळे निर्माण झालेली नकारात्मकता व त्यातून शरीराची रोग प्रतिकारक यंत्रणा कमी होऊन मृत्यू ओढवण्याची संभाव्यता ही जास्त असते. कोरोना या आजाराची वास्तवता आपणास नाकारता तर येणार नाही परंतु याचा सामना करण्यासाठी नेहमी सकारात्मक रहा, सर्व काही चांगले होणार आहे यावर विश्वास ठेवा आणि आनंदाने जगा. जर आपण नकारात्मकेच्या गर्तेतच अडकून राहिलो तर येणाऱ्या काळात प्रत्येकाला कोरोना असेल..! हे लक्षात ठेवा.
*मानसतज्ञांचा सल्ला*
१. कोरोनाशी संबंधित अधिक बातम्या पाहू किंवा ऐकू नका, आपल्याला आवश्यक असलेली सर्व माहिती आपणास आधीच माहित आहे.
२. कोठूनही अधिक माहिती संकलित करण्याचा प्रयत्न करू नका कारण त्यामुळे मानसिक स्थिती अधिक कमकुवत बनते.
३. इतरांना कोरोना व्हायरसबद्दल चुकीचा सल्ला देऊ नका कारण सर्व लोकांची मानसिक क्षमता समान नसते, काही लोक नैराश्याने ग्रस्त होऊ शकतात.
४. जास्तीत जास्त संगीत ऐका, ध्यान-धारणा करा, व्यायाम करा, पुरेसा आहार घ्या, अध्यात्म, भजन इ. ऐका, मुलांसमवेत घरात इनडोअर गेम खेळा, कुटूंबासमवेत बसा आणि आगामी वर्षांतील कार्यक्रमांचे नियोजन करा.
५. नियमित अंतराने आपले हात चांगले धुवा, सॅनिटायझरचा वापर करा, सर्व वस्तूंची साफ सफाई केली करा, येणाऱ्या बाहेरील व्यक्तीला १ मीटर अंतर ठेवूनच भेटा. त्रास जाणवल्यास तज्ञांचा सल्ला घ्या.
६. तुमची नकारात्मक विचारसरणी नैराश्यात वाढ करेल आणि विषाणूशी लढण्याची क्षमता कमी करेल. सकारात्मक विचारसरणी तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या बळकट करेल आणि कोणत्याही परिस्थितीत किंवा आजाराशी लढण्यास सक्षम ठेवेल.
७. अत्यंत महत्वाचे म्हणजे, हा वाईट काळ लवकरच संपणार आहे आणि आपण नेहमीच निरोगी आणि सुरक्षित राहणार आहोत हा दृढ विश्वास ठेवा.
*सकारात्मक व्हा - निरोगी रहा *.
Think Positive and Believe good will happen..
*चला तर मिळून सकारात्मक विचार पसरवूया*
अनुवाद: प्रा. रमेश कट्टीमणी
No comments:
Post a Comment