Welcome to the Blog of Department of Psychology at Kanya Mahavidyalaya, Miraj

Saturday, 9 October 2021

संतुलित मन, समाधानी जीवन

आपल्या मनाला कसं सांभाळावं


जसं एखादं वाद्य वाजवण्यासाठी त्यामध्ये संतुलन जसं गरजेचं असतं. तंबोऱ्याच्या तारा कसल्या तर त्या तुटून जातील आणि त्या जर ढिल्या सोडल्या तर त्यामध्ये नाद निर्मिती होणार नाही. म्हणजेच त्याच्यामध्ये योग्य संतुलन असणं गरजेचं आहे. तसंच आपलं देखील आहे. आपलं शरीर हे यंत्र आहे. शरीर-मन-मेंदू यामध्ये देखील योग्य संतूलन असणं गरजेचं आहे. शरीराचं यंत्र हे मनावर अवलंबून आहे. यासाठी आपलं मन सतत सकारात्मक विचारांमध्ये गुंतवूण ठेवणं गरजेचं आहे. थोडासाही ताण जाणवला तर त्यावर वेळीच उपचार करणं महत्त्वाचं आहे. जसं आपण पाय दुखतोय, गुडघा दुखतोय म्हणून डॉक्टरकडे जातो तसंच जरासंही मन दुखलं तरी डॉक्टरकडे जाणे गरजेचे आहे. मन आनंदी नसेल तर आपण समाधानी राहू शकत नाहीत.


ताण - तणाव घालवण्यासाठी सोपे उपाय


सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आपल्या आवडीचा छंद जोपासणं गरजेचं आहे. सर्वांनी खेळायला पाहिजे कारण खेळ आपल्याला चांगल्या पद्धतीनं जगण्याचं शिकवत असतं. खेळामुळे आपण खूप आनंदी राहत असतो. वर्तमानात कसं आनंदी रहावं हे आपण खेळातून शिकतो. जसं की एखाद्या खेळाडून गोल केला तर तो आनंद साजरा करतो त्याला याची चिंता नसते की आपण उद्याचा सामना जिंकणार की हारणार. तो फक्त आजचा क्षण आनंदानं साजरा करत असतो. त्यामुळे सर्वांनी खेळणं खूप गरजेचं आहे. शिवाय आपल्याला ज्या गोष्टीमध्ये वेळ घालवणं गरजेचं आहे. ध्यानधारणा, सूर्य नमस्कार, योगा यामुळे देखील ताण तणाव खूप प्रमाणात कमी होतील. तसेच आपल्याला खूपच ताण जाणवत असेल तर मानसोपचार तज्ज्ञाचा किंवा समुपदेशकाचा सल्ला घेणं कधीही आवश्यक आहे.


मानसिक आरोग्य बिघडण्याचं कारणं


मानसिक आरोग्य बिघडण्याचं मुख्य कारण म्हणजे आजची जीवनशैली होय. आजच्या स्पर्धेच्या युगात मनात आलेली आणि हवी असलेली गोष्ट लगेच हवी आहे. कोणतीही गोष्ट प्राप्त करण्यासाठी जो संयम लागतो तो आजच्या पिढीमध्ये दिसून येत नाही. महत्त्वाकांक्षा असणं वेगळं आणि अतिमहत्त्वाकांक्षा असणं हे वेगळं. या अतिमहत्त्वाकांक्षेपायी आजचा तरूण तणाखाली येत आहे.


गंभीर मानसिक आजाराचं प्रमाण


साधारणपणे गंभीर मानसिक आजाराचं प्रमाण ३० टक्के आहे. तसं पाहिलं तर आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक व्यक्तीला कोणता ना कोणता ताण असतोच. अनेक जण आपण केलेल्या कामाबद्दल समाधानी नसतात, ८ ते १० तास काम करुनही काम केल्याचं समाधान मिळत नाही. अशावेळी आपण आपल्या जीवनशैलीकडे बारकाईने पाहणं गरजेचं असतं. आपला जास्तीत जास्त वेळ कशात जात आहे, आपला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे हे आपण पाहणं गरजेचं आहे. याकडे दुर्लक्ष केलं तर आपला प्रवास गंभीर मानसिक आजाराकडे होऊ शकतो.


मानसिक रुग्णांबद्दल महत्त्वाची बाब


ही महत्त्वाची बाब आहे. कारण रुग्ण तर सोडाच पण कुटूंबिय देखील हे मान्य करत नाहीत की आमच्या कुटूंबात कोणी मानसिक रुग्ण आहे. यासाठी वेगवेगळ्या प्रकारे रुग्णांना डॉक्टरपर्यंत आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. जसे की त्याला डॉक्टरकडे जायचे आहे असं न सांगता आपल्याला एका मॅडमला भेटायला जायचे आहे असे सांगावे लागते. त्याला आवडणाऱ्या गोष्टींवर पहिल्यांदा चर्चा केली जाते. एकदा त्याचा विश्वास संपादन केला की, मग उपचाराला सुरूवात केली जाते.


मानसिक आजारामध्ये अनुवांशिकता आणि परिस्थितीजन्य प्रकार


तसं पाहिलं तर अनुवांशिकता खूप महत्त्वाची आहे. आपल्या आजोबा, वडील यांना जर एखादा मानसिक आजार असेल तर शक्यता असते की पुढल्या पिढीला याचा धोका असतो. तसंच परिस्थितीजन्य प्रकारात कुटूंब देखील महत्त्वाचा भाग असतो. आपण एका कुटूंबाचे घटक असतो. आपण कोणत्या कुटूंबातून आलोत, कुठल्या वातावरणात वाढलो आहोत, शिक्षण कोणत्या क्षेत्रात घेतलं आहे हे खूप महत्त्वाचं आहे. यातून देखील ते तणावाखालून जातात. तरूण पिढीमध्ये तर तणावाचं कारण खूप वेगवेगळे असल्याचं दिसून येत आहे कारण बरेच तरूण फेसबुकवर मला खूप लाईक्स मिळाले, मला गर्लफ्रेंड नाही, मला बॉयफ्रेंड नाही अशा गोष्टींवरून देखील तणावाखाली जाताना पहायला मिळतात.


मानसिक रुग्णाच्या प्रमाणात उपलब्ध मानसोपचार तज्ज्ञ किंवा समुपदेशक


तसं पाहिलं तर मानसिक रुग्णाच्या प्रमाणात खूपच कमी मानसोपचार तज्ज्ञ आणि समुपदेशक उपलब्ध आहेत. समाजातील संतुलन योग्य ठेवण्यासाठी तरूणांनी या क्षेत्राकडे वळणे गरजेचे आहे. करिअरसाठी हे क्षेत्र चांगलं आहे.ज्यांना समाजासाठी काहितरी करायचं आहे त्यांनी निश्चितच याकडे वळणं योग्य राहिल. मानसशास्त्र किंवा समाजशास्त्र या विषयात पदवी अथवा पदविका प्राप्त करुन समुपदेशानाचे कार्य करता येते. महत्त्वाचे म्हणजे समुपदेशकामध्ये संयम खूप महत्त्वाचा असतो. कारण मानसिक रुग्ण हा पूर्णपणे खचलेला असतो अशा वेळी समुपदेशकाने त्यामध्ये सामावून जाता तटस्थ राहून त्याच्याशी संवाद साधणं गरजेचं आहे. कंटाळून न जाता त्याला वारंवार मार्गदर्शन करणं गरजेच आहे.



संदर्भ : आरोग्यविद्या डॉट कॉम

Thursday, 7 October 2021

मानसिक स्वास्थ्य संवर्धन

 

     सध्याच्या धकाधकीच्या, गतिमान व स्पर्धात्मक जीवनात ताणतणावाचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. कोविड १९ सारख्या महामारीने त्यामध्ये आणखी भर घातली आहे. अशा तणावजन्य परिस्थितीत सक्षमपणे उभे राहण्यासाठी आणि कार्यक्षम आयुष्य जगण्यासाठी शारीरिक स्वास्थ्यासोबतच मानसिक स्वास्थ्य संवर्धनाची गरज आहे. जीवनातील संघर्ष, अपयश, नैराश्य, आघातजन्य , कौटुंबिक वंचितता यामुळे मानसिक स्वास्थ्य धोक्यात येते. अती मानसिक ताणामुळे व्यक्तीची मनःशांती कमी होते. अशा प्रसंगी मग व्यक्तीने नित्य जीवनाची पुनर्रचना करण्याची गरज निर्माण होते. मानसिक आरोग्याची जोपासना ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. प्रत्येकाने स्वतःच्या दिनचर्येत आणि मनोवृत्तीत काही विधायक बदल करणे आवश्यक असते. सुखी व समाधानी जीवनाचे गुपित ग्रीकांनी फार पूर्वीच सांगितले आहे. आपले काम व आवडते कृत्य यांचा रोजच्या कार्यात समतोल राखला तर जगण्याचा उत्साह वाढतो. मानसिक स्वास्थ्य संवर्धनासाठी नित्य जीवनाची पुनर्रचना करताना खालील बाबी आचरणात आणता येतील. 


१. कामाचे नियोजन करा

    आपल्या दैनंदिन कामात शिस्त राखणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीवर काही विशिष्ट कामांची जबाबदारी असते. व्यक्तीने आपले काम आवडीने व पूर्ण क्षमतेने करावे. तसेच कामातील जबाबदारी स्वीकारावी. कामाचे नीट नियोजन करावे. कामाचे नियोजन करताना कोणते काम जास्त महत्वाचे त्यानुसार प्राधान्यक्रम ठरवावा. असे केल्याने काम वेळेत पूर्ण व पद्धतशीरपणे करायची सवय लागते. काम वेळेत पूर्ण झाले तर इतर छंद जोपासण्यासाठी, करमणुकीसाठी व समाजकार्यासाठी वेळ मिळतो. 


२. फावल्या वेळाचे नियोजन

    व्यक्तीला फावल्या वेळाचा उपयोग आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी होतो. फावल्या वेळेत स्वतःचे कलागुण विकसित करण्यासाठी गाणे, नाच, चित्रकला, भरतकला, विणकाम, वाद्य वाजविणे अशा कला शिकता येतात. हे छंद पुढे कामाचा ताण घालविण्यासाठी, रिलॅक्स होण्यासाठी, करमणुकीसाठी उपयुक्त  असतात. 


३. नियमित आहार

    शरीर स्वस्थ तर मन स्वस्थ, त्यामुळे योग्य वेळी नियमित आहार घेतला पाहिजे. शरीराला आवश्यक असणारी कार्यशक्ती पोषक आहार घेतल्याने मिळते. खाल्लेल्या अन्नातून पोषण मूल्ये शरीराला मिळावी यासाठी जेवताना व्यक्तीने प्रसन्न राहावे. वाचत किंवा टी. व्ही. पाहत जेवू नये. जेवताना गप्पा असाव्यात परंतु त्या गप्पा भांडण वाढवणाऱ्या, एकमेकांवर दोषारोप करणाऱ्या नसाव्यात. 


४. व्यायाम

    निरोगी आरोग्यासाठी व्यायामाची आवश्यकता असते. सध्या लोकांचे बैठे काम वाढले आहे. बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या बदलत्या सवयी यामुळे लठ्ठपणाची समस्या वाढत चालली आहे. व्यायाम केल्याने मन प्रसन्न राहते, कामात उत्साह वाढतो. शरीराप्रमाणे मनही लवचिक असणे गरजेचे असते. निराशाजनक, भीतीदायक विचारांना थांबवून मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी मनाचे व्यायाम आवश्यक असतात. 


५. सुसंवाद साधणे

    हल्लीच्या विभक्त कुटुंब पद्धतीत घरामध्ये परस्पर सुसंवाद कमी होत चालला आहे. घरातील व्यक्तींमध्ये परस्पर संभाषण होणे आवश्यक असते. अशा संभाषणातून एकमेकांच्या गरजा, अपेक्षा, विचार, भावना जाणून घेता येतात. एकमेकांशी बोलल्याने तसेच घरातील वातावरण मोकळे राहते. परस्परांच्या सुख-दुःखात सहभागी होता येते. 


६. झोप व विश्रांती

    सकस आहार, व्यायाम यासोबत शांत झोप व विश्रांती देखील मानसिक शांतीसाठी महत्वाची आहे. शांत झोप लागणे हे निरोगी आरोग्याचे लक्षण आहे. 


७. भावना व्यक्त करणे

     मानसिक स्वास्थ्यासाठी स्वतःच्या भावना स्वीकारा. राग, भीती, दुःख, आक्रमकता, हेवा, तिरस्कार या भावना सुद्धा मान्य करा. भावना टाळण्याचा किंवा दडपण्याचा प्रयत्न करू नका. भावना व्यक्त केल्याने मन हलके होते. मानसिक स्वास्थ्यासाठी प्रत्येक दिवशी थोडेतरी मनमोकळे हसले पाहिजे. हसण्यामुळे चेहऱ्याचे स्नायू, श्वसन संस्था व पचनसंस्था यांना चांगला व्यायाम मिळतो. आनंद व समाधान हे मानसिक स्वास्थ्याचा प्राणवायू आहेत. त्यामुळे व्यक्त व्हायला शिका. 


८. व्यसने टाळा

    दुःख कमी करण्यासाठी काही व्यक्ती तंबाखू, दारू, मादकद्रव्य सेवनाच्या आहारी जातात. ही व्यसने ताण कमी करणारी नसून स्वास्थ्य बिघडवणारी असतात. त्यामुळे व्यसनांपासून दूर रहा. 


९. आत्मविश्लेषण करा

     स्वतःच्या वर्तनाचे, कृतीच्या परिणामांचे, विचारांचे वस्तुनिष्ठ परीक्षण करा. त्यातून स्वतःच्या क्षमतांची, मर्यादांची जाणीव होईल. त्यातून आपल्या वर्तनात सुधारणा करता येते. स्वतःचे विश्लेषण करताना न्यूनगंड मात्र निर्माण होऊ देऊ नका. 


१०. जगण्यावर प्रेम करा

    आयुष्यात धनात्मक आणि ऋणात्मक असे दोन्ही प्रकारचे अनुभव येतात. सभोवतालच्या सुखद-दुःखद, चांगल्या-वाईट घटनांपैकी तुम्ही काय पहायचे हे तुमच्यावर अवलंबून असते. आयुष्यातील आव्हाने स्वीकारणे हे जगण्याचे सूत्र आहे. व्यक्तीने आशावादी वृत्ती जपली पाहिजे. आयुष्य अनिर्बंधपणे उधळून टाकू नये. होकारात्मक विचारांचा व कृतींचा व्यक्तीने निश्चय केला, तर व्यक्तीला स्वास्थ्य संपन्न, आनंदी, निरामय जीवन जगता येईल. 



 

Wednesday, 6 October 2021

समायोजन - यशस्वी जीवनाचा मूलमंत्र

  


         समायोजन ही मानवी जीवनातील एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्याला इंग्रजीत Adjustment असे म्हटले जाते. व्यावहारिक भाषेत परिस्थितीशी, बदलाशी जुळवून घेणे तसेच जीवनात अंतर्गत सुसंगती टिकवणे याला समायोजन म्हणता येईल. मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने समायोजन ही रोजच्या जीवनात अतिशय महत्त्वाची व आवश्यक बाब आहे. आपण जन्मापासून मरेपर्यंत आपल्या सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्याला अनेक शारीरिक, मानसिक, सामाजिक गरजा असतात. या सर्वच गरजांची पूर्तता होतेच असे नाही. बऱ्याचदा आपल्या ईच्छा, आकांक्षा, आवडी-निवडींना मुरड घालावी लागते तसेच आपल्या भावनांना आवर घालावा लागतो आणि समाजमान्य पद्धतीने प्रतिक्रिया द्यावी लागते. यालाच समायोजन म्हणतात. 

      जीवनात आपणास अनेक समस्यांना किंवा संघर्षाला सामोरे जावे लागते. या समस्या सोडविण्यासाठी विविध मार्ग वापरावे लागतात, स्वतःच्या क्षमतांचा कौशल्यपूर्ण पद्धतीने वापर करावा लागतो. समस्यात्मक परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी स्वतःमध्ये व परिस्थितीमध्ये योग्य ते बदल घडवून आणण्याची प्रक्रिया म्हणजे समायोजन होय. समायोजन म्हणजे योग्य मार्गाने केलेली तडजोड होय. ती निरतंर चालणारी प्रक्रिया आहे. आपल्या जीवनातील आनंदाचा उपभोग, जीवन समाधान, प्रगती ही बहुतांशी समायोजनावर अवलंबून असते. समाज, संस्कृती, नीतिनियम, सभोवतालचे वातावरण, अपेक्षा याचे भान ठेवून केलेले समायोजन आपणास मानसिक स्वास्थ्य टिकविण्यास मदत करते. 

       जरी अनेक ठिकाणी आपल्याला समायोजन करावे लागत असले तरी प्रामुख्याने तीन क्षेत्रातील समायोजनाचा आपण या ठिकाणी विचार करूया. 

१) वैयक्तिक समायोजन

      व्यक्तिगत समायोजन ही मानसिक स्वास्थ्यासाठी आवश्यक असणारी सर्वांत महत्त्वाची पायरी म्हणता येईल. कारण हे समायोजन आपणच आपल्याबाबत करायचे असते. वैयक्तिक समायोजन करण्यासाठी स्वतःच्या क्षमता, मर्यादा, भोवतालची परिस्थिती, मिळणारी संधी याची योग्य जाणीव प्रत्येकाने करून घ्यावी. आपली ध्येये, उद्धिष्टये, जीवनाकडे पाहण्याचा 

दृष्टीकोन जितका वास्तव व सकारात्मक असेल तितके व्यक्तिगत समायोजन परिणामकारक होते. आपले वैयक्तिक समायोजन जितके चांगले असेल तितके संघर्ष, ताणतणाव, अपयश, नैराश्य आपण कौशल्यपूर्ण रीतीने हाताळू शकतो.


२) सामाजिक समायोजन

      वैयक्तिक समायोजनाइतकेच सामाजिक समायोजनास देखील महत्व आहे. आपण जर वैयक्तिक समायोजनात यशस्वी झालो तर सामाजिक समायोजन करणे सुलभ जाते. सामाजिक समायोजनात समाजमान्य वर्तन  करायला शिकणे, समाजाच्या अपेक्षा जाणून घेणे, समाजाच्या नितिनियमांचे पालन करणे, समाजाने मान्य केलेली भूमिका व दिलेले स्थान यास अनुसरून वर्तन करणे इत्यादी बाबींचा समावेश होतो. ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो याची जाणीव आपणास असायला हवी. समाजाप्रती प्रेम, आदर, आत्मीयता वाटायला हवी. बऱ्याचदा काही रूढी मान्य नसतात अशावेळी त्या बदलण्यासाठी त्यांना शरण न जाता समाजाची घडी बदलणारी कृती करायला हवी, परंतु ती करताना देखील बराच विरोध सहन करण्याची तयारी असावी लागते. हे ही एक प्रकारचे सामाजिक समायोजनच होय.  मानसिक स्वस्थतेसाठी सामाजिक समायोजन साधण्याचे उत्तम कौशल्य प्रत्येकाने विकसित करायला हवे. 


३) व्यावसायिक समायोजन

     नोकरी, व्यवसाय हे व्यक्तीच्या उपजीविकेचे साधन आहे. आपल्या व्यवसायावर, नोकरीवर  आर्थिक-सामाजिक दर्जा, समाजाकडून मिळणारी किंमत अवलंबून असते. आपला व्यवसाय आपल्याला मानमरातब, आत्मप्रतिष्ठा मिळवून देत असतो. व्यवसायाची योग्य निवड, त्यासाठी योग्य प्रशिक्षण, व्यवसायातील सुरक्षितता, प्रगतीची संधी, आर्थिक मोबदला, कामाचे स्वरूप, कर्तव्ये व जबाबदाऱ्या, व्यावसायिक समाधान, सहकारी वर्गाशी सुसंबंध या गोष्टी व्यवस्थित हाताळता येणे म्हणजे परिणामकारक व्यावसायिक समायोजन होय. 


      वरील तिन्ही प्रकारच्या समायोजनाशिवाय भावनिक समायोजन, शालेय समायोजन, वैवाहिक समायोजन या प्रकारचे देखील समायोजन आपणास करावे लागते. जेंव्हा आपण विविध प्रकारचे समायोजन साधण्यात यशस्वी होऊ तेंव्हा आपण मानसिक दृष्टया शांत, स्थिर राहू शकतो. त्यासाठी आपल्याला अपयशातून ज्ञान घेत जीवन जगण्याची कौशल्ये विकसित करावी लागतील. शेवटी काय तर, यशस्वी समायोजन हाच सुखी जीवनाचा मूलमंत्र आहे हे म्हटल्यास काही वावगे ठरणार नाही. 




संदर्भ : य.च.म.मु.वि. मानसिक स्वास्थ्य




Tuesday, 5 October 2021

मन:स्वास्थ्य म्हणजे काय ?

       मन व शरीर एकमेकांना पूरक आहेत. मन स्वस्थ असेल तर व्यक्ती प्रतिकूल परिस्थितीवरही मात करू शकते. परंतु सध्याच्या स्पर्धात्मक, धकाधकीच्या जीवनात मानसिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष झाल्याने वेगवेगळे मानसिक आजार बळावत आहेत. शिवाय समाज मनोरुग्णांकडे आणि मानसिक आजारांकडे कलंकित नजरेने पाहतो. हा कलंक पुसून काढण्यासाठी दरवर्षी 10 ऑक्‍टोबर हा दिवस "जागतिक मानसिक आरोग्य दिन' तसेच 4 ऑक्‍टोबर ते 10 ऑक्‍टोबर "जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह' म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने जाणून घेऊयात मन:स्वास्थ्याविषयी थोडेसे....

       शारीरिक आरोग्याबाबत आपण नेहमीच जागरूक असतो. शासन स्तरावरदेखील शरीर स्वास्थ्यविषयक प्रश्नांना जास्त महत्व दिले जाते. मानसिक स्वास्थ्याबाबत मात्र इतकी जाणीव समाजमनापर्यंत असलेली आढळत नाही. उच्च शिक्षित लोकांमध्येही ही जाणीव फार कमी प्रमाणात असल्याचे दिसून येते. जाणीव असली तरी मानसिक स्वास्थ्याबाबत अनेक गैरसमज आढळतात. शारीरिक स्वास्थ्य बिघडले तर ते ग्राह्य आहे. परंतु एखादी व्यक्ती तऱ्हेवाईक किंवा अपेक्षित वर्तनापेक्षा/नेहमीपेक्षा वेगळी वागत असेल तर त्याला लगेच मनोरुग्ण, वेडा असे शब्दप्रयोग वापरले जातात. खरं तर ही समजूत कितपत बरोबर आहे? मानसिक स्वास्थ्य बिघडणे म्हणजे त्याला मानसिक आजार/विकृती आहे असे मानता येणार नाही. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आढळतात की, जे क्षुल्लक गोष्टीवरून लक्षणीय चिडतात, कारणे सांगून जबाबदारी टाळणारे असतात, इतरांच्या कामात चुका दाखवणाऱ्या, आपल्या मागण्यांसाठी हट्ट धरून बसतात. मग या सर्वांनाच मनोविकृती किंवा सर्वांचेच मानसिक स्वास्थ्य हरवले आहे असे म्हणता येणार नाही. कारण स्वस्थ मन आणि अस्वस्थ मन यातील सीमारेषा स्पष्ट करता येत नाही. 

        फक्त शरीराचे आरोग्य चांगले असणे आणि शारीरिक रोगापासून वंचित असणे म्हणजे आरोग्य नव्हे. आरोग्य किंवा रोगाचा अभाव या संकल्पनेमध्ये शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक अशा अनेक पैलूंचा समावेश होतो. जी व्यक्ती या सर्व पैलूंनी संपन्न आहे, तिला स्वस्थ व्यक्तीमत्वाची व्यक्ती असे म्हणता येईल. स्वस्थ व्यक्तीमत्वाद्वारे  सर्वांगीण विकास साधण्यासाठी मानसिक दृष्टया स्वस्थ असणे आवश्यक आहे. मन आणि शरीर या दोन घटकांची यात महत्वाची भूमिका आहे. मन आणि शरीर या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून दोन्ही परस्पर पूरक आहेत. या दोहोंमधील क्रिया जोपर्यंत परस्परपूरक असतात तोपर्यंत व्यक्ती स्वस्थ असते. या दोन्हीत असंतुलन निर्माण झाला की अस्वस्थ मन निरोगी शरीरालादेखील रोगट करून टाकते. त्यामुळे मन जर स्वस्थ असेल तर शरीरदेखील तंदुरुस्त राहते. 

       या वरील विवेचनावरून आता मन:स्वाथ्य म्हणजे नेमके काय ते जाणून घेऊयात. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) केलेल्या व्याख्येनुसार, "मानसिक अनारोग्याचा अभाव, उत्पादकता, धनात्मक अभिवृत्ती आणि समायोजनाची तयारी या गुणांनी युक्त असे वर्तन म्हणजे मानसिक स्वास्थ्य होय." वरील व्याख्येचा विचार केल्यास स्वास्थ्य म्हणजे केवळ रोगाचा अभाव नसून शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्टया स्वस्थ असणारी अवस्था. मानसिक स्वास्थ्य संपन्न असणाऱ्या व्यक्तीची काही वैशिष्टये. 

१. स्वतःला समाधानी ठेवू शकणे.

२. स्वतःच्या मर्यादा व उणीवा जाणणे. 

३. अपेक्षित यश मिळवू शकणे.

४. ज्ञान मिळवु शकणे. 

५. सामाजिक संबंधाची योग्य जाण असणे. 

६. सामाजिक समायोजन साधता येणे. 

७. मन:शांतीचा आंतरिक आनंद मिळवू शकणे. 

८. निवडलेल्या ध्येयपूर्तीसाठी प्रयत्न करत राहणे. 

९. मानसिक तोल ढासळू न देता वास्तवता स्वीकारून परिस्थितीला तोंड देणे.

१०. व्यक्तिगत, कौटुंबिक व सामाजिक जबाबदारी पार पाडणे. 

      आपल्या व्यक्तिमत्वाच्या अनेक बाजू एकत्र करून एकमेकांशी गुंफण घालतो तेंव्हाच आयुष्यातले यश, अपयश, ताणतणाव, आनंद, दुःख, निराशा इत्यादी सर्व चढउतार आपण यशस्वीरीत्या, तार्किकरित्या पार पाडू शकतो. मनाची बौद्धिक व भावनिक बाजू, त्याचे हित व कल्याण ही मानसिक स्वास्थ्याची महत्वाची बाजू आहे. आजच्या या स्पर्धेच्या युगात चिंता, ताणतणाव, संघर्ष यामुळे मानसिक व्याधींचे प्रमाण वाढत आहे. कोविड सारख्या महामारीच्या काळात शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्य जपण्याचे आव्हान आपल्या सर्वांसमोर उभे आहे. एकंदरीत आयुष्यातील संघर्षांवर व समस्यांवर यशस्वीपणे मात करून तसेच प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील आयुष्याची प्रगती कायम राखून सुखासमाधानाने जगणे म्हणजे मानसिक स्वास्थ्य होय. 


संदर्भ : य.च.म.मु.वि. मानसिक स्वास्थ्य

Monday, 20 September 2021

जागतिक अल्झायमर दिन विशेष

 


अल्झायमर या आजाराविषयी भारतीय समाजात एक प्रकारचा टॅबू आहे. लोक गैरसमज करून घेतील, या भीतीने आपल्याला किंवा आपल्या कुटुंबापैकी कुणाला हा आजार आहे, हे सहसा कुणी सांगत नाही. अशा लपवून ठेवण्याच्या प्रवृत्तीमुळे आपलंचं मोठं नुकसान होतं.

       हा वृद्धांना होणारा आजार आहे. या आजारावर खुलेपणाने बोलल्यास त्याविषयीची जागृती निर्माण होऊन त्या दिशेने पावलं उचलली जातील, असं प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ आणि ज्येष्ठ तसंच डिमेंशिया रुग्णांसाठी सिल्व्हर इनिंग नावाच्या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक डॉ. शैलेश मिश्रा यांचं म्हणणं आहे.

डॉ. शैलेश मिश्रा म्हणतात, "संपूर्ण जगातच उपचाराची योग्य पद्धत काय आहे तर सुरुवातीच्या टप्प्यातच आजाराचं निदान करावं. पण आपल्याकडे काय होतं, या आजाराला एक स्टिग्मा आहे. लोक वेडे म्हणतील, म्हणून ती व्यक्ती किंवा तिचे कुटुंबीय कुणालाही याबद्दल सांगत नाहीत आणि डॉक्टरांकडेही जात नाहीत."

ते पुढे म्हणतात, "अटल बिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिस, तेजी बच्चन यांसारख्या अनेकांना अल्झायमर होता. मात्र, इतरही अनेक जणांना हा आजार असूनही ते सार्वजनिक पातळीवर मान्य केलं जात नाही किंवा त्याबद्दल सांगितलं जात नाही. "

अल्झायमर म्हणजे काय?

या आजाराविषयी थोडं जाणून घेऊया. अल्झायमर हा मेंदूशी संबंधित आजार आहे. साठ वर्षांपेक्षा मोठ्या व्यक्तींना अल्झायमर होतो. अल्झायमर हा डिमेंशिया या सिंड्रोमचा एक प्रकार आहे. डिमेंशियाचे वेगवेगळे प्रकार आहेत. मात्र, या सगळ्या प्रकारांमध्ये व्यक्तीच्या स्मृतीवर (Memory) परिणाम होतो. मराठीतत याला स्मृतीभ्रंश म्हणतात. सोप्या शब्दात सांगायचं तर विसरभोळेपणा.

1906 साली डॉक्टर अल्झायमर यांनी सर्वात आधी या आजाराविषयी सांगितलं. त्यामुळे याला अल्झायमर असं नाव देण्यात आलं.

बोलणे, ऐकणे, वास घेणे, हात हलवणे, चालणे, जेवण करणे, स्वच्छेतेच्या क्रिया हे सगळं मेंदुतल्या काही पॉईंट्समधून नियंत्रित होत असतं. अशा वेगवेगळ्या पॉईंट्सना जेव्हा इजा होते तेव्हा शरीरातल्या संबंधित अवयवापर्यंत सूचना पोहोचत नाही आणि ती क्रिया बंद पडते किंवा ती क्रिया आपण विसरतो.

उदाहरणार्थ अल्झायमरचा रुग्ण ब्रश करणे, स्वच्छतेच्या क्रिया करणे, हेसुद्धा विसरतो. इतकंच नाहीतर तोंडात घास टाकल्यावर तो गिळायलाही विसरतो. 80 वर्षांपेक्षा मोठ्या असलेल्या 50 टक्के व्यक्तींना डिमेंशिया होण्याची शक्यता असते. सध्या भारतात 43-50 लाख डिमेंशियाचे रुग्‌ण आहेत. सामाजिक, आर्थिक, धार्मिक सांस्कृतिक असं कुठलंही बंधन या आजाराला नाही. गरीब, श्रीमंत, सुशिक्षित, अशिक्षित अशा कुणालाही हा आजार होऊ शकतो.

मानसोपचारतज्ज्ञ आणि न्यूरोलॉजिस्ट या रोगाचं निदान करतात. आजाराचं निदान करण्यासाठी एक प्रश्नावली असते. त्या प्रश्नाची उत्तरं घेतली जातात. त्यावरून एखाद्याला डिमेंशिया आहे का, हे शोधता येतं. याशिवया, MRI करूनही या आजाराचं निदान करतात.


का होतो अल्झायमर ?

अल्झायमरची अनेक कारणं आहे. कुठल्याही एका कारणामुळेच तो होतो, असं नाही. काही कारणं खालीलप्रमाणे आहेत.

वय : 60 वर्षांपेक्षा जास्त वय, हे डिमेंशियाचं कारण असू शकतं.

समाजापासून दुरावणे : लोकांमधली उठबस, संवाद कमी होणे किंवा इतर निवृत्ती, शहर किंवा देश बदलणे, यासारख्या कारणांमुळे आलेला एकटेपणा यामुळेही अल्झायमर होऊ शकतो.

हृदयाशीसंबंधित आजार : मधुमेह, रक्तदाब यासारख्या हृदयाशी संबंधित आजार असणाऱ्या व्यक्तींना हा आजार होऊ शकतो.

ब-जीवनसत्त्वाची कमतरता : डॉक्टर सांगतात भारतात बहुतांश शाकाहारी खाद्यसंस्कृती आहे. त्यामुळे आपल्या जेवणात ब जीवनसत्त्वाची कमतरता असते. विशेषत महिलांमध्ये आणि अल्झायमर होण्याचं हेदेखील एक कारण आहे.


अल्झायमर चे टप्पे

अल्झायमर हा आजार पूर्णपणे बरा होत नाही. पण, काही औषधं आणि उपचारांच्या माध्यमातून आजार स्थिर ठेवता येतो. म्हणजे तो वाढत नाही. त्यामुळे सुरुवातीच्या स्टेजमध्येच रुग्णाला योग्य उपचार मिळाले तर रुग्णाला 10-15 वर्ष किंवा त्याहूनही जास्त काळ सामान्य आयुष्य घालवता येतं.

या आजाराविषयी सांगताना डॉक्टर सागर मुंदडा सांगतात, "अल्झायमरमध्ये जसजसं वय वाढतं तसा मेंदूचा आकार लहान होत जातो. मेंदुतल्या वळ्या कमी होत जातात. यामुळे विसरभोळेपणा येतो. अल्झायमर झालेल्या व्यक्तींना काही तासांपूर्वी घडलेल्या गोष्टींचा विसर पडतो."

या आजाराच्याही काही स्टेजेस असतात. या स्टेजसविषयी अधिक माहिती देताना डॉ. सागर सांगतात, "आजाराच्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये रुग्णाला नुकत्याच घडून गेलेल्या गोष्टी आठवायला त्रास होतो. उदाहरणार्थ सकाळी काय खाल्लं हे दुपारी आठवत नाही. ही सुरुवातीची स्टेज मानली जाते."

मात्र, काही रुग्णांमध्ये याआधीही काही लक्षणं दिसतात. विनाकारण चिडचिडण होणे, गाढ आणि शांत झोप न लागणे, कुठल्याच गोष्टीत आनंद न वाटणे, नैराश्य येणे, अतीविचार करणे हीदेखील अल्झायमर किंवा डिमेंशियाची अतिशय सुरुवातीची लक्षणं असू शकतात. मात्र, ही प्रत्येकच रुग्णामध्ये दिसतीलच असं नाही.

यापुढच्या स्टेजेसविषयी डॉ. सागर सांगतात, "आजाराची पुढची स्टेज असते ज्यात क्रमाने कराव्या लागणाऱ्या गोष्टी करण्यात रुग्णाला अडचणी येतात. उदाहरणार्थ भाजी करायची असेल. तर ती कुठल्या क्रमाने करायची, हे रुग्णाला आठवत नाही.

गाडी चालवणे, कपडे घालणे यासारख्या गोष्टी ज्यात एकानंतर दुसरी क्रिया एका विशिष्ट क्रमाने कराव्या लागतात, त्या त्यांना जमत नाही. या पुढचा टप्पा म्हणजे रुग्ण घराच्याच व्यक्तींना ओळखत नाही किंवा ओळखलं तर दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने ओळखतात. चेहरा बघून आपण या व्यक्तीला ओळखतो असं त्यांना वाटतं. पण नाव आठवत नाही. घरचा पत्ता आठवत नाही. पाठ असलेले मोबाईल नंबर आठवत नाही. या स्टेजपर्यंत उपचार मिळाले नाही तर रुग्णांना दिवस आहे की रात्र, तारीख, महिना, वर्ष हेसुद्धा लक्षात राहत नाही."

डिमेंशियाच्या दुसऱ्या टप्प्यात रुग्णाची चिडचिड वाढते, तो कपडे घालायला विसरतो आणि तिसऱ्या स्टेजमध्ये तो पूर्णपणे इतरांवर अवलंबून राहतो. म्हणजे घरचा पत्ता आठवत नाही, त्यामुळे एकट्याने घराबाहेर पडता येत नाही. आंघोळ कशी करायची, आधी साबण लावायचा की पाणी हेही विसरतो. त्यामुळे आंघोळ घालावी लागते. आता टॉयलेटला जायचं आहे, याची सूचना मेंदूकडून मिळत नाही. त्यामुळे कुठेही सू-शी होते. अशावेळी डायपर वापरावे लागतात.

स्मृतीभ्रंशाच्या या स्टेजेस असल्या तरी याच क्रमाने प्रत्येक रुग्णाला त्रास होतो, असं नाही. अनेक रुग्ण कित्येक वर्ष पहिल्या स्टेजमध्येच असतात. तर काही रुग्णांमध्ये चार महिन्यातच त्रास वाढतो.


डॉक्टरांकडे कधी जायचं ?

याआधी सांगितल्याप्रमाणे हा ज्येष्ठ नागरिकांना होणारा आजार आहे. तेव्हा डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार वयाच्या पन्नाशीनंतर प्रत्येकाना दर सहा महिन्यांनी ब्लड टेस्ट करायला हवी. रुटीन चेकअप करायला हवं. यात लिव्हर प्रोफाईल, किडनी प्रोफाईल, व्हिटॅमिन बी-12, व्हिटॅमिन डी यांची टेस्ट करायला हवी. मात्र, काही गोष्टी अशा आहेत की ज्या जाणवल्यावर डॉक्टरांचा सल्ला नक्की घेतला पाहिजे.

लहान-लहान गोष्टींचा विसर पडत असेल. उदाहरणार्थ 1000 लिहिताना एकावर किती शून्य लिहायचे ते विसरणे. लोकांची नावं विसरणे. कुलुपाची नेमकी किल्ली कोणती, ते विसरणे, गाडीची चाबी फ्रिजमध्ये ठेवणे.

कारण नसताना सारखी चिडचिड होत असेल.

कुठल्याच गोष्टीत आनंद न वाटता नैराश्य येत असेल. कुठल्याही कामात सहभागी होण्याची इच्छा होत नसेल.

अशी काही लक्षणं असल्यावर डॉक्टरांची मदत नक्की घ्यावी. यापैकी एक किंवा त्यापेक्षा जास्त लक्षणं असल्यावर तो डिमेंशिया किंवा अल्झायमर असेलच असं नाही.

कदाचित काही मानसिक ताण किंवा इतरही आजार असू शकतात. मात्र, त्याच योग्य निदान डॉक्टरांकडे गेल्यावरच होऊ शकतं. त्यामुळे एखादी गोष्ट क्षुल्लक आहे, असं म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही.


अल्झायमर रुग्णांची काळजी कशी घ्यावी

अल्झायमर झालेला रुग्ण गोष्टी विसरतो. त्यामुळे त्याला वारंवार गोष्टी लक्षात आणून द्याव्या लागतात. हे करताना सर्वात महत्त्वाचा ठरतो तो संयम. अल्झायमर रुग्णाला प्रेमाची आणि आपुलकीची गरज असते.

व्यक्ती जेव्हा लहान-लहान गोष्टी विसरायला लागतो त्यावेळी कुटुंबीयांना त्याचा खूप त्रास होतो आणि रुग्णाबरोबरच त्याच्या कुटुंबीयांचीही चिडचिड वाढते. त्यामुळे अल्झायमरचा रुग्ण म्हणजे लहान बाळ हे कायम लक्षात ठेवून शांतपणे प्रत्येक गोष्ट सांगणं गरजेचं असतं.

तुम्ही आता काही कामाचे नाहीत, एकच गोष्ट कशी वारंवार सांगावी लागते, असं म्हटल्याने रुग्णाचं मानसिक खच्चीकरण होत असतं. अशा रुग्णांचा तिरस्कार करणे, थट्टा-मस्करी करणे योग्य नाही. त्यांना कुटुंबाच्या आणि एकूणच समाजाच्या पाठिंब्याची गरज असते.


अल्झायमर ग्रस्त रुग्ण आणि कुटुंब

आजारपण म्हटलं की रुग्णाबरोबरच त्याच्या कुटुंबालाही त्याचा त्रास होतो. मात्र, अल्झायमर या आजारात रुग्णापेक्षा कुटुंबीयांना जास्त त्रास होतो. अल्झायमर झालेला रुग्ण गोष्टी विसरतो. पण, कपडे घालायला विसरणे, कुठेही नैसर्गिक विधी करणे, वस्तू जागेवर न ठेवणे या सगळ्या गोष्टींचा त्याच्या कुटुंबीयांना अतिशय त्रास होत असतो. रुग्णाची चिडचिड वाढते. अशावेळी कुटुंबीयांचा संयम संपतो.

डॉ. मिश्रा म्हणतात, "पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीत घरी कुणीतरी सतत असायचं. त्यामुळे म्हाताऱ्या माणसांची, रुग्णांची काळजी घेतली जायची. मात्र, आज परिस्थिती बदलली आहे. विभक्त कुटुंब झालेली आहेत. स्त्रियासुद्धा घराबाहेर पडल्या आहेत. शहरातली घरं छोटी झाली आहेत. अशावेळी घरात एखादा अल्झायमर झालेली व्यक्ती असेल तर तिचा सांभाळ करणं फार अवघड होतं."

दुसरं म्हणजे हा खूप खर्चिक आजार आहे. डिमेंशियाच्या रुग्णांना सारखे डायपर वापरावे लागतात. वृद्धांचे डायपर महाग असतात. शिवाय, घरात सगळे कामावर जाणारे लोक असतील तर रुग्णासाठी केअर टेकर ठेवावा लागतो, त्याला 8 तासांचे 700 ते 800 रुपये मोजावे लागतात. म्हणजे अशा रुग्णांसाठी महिन्याला 30 ते 40 हजार रुपयांचा खर्च येतो.

शिवाय, डिमेंशियाच्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करता येत नाही. कारण विसरभोळेपणाव्यतिरिक्त इतर कुठलाही शारीरिक त्रास त्यांना नसतो. त्यामुळे ते घरीच असतात. ही सगळी परिस्थिती कुठल्याही कुटुंबासाठी कष्टप्रद असते.


रुग्णाची काळजी

डिमेंशिया किंवा अल्झायमरच्या रुग्णांना प्रेम आणि जिव्हाळा अत्यंत महत्त्‌वाचा असतो. याशिवाय संगीत, नृत्य, चेअर योगा, छंद अशा वेगवेगळ्या मिनिंगफुल अॅक्टिव्हिटीज फार महत्त्वाच्या असतात.

डिमेंशिया रुग्णांची संख्या मोठी आहे. त्या तुलनेत त्यासाठीचं काम झालेलं नाही, अशी खंत डॉ. मिश्रा व्यक्त करतात. ते म्हणतात, "या आजारासाठी सरकारी पातळीवर म्हणावे तितके प्रयत्न झालेले नाही. महाराष्ट्रात सरकार मेमरी क्लिनिक सुरू करणार होते. पण ते काम कितपत झालं, याची काहीही माहिती नाही. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये मेमरी क्लिनिक हवं. आरोग्य सेवकांना विशेष प्रशिक्षण हवं."

डॉ. मिश्रा म्हणतात, "डिमेंशियाच्या रुग्णांची संख्या बघता राष्ट्रीय डिमेंशिया धोरणाची गरज आहे. याअंतर्गत प्रत्येक वॉर्डात डिमेंशिया डे-केअर असायला हवं. लहान मुलांना जसं आई-वडील दिवसभर डे-केअरमध्ये ठेवून आपापल्या कामावर जातात. तसेच सेंटर्स डिमेंशिया रुग्णांसाठी हवे.

दुसऱ्या आणि त्यापुढच्या टप्प्यातल्या रुग्णांसाठी असिस्टेड लिव्हिंग केअर होम्स हवेत. जिथे रुग्णांची 24 तास काळजी घेतली जाईल. त्यानंतर होम केअर सर्व्हिस हवी. यात डिमेंशिया आजाराच्या दृष्टीने प्रशिक्षित आरोग्य सेवक हवे त्या वेळेला घरी येऊन रुग्णांची तपासणी करू शकतात."

भारतात आज घडीला केवळ दहा डिमेंशिया केअर होम्स आहेत.

याशिवाय केअर गिव्हरना प्रशिक्षण देण्यासाठी एक दीर्घकालीन योजना सरकारने आखायला हवी. इतकंच नाही तर मेडिकल कॉलेजसमध्ये डॉक्टर आणि नर्सेसना डिमेंशिया उपचारासंबंधीचं प्रशिक्षण देणंही गरजेचं असल्याचं डॉ. मिश्रा यांचं म्हणणं आहे.

ते म्हणतात, "भारतात डिमेंशिया एमडी डॉक्टर नाहीत. म्हणजेच भारतात डिमेंशिया स्पेशलिस्ट नाहीत. एमबीबीएसच्या अभ्यासक्रमात डिमेंशिया आजार हा अभ्यासक्रमाचा खूप छोटा भाग आहे. मानसोपचारामध्ये एमडी करणाऱ्या डॉक्टरांनाच या विषयाची सविस्तर माहिती अभ्यासक्रमात असते. या सगळ्यामधून एक चांगलं वातावरण तयार होईल."


प्रतिबंधात्मक उपाय

डिमेंशिया कधीही होऊ नये, यासाठी खात्रीशीर उपाय नाही. मात्र, जीवनशैलीमध्ये काही बदल करून हा आजार दूर ठेवता येतो.

हृदय निरोगी ठेवा

चांगली झोप घ्या

जीवनशैली उत्तम ठेवा

रोज किमान 30 मिनिटं योगा, व्यायाम, सायकलिंग, रनिंग असा एकतरी व्यायाम प्रकार करा

दारू, सिगारेट, तंबाखू, अशी व्यसनं टाळा

मिनिंगफुल अॅक्टिव्हिटीजमध्ये स्वतःला गुंतवा.

सकस आणि ताजं अन्न खा. साखर, मीठ यांचा आहारात कमी प्रमाणात समावेश करा.

डॉ. मिश्रा सांगतात, "एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा म्हातारपणात होणारा आजार असला तरी त्याची सुरुवात 40 ते 50 व्या वर्षापासून होते. माझं वय 40 ते 50 च्या घरात असेल आणि मी खूप व्यसनं करत असेन, सतत पिझ्झा, बर्गर खात असेन, पुरेशी झोप घेत नसेन किंवा दिवसातला रिकामा वेळ मिनिंगफुल अॅक्टिव्हिटीमध्ये न घालवता तासनतास टिव्ही किंवा मोबाईलसमोर बसत असेन तर अशा प्रकारचे त्रास होणार, हे निश्चित."

पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये तर 40-50 वर्षांच्या लोकांमध्येही हे आजार दिसू लागले आहेत. त्यामुळे आपणही यातून शिकवण घेऊन घरात कुणाला विसरभोळेपणा आहे, याची लाज वाटून न घेता त्यावर उपचार घेतले पाहिजे.


डिमेंशिया किंवा अल्झायमर झालेली व्यक्ती स्वतः सगळं विसरत असते. त्यामुळे तिच्या काहीच लक्षात राहत नाही. अशावेळी तुम्ही तिच्यावर योग्य उपचार केले नाही तर तो आपल्या प्रिय व्यक्तीवर अत्याचार ठऱत असतो.


- नूतन कुलकर्णी
बीबीसी मराठी
bbc.com

Wednesday, 15 September 2021

कशी येते मॅच्युरिटी ?


"परिपक्व व्यक्तिमत्व"


१) माणूस जेव्हा दुसऱ्यांना बदलण्याऐवजी स्वतःमध्ये बदल घडवायला सुरुवात करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.


२) माणूस जेव्हा जास्त बोलण्याऐवजी समोरच्याचे ऐकून घ्यायला शिकतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.


३) माणूस त्याच्या समोरचे लोक जसे आहेत तसे त्यांना स्वीकारायला सुरुवात करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.


४) प्रत्येक माणसाचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा स्वतःचा असा विशिष्ट दृष्टिकोन असतो हे समजायला लागते तेव्हा माणसाकडे मॅच्युरिटी येते.


५) प्रत्येकवेळी आपणच शहाणे असल्याचा आविर्भाव आणणे माणूस जेव्हा बंद करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.


६) माणूस काळानुसार बदल स्विकारुन पुढे जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.


७) माणूस आपल्याजवळ जे आहे त्यात आनंद मानून तक्रारी करणे बंद करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.


८) माणूस जेव्हा जबाबदाऱ्या घ्यायला आणि चुकांमधून पुढे जायला शिकतो, तसेच आपल्या चुकांचे खापर इतरांवर फोडणे बंद करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.


९) माणूस इतरांवर जळण्याऐवजी स्वतःमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.


१०) माणूस इतरांची स्वतःसोबत तुलना बंद करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.


*११) माणूस रागावर नियंत्रण ठेवून समजूतदारीने वागण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.*


*१२) माणूस निर्णय घेतल्यानंतर चंचलपणे न वागता घेतलेल्या निर्णयाच्या बाजूने उभे राहायला शिकतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते. परिपक्व असणे म्हणजेच प्रत्येक प्रसंगात समजूतदारीने निर्णय घेणे !*

             

(कॉपी पेस्ट)

Saturday, 4 September 2021

उन्माद

या मानसिक विकृतीचे विविध प्रकार असून ते मज्‍जाविकृतीच्या सदरात पडतात कारण चित्तविकृतींच्या बाबतीत आढळून येणारे व्यक्तिमत्त्वाचे गंभीर विघटन या विकृतीच्या बाबतीत झालेले नसते. इंग्रजीत ह्या विकृतीस ‘हिस्टेरिया’ म्हणतात. प्राचीन ग्रीक वैद्य हिपॉक्राटीझ याची अशी समजूत होती, की तरुण स्त्रियांच्या अतृप्त गर्भाशयाचे (हिस्टेरा = गर्भाशय) ऊर्ध्व दिशेने चलनवलन होऊ लागल्यामुळे या विकृतीची लक्षणे उद्‍‍भवतात. ही कल्पना अर्थातच चुकीची ठरली आहे कारण लहान मुलांमध्ये, पौगंडावस्थेतील किशोरांमध्ये, त्याचप्रमाणे सैनिक, लेखनिक, तारखात्यातील संदेशप्रेषक वगैरे व्यक्तींमध्येही या विकृतीची काही लक्षणे आढळलेली आहेत. तथापि ‘हिस्टेरिया’ ही आता अन्वर्थक नसलेली संज्ञाच या विकृतीस रूढ होऊन बसली आहे.


लक्षणे व प्रकार : या विकृतीच्या लक्षणांच्या मुळाशी प्रत्यक्ष शारीरिक-इंद्रियांतील स्‍नायूंमधील वा केंद्रीय मज्‍जासंस्थेतील बिघाड नसतो परंतु रुग्णाच्या इंद्रियांची, कर्मेंद्रियांची, तसेच प्रत्यभिज्ञा, स्मृती वगैरे मनोव्यापारांसंबंधीची विक्रिया अथवा अक्षमता तीत निर्माण होते. त्यामुळे ही कार्यिक अक्षमता म्हणजे केवळ ढोंग वा कामचुकारपणाने केलेली बतावणी होय, असे लोकांना वाटण्याचा संभव असतो. परंतु असे समजणे बरोबर नाही कारण या अक्षमतेपायी व्यक्ती सुखाला पारखी होत असते इतकेच नव्हे, तर काही लक्षणे इतकी गंभीर असतात, की त्यापायी व्यक्तीच्या जिवास अपाय होण्याचाही संभव असतो.


या विकृतीच्या लक्षणांचे (१) कारक इंद्रियांशी संबंधित, (२) वेदनेंद्रियांशी संबंधित, (३) अंतस्थ इंद्रियांशी संबंधित आणि (४) मनोव्यापारांशी संबंधित असे प्रकार पडतात. हातापायांचा वा इतर स्‍नायूंचा लुळेपणा, स्‍नायुकंप, वांब येणे, सांधे जखडणे, स्वरयंत्राची अक्षमता, खुदूखुदू हसल्यासारखी शरीर चेष्टा होणे ही कारकइंद्रियांशी संबंधित लक्षणे होत.


त्वचेच्या विशिष्ट भागापुरतीच आग, कधी या तर कधी दुसऱ्याच एखाद्या भागाची स्पर्शबधिरता, अचानक झिणझिण्या, डोळे किंवा कान अगदी सुस्थितीत असूनही पूर्ण किंवा निवडक गोष्टींपुरतेच अंधत्व किंवा बहिरेपण, स्वतःच्या हालचालींचे वेदनच लुप्त होणे, डोकेदुखी तसेच पाठदुखी ही वेदनेंद्रियांशी संबंधित लक्षणे होत.


अंतस्थ इंद्रियांबाबतच्या लक्षणांमध्ये समाविष्ट होणारी या विकृतीची लक्षणे म्हणजे अन्न घशाखाली न उतरणे, श्वासनलिकेची विक्रिया होऊन श्वास घेण्यास त्रास वाटणे, खोकल्याची उबळ, गुदमरल्यागत वा गळा भरून आल्यागत अवस्था, वांतीची भावना, बद्धकोष्ठ, हृदयाची धडधड, हृदयाच्या वरच्या बाजूस छातीत दुखणे गर्भारपणाची भावना (वंध्या स्त्रियांना) वगैरे होत.


उन्माद विकृतीच्या मनोव्यापारांच्या पातळीवरील लक्षणांमध्ये स्मृतिलोप, निद्राभ्रमण, तंद्रावस्था, आपण कोण व कुठचे आहोत, हेच विसरून जाऊन आत्मविस्मृतिपूर्वक भ्रमण व व्यवहार, मूर्च्छा वगैरेंचा समावेश होतो. ही मूर्च्छा फक्त जागेपणीच व साधारणतः इतरांच्या उपस्थितीत येते. स्वतःस इजा न होईल अशा बेताने व्यक्ती जमिनीवर पडते, दातखीळ वा तोंडास फेस नसतो. या अवस्थेत होणाऱ्या हालचाली म्हणजे एक प्रकारचे नाट्य असते व या मूर्च्छेनंतर, अपस्माराच्या झटक्यानंतर येतो तसा थकवा न येता, उलट मोकळे वाटते. एकाच शरीरात दोन वा अधिक मने वा व्यक्ती, अथवा दुहेरी व्यक्तिमत्त्व तसेच व्यक्तिमत्त्व बाहुल्य हेही याच विकृतीचे अत्यंत नेत्रवेधक व नाट्यपूर्ण प्रकार होत.


उन्मादाची लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तींचे व्यक्तिमत्त्व साधारणतः पुढीलप्रमाणे असल्याचे आढळते : त्यांच्या भावनिक प्रतिक्रियांमध्ये संयम कमी असतो व लहान मुलांप्रमाणे त्या प्रतिक्रिया अपरिपक्‍वतेच्या निदर्शक असतात. आप्त व मित्र यांबाबत त्यांची वागणूक लहरी कधी खूप प्रेमाची तर कधी द्वेषपूर्ण असते. इतरांनी आपल्याकडे लक्ष द्यावे व आपले कौतुक करावे, सहानुभूती दर्शवावी, अशी त्यांची अपेक्षा असते. संघर्षजनक समस्या जबाबदाऱ्या टाळण्याकडे तसेच त्या दुसऱ्यावर ढकलण्याकडे त्यांची प्रवृत्ती असते. त्यांच्या भावनिक प्रतिक्रियांमध्ये उथळपणा व इतरांशी असलेल्या संबंधांमध्ये हिकमतीपणा व नाटकीपणा असतो. या व्यक्ती खूप सूचनक्षम असतात. त्यांना चिंताकुलतेचे अधूनमधून झटके येत असतात.


कारणमीमांसा: या विकृतीची लक्षणे शारीरिक दोषमूलक नसतात. काही काही लक्षणे सूचनवशतेमुळे निर्माण होतात, असे बॅबिन्स्की याने दाखवून दिले आहे. प्येअर झाने (१२५९–१९४७) याच्या मते ही विकृती म्हणजे मानसिक अवसन्नतेचाच एक प्रकार होय. त्याची उपपत्ती अशी आहे : (अ) काही व्यक्तींमध्ये आनुवंशिक कारणांमुळे मानसिक शक्तीची कमतरता असते. (ब) त्यातच मनोभावात्मक आघांताची किंवा ताणांची भर पडल्यामुळे, अशा व्यक्तींच्या मानसिक जीवनाचे संश्लेषण व्हावे तसे होत नसते. (क) अशा स्थितीत जर तीव्र मानसिक आघात करणाऱ्या अथवा मनःशक्तीचा अतोनात व्यय करणाऱ्या घटना घडल्या तर त्या घटना जाणिवेच्या प्रवाहात सामावून घेतल्या जाण्याऐवजी संपूर्णपणे किंवा अंशतः विलग म्हणजे वियुक्त राहतात. या वियोजन प्रक्रियेमुळे व्यक्तीच्या अंतरंगात जणू एक निराळी संघटना बनते व व्यक्तिमत्त्वात कार्यात्मक एकात्मता येत नाही. व्यक्तिमत्त्वाचा असा विलग राहिलेला भाग स्वतंत्र रीत्या कार्य करू लागतो व प्रसंगविशेषी या विकृतीच्या लक्षणांच्या रूपाने डोकावतो.


परंतु हे वियोजन का घडून येते ? झाने याच्या उपपत्तीत या प्रश्नाचे उत्तर नाही ते सिग्मंड फ्रॉइड (१२५६–१९३९) याने देण्याचा प्रयत्‍न केला.त्याची उपपत्ती अशी : व्यक्तीच्या अप्रशस्त प्रेरणा व वासना, तिच्या भावजीवनात दुःखदायक वा लज्‍जास्पद खळबळ उत्पन्न केलेल्या प्रसंगांच्या स्मृती इत्यादींचा व्यक्तीच्या ‘अहं’शी संघर्ष होतो व अहंकडून अर्धवट दडपल्या गेलेल्या व निराळी संघटना करून राहिलेल्या प्रेरणा, वासना व स्मृती नानाविध लक्षणांची रूपे घेतात व बोधमनात डोकावू लागतात. अर्थात त्यांचे ‘रूपांतरण’ झालेले असते. या दृष्टीने पहाता, ही विकृतिलक्षणे प्रयोजनगर्भ व अर्थपूर्ण असतात.


उन्माद विकृतीच्या कोणत्या लक्षणांचा अवलंब व्यक्तीकडून होईल हे दोन गोष्टींवर अवलंबून असते : (१) व्यक्तीचा स्वतःचा पूर्वानुभव आणि (२) इतरांचे तिच्या नजरेस पडलेले वर्तन. स्वतःला हवे असणारे कौतुक व सहानुभूती मिळवायला अथवा नको असलेले भावनाक्षोभक प्रसंग टाळायला अमुक अमुक प्रकारची शारीरिक तक्रार अथवा अमुक प्रकारची अवस्था उपयोगी पडेल, हे तिने लहानपणाच्या स्वानुभवांवरून तसेच इतरांचे वर्तन पाहून हेरलेले असते व मग स्वयंसूचनेद्वारा ती ती लक्षणे त्या त्या व्यक्तीत दृग्गोचर होऊ लागतात.


चिकित्सा: ही विकृती दूर होऊ शकते. रुग्णाचा मंत्रतंत्रादींवर विश्वास असला, तर त्याच्या सूचनवशतेचा फायदा घेऊन मंत्रतंत्रादींचा उपयोग करता येतो. काहीतरी औषध देणे वा दिल्यासारखे करणे तसेच वेळप्रसंगी शस्त्रक्रियेचे नाटक करणे म्हणजे अप्रत्यक्ष सूचनतंत्र वापरणे हेही उपयोगी पडू शकते. प्रत्यक्ष सूचनांचाही उपयोग होतो. संमोहनपूर्वक सूचनांचाही उपयोग होतो तथापि केवळ सूचनोपचार हा चिरपरिणामी ठरत नाही. कारण जोवर स्वतःच्या विकृतीचे अबोध मनात असलेले मूळ रुग्णाच्या बोध मनात आणले जात नाही तोवर त्याची विकृती या नाहीतर दुसऱ्या कोणत्यातरी लक्षणांच्या रूपाने शिल्लकच राहते. काहींच्या मते इतर कोणत्याही उपायांनी न सुधारणाऱ्या रुग्णांच्या बाबतीतच सूचनतंत्र वापरावे, एरव्ही वापरू नये कारण हे रुग्ण आधीच सूचनक्षम असतात व सूचनतंत्राने ते अधिकच सूचनक्षम होण्याचा संभव असतो.


रोग्याच्या मनातील (त्याची त्यालाच जाणीव नसलेलेही) काढून घेणे हा चिकित्सेचा उत्तम मार्ग होय. त्यासाठी त्याला संमोहित करून (हिप्‍नोअनॅलिसिस) किंवा औषध देऊन (नार्कोअनॅलिसिस) अथवा जागृत अवस्थेत मुक्तपणेबोलावयास लावून (सायकोअनॅलिसिस) आणि त्याबरोबरच त्याच्या स्वप्नांचा अन्वयार्थ लावून विश्लेषण करता येते. यांपैकी शेवटचा मार्ग श्रेयस्कर ठरतो कारण त्यायोगे रुग्णाचे मनोविरेचन होते व शिवाय स्वतःच्या विकृतीच्या मुळाशी असलेले संघर्षप्रसंग रुग्णाचे रुग्णालाच समजू लागतात. मात्र मनोविश्लेषण बरोबरच रुग्णाच्या ठिकाणी मानसिक परिपक्‍वता आणणे, त्याची स्वतःकडे व इतरांकडे पाहण्याची दृष्टी सुधारणे, त्याच्या सवयींत व अभिवृत्तींत बदल घडवून आणणे, हेही आवश्यक असते. यांशिवाय रुग्णाशी संबंधित असलेल्या व्यक्तींतही बदल घडवून आणणे पुष्कळदा आवश्यक असते.


अकोलकर, व. वि.

मराठी विश्वकोश

Thursday, 2 September 2021

माणूस “मागे” असण्याची २३ कारणे


1. कमी प्रवास - 

प्रवास केल्याने जग कळते, कल्पना सुचतात, मार्ग सापडतात व प्रगती होते. मराठी माणूस आर्थिक स्थितीमुळे फारसा प्रवास करताना दिसत नाही, अनेक औद्योगिक प्रदर्शनात मराठी माणूस दिसत नाही.


2. अति राजकारण -

सर्वतजास्त मराठी माणूस राजकारण वेडा आहे. राजकीय नेत्यांच्या सभेला आपला कामधंदा सोडून लाखोंच्या संख्येने येणारा मराठी माणूसच असतो. यात व्यापारी समाजातला एक तरी माणूस दिसतो का? मी काय करतो आहे या पेक्षा लोकांनी काय केले, काय करतात यात जास्त लक्ष.


3. दोनच हात कमावणारे -

सर्वसाधारण मराठी कुटुंबात एकच व्यक्ती कमवते. कुटुंबातील जास्तीत जास्त लोकांनी काम केले पाहिजे.


4. सर्वांची तोंडे वेगळ्या दिशेला –

कुटुंबात एकी नसते. बाप एका दिशेला, मोठा मुलगा एका दिशेला तर लहान भाऊ तिसरीकडेच. प्रत्येक कुटूंबात एकी पाहिजे.


५)  खोटं बोल पण रेटून बोल –

सगळ्या थापा एकमेकांना गंडवण्याच्या गोष्टी, खरे सांगण्यासारखे नसतेच म्हणून खोट बोलावे लागते. मी हे करीन ते करीन या स्वप्नातच आयुष्य संपते, पण मी हे करतोच असा निश्चय घेत नाहीत.


६) आहार व आरोग्याकडे दुर्लक्ष –

आरोग्याकडे अत्यंत दुर्लक्ष, महागाईमुळे उपचारही परवडत नाही, थातुरमातुर उपचार केले जातात. योग्य आहार नाही, व्यसनांचे प्रमाण प्रचंड आहे. भरपूर पैसा व्यसनातच संपतो.


७) आर्थिक निरक्षरता –

पैसा काय आहे ? तो कसा वापरायचा ? शेअरमार्केट, डिमॅट, फॉरेन एक्सचेंज, डॉलर, आय टी याची खूप कमी माहिती शिकलेल्या लोकांनाही नाही. ९०% महिलांचे तर साधे पॅनकार्ड सुद्धा नसते.


८) दूरदृष्टीचा अभाव –

पुढील ५, १०, २० वर्षाच्या योजना आखाव्या लागतात. त्यावर आजपासूनच काम करावे लागते. अशा दूरदृष्टीमुळे नियोजन होते व माणसे कामाला लागतात.


९) ऐतिहासिक स्वप्नात –

अजूनही मराठी माणूस ऐतिहासिक स्वप्नात जगत आहे. जास्तीजास्त वेळ फेसबुक व्हाट्सएप वर कोणी कधी काय केले ते शोधत फिरतो, आणि स्वतःचा वेळ वाया घालवतो, तेव्हा सत्य आणि सध्याच्या परिस्थितीचे भान ठेऊन उद्योग करून पैसा कमावला पाहिजे.


१०) गृहकलह, कोर्टकचेरी –

गृहकलहाचे प्रमाणही प्रचंड आहे. भावाभावातचं वाद. संपत्तीवरून भावकीत वाद , वादावादी, मारामारी, खून, कोर्टकचेऱ्या सामंजस्यपणे निपटावे व प्रगतीच्या मार्गे लागावे.


११) समाज अर्थपुरवठा पद्धत –  

नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी अत्यंत कमी व्याज दरात किंवा बिनव्याजी ताबडतोब अर्थपुरवठा करण्याची व समाजातील सर्वाना वरती आणण्याची पद्धत गुजराती, सिंधी, समाजात आहे. तशी मराठी समाजात आढळत नाही.

आता तर सरकार ने नवीन व्यावसायिकांसाठी 5 लाखांपर्यंत कर्जयोजना सूरु केली आहे, ज्यात बिना गैरेंटी कर्ज उपलब्ध आहे, पण त्याबद्दल काहीच माहिती करून घेत नाहीत.


१२) जनरेशन गॅप –

खूप मोठा जनरेशन गॅप कुटुंबात जाणवतो. एखादा हुशार तरुण उद्योग करतो म्हटले कि त्यालाच येड्यात काढले जाते. जुन्या लोकांच्या डोक्यातून नोकरी अजून जात नाही.


१३) ज्ञानापेक्षा सर्टिफिकेट –

प्रत्यक्ष व प्रॅक्टिकल ज्ञानापेक्षा पदवीच्या सर्टिफिकेटला जास्त महत्व आहे. काहीही करून पदवी मिळवायची. त्यामुळे सिव्हिल इंजिनियर झाले बेरोजगार…. व बाहेरून आलेला प्लंबर, गवंड्यांचे काम करून महिना ५० हजार कमवतो.


१४) धरसोड वृत्ती –

हे प्रमाण प्रचंड आहे. थोडे दिवस खासजी संस्थेत नोकरी… कामाच्या अगोदरचं पगार किती देणार ? विचारायची प्रवृत्ती…हे काम केले तर लोकं काय म्हणतील??? अशा धरसोड वृत्तीमुळेच आयुष्यातील १० वर्ष निघून जातात. एकदाच ठसून एखाद्या क्षेत्रात टिकून राहिले पाहिजे.


१५) कष्टाची लाज –

विशेषतः सुशिक्षित तरुणांना कष्टाची लाज वाटते. Easy Money चे खुळ डोस्क्यात थैमान घालतयं. मी एमए, बीई, बीएड, झालोय म्हणजे मला इस्त्रीचे कपडे घालून फिरण्याचा अधिकार आहे असे समजतात. स्वतःच्याच घरातही कामं करण्यास लाजं वाटते.


१६) फालतू बाबींना महत्व –

एकत्र येणे, प्रगती साधणे, उद्योग उभारणे हे मुख्य विषय राहिले बाजूला… पण मराठी माणूस अजून लग्नपत्रिकेत नाव नाही टाकले, लग्नात आहेर नाही केला, होर्डिंग ववर नाव माही टाकले, अशा फालतू बाबींमध्ये अडकला आहे.


१७) दुसऱ्यांच्याच अपयशात आनंद –

भावाचा ऊस जळाला, त्याला पाण्याची नाही दिली, त्याची म्हैस गेली कि दुसऱ्या भावाला भलताच आनंद व उकळ्या फुटतात…मित्रांचे व्यवसायात नुकसान झाले, बरं झालं मी आधीच सांगत होतो नको करू, अगदी आपल्या सख्ख्या भावाचं चांगले झाल्यावरही बघवत नाही हे “आश्चर्य”…!!! मराठी माणूसच मराठी माणसाचा शत्रू आहे…!!!


१८) इंग्रजी कच्चे –

मराठीचा अभिमान जरूर बाळगावा पण जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी व पुढे जाण्यासाठी अस्सलिखित इंग्रजी बोलणे, लिहिणे, वाचणे आलेच पाहिजे. अति उत्तम इंग्रजी आलेच पाहिजे. इंग्रजी बोलता येत नाही म्हणून इंग्रजीवर राग दाखवून काही होणार नाही.


१९)  संवाद कौशल्याचा अभ्यास –

जीवनात व उद्योगात पुढे जाण्यासाठी आपण दुसऱ्यांशी संवाद करतो ह्या कौशल्याचे खूप मोठे महत्त्व आहे. मोठे प्रोजेक्ट मिळवणे, काम मिळवणे, विविध स्थानिक अधिकारी वर्ग इतर व्यक्ती यांनाही आपण प्रत्यक्ष पत्रव्यवहार, इ-मेल द्वारे, फोनवर कसा उत्कृष्ट संवाद साधला पाहिजे हे शिकले पाहिजे.


२०) चाकोरी मोडत नाही –

अजूनही जुन्याच पद्धतीने काम चालू आहे. त्यामुळे प्रगती होत नाही, मतदार संघात काहीही काम न करता कित्येक दशके तोच खासदार, आमदार, नगरसेवक, झेडपी – पंचायत – ग्रामपंचायत सदस्य निवडून देण्याचे / येण्याचे प्रकार दिसतात.

 त्या जागी नविन उत्साही चांगल्या ईमानदार व्यक्तीस निवडुन देऊन बदल करायला तयार होत नाहीत. छोट्याशा स्वार्था साठी गुलामी चमचेगीरी करायची वाईट सवय जात नाही.


२१) जाती प्रथा –

(फालतू प्रथा) 21व्या शतकात सुद्धा जाती प्रथेचा पगडा प्रचंड आहे. एकाच गावात व एकाच गल्लीत १० वेगवेगळ्या जातीचे पुढारी आहेत. संपूर्ण समाज अनेक धर्म – पंथ – जात – पोटजातीत विभागला गेला आहे, त्यामुळे समाजाची ताकद क्षीण झाली आहे. या धावपळीच्या युगात एक मराठी माणूस म्हणून कोणीच एकत्र यायला मागत नाही. आणि याचा फायदा इतरांना होतो.

अमुक एका जातीत जन्म झाला यासारख्या अर्थशून्य गोष्टींचा मराठी माणसाला; स्वतःची  एक व्यक्ती म्हणून दमडीची अचीव्हमेंट नसताना; चक्क अभिमान वाटतो.


२२) वेळेची किंमत –

वेळेचे महत्व समजलेले नाही. अनेक व्यक्ती आयुष्याच्या वेळेचा प्रचंड अपव्यय करताना दिसतात. बारसे, साखरपुडा, मुलगी बघणे, विवाह, यात्रा, मयत, प्रचार सभा, निवडणूक, वारी, देवदर्शन, राजकारण, या अनेक बाबींसाठी सरासरी वर्षातले १०० दिवसाहून अधिक काळ वाया घालवतात.


२३) ग्राहकाला किंमत न देणे - 

ग्राहक म्हणजे राजा समजला जातो पण अपल्याकडे तसे होत नाही, ग्राहकाला समोर रुबाब दाखवणे, तसेच ऐन कामाच्या वेळेला मोबाईल बंद करून ठेवणे आणि ग्राहकाला दिलेलं वेळ न पाळणे, 10 ची वेळ सांगून 11 ला पोचणे, याने ग्राहक सुद्धा निसटतो. आणि आपला रेफरन्स पुढे कोणाला देत नाही.

*प्रत्येकाने स्वत:च्या विचारसरणीत बदल करा*

*तरच तुमचे  भविष्य बदलेल*


(आर्थिक सल्लागार मकरंद गाडगीळ यांच्या लेखणीतून)

Tuesday, 6 July 2021

मानसिक आजार पळवुन लावण्याची चौदा सूत्रे


🙂*कसल्याही प्रकारच्या निराशेला नाहीशी करणारी चौदा सुत्रे*🙂


1) सतत पॉझीटीव्ह रहा -

कितीही वाईट घडो, नेहमी पॉझीटीव्हच रहायचं!

उदा. “एक डोळा गमावला पण दुसरा डोळा शाबुत आहे,” ज्यामुळे मी हे सुंदर जग पाहु शकतो, देवाची किती कृपा आहे.

प्रत्येक अपयश मला एक संधी देऊन जात आहे.

उदा. जेव्हा लोक आपल्याला टाळतात, आपल्याकडे बघुन नाकं मुरडतात, तेव्हा तर अधिकधिक आकर्षक दिसण्याबद्द्ल, आपण जागरुक होतो.

आपली मस्करी उडवली की, आपला कोणी कळत नकळत अपमान केला की, आपल्यातल्या महत्वकांक्षा जागृत होतात.


2) पॅशन निर्माण करा -

आयुष्यात पोकळी आणि निराशा आली की एक असं पॅशन शोधावं, ज्यासाठी संपुर्ण आयुष्यच पणाला लावावं.

पॅशन म्हणजे अशी एखादी गोष्ट जी गोष्ट न थकता, अगदी उत्साहाने, महिन्याचे तीस दिवस, दिवसातल्या दहा-बारा तासाच्या वर आपण ते करु शकतो, ह्याला म्हणतात पॅशन!

त्या गोष्टीसाठी अक्षरशः आयुष्य झोकुन द्यावं. अगदी स्वतःला विसरायला लावतं, तेच खरं पॅशन!

कोणासाठी व्यापार हे पॅशन असेल, कोणासाठी खेळ हे पॅशन असेल, कोणासाठी भटकंती हेच पॅशन असेल.

त्याच्याशिवाय आपण जगु शकत नाही, आणि मग एके दिवशी जगही आपल्याला त्या एकाच गोष्टीसाठी ओळखु लागतं.

सचिन-क्रिकेट, धीरुभाई-रिलायन्स, अमिताभ-एक्टींग, लता मंगेशकर-गायन, मोदी-नेतृत्व, पटनायक-वाळुची शिल्पे, प्रकाश आमटे-आनंदवन, श्रीश्री रविशंकर गुरुजी – आर्ट ऑफ लिविंग, स्टीव्ह जॉब्ज-गॅझेट्स,

ह्या यादीत आपलंही नाव येऊ शकतं, आपणही आपल्या पॅशनसाठी वेडं बनलो तर!….


३) महिन्याला दोन पुस्तके - 

माझ्या आयुष्यातल्या अत्यंत वाईट आणि पडत्या काळामध्ये मला फक्त आणि फक्त चांगल्या विचारांच्या पुस्तकांनीच तारलं, नाहीतर कदाचित मी आज हा लेख लिहायला शिल्लकच राहीलो नसतो, इतके पुस्तकांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत.

महिन्याला कमीत कमी दोन तरी चांगली पुस्तके तरी वाचुनच काढेन आणि त्यातल्या चांगल्या गोष्टी तात्काळ जीवनात आणेन, हा चंगच बांधावा, आपोआप जे जे हवे ते सारे मिळत जाते, हा माझा स्व-अनुभव आहे.


4) डायरी लिहा - 

दररोज घडलेल्या बर्‍या वाईट घटना आपल्याला बहुमुल्य अनुभव देऊन जातात, त्यांना शब्दबद्ध करत गेलं की जगण्याची रंगत वाढत जाते.

माझ्या मनात चाललेले द्वंद बाहेर काढण्यासाठी मला ह्या डायर्‍यांनी खुप मदत केली. झालेले अपमान, आलेले अपयश, भविष्याच्या चिंता, मनाचं रिकामपण, सगळी मळमळ मी बाहेर काढली, आणि प्रत्येक जखम डायर्‍यांमध्ये जपुन ठेवली, आणि शहाण्या बाळांसारखं त्या सर्वांनीही मला त्रास देणं बंदच करुन टाकलं.

आजही माझ्या कॉम्पूटर मध्ये मी स्वतःलाच लिहलेली शेकडो पत्रं आहेत, जी वाचुन मला आता खुप गंमत वाटते. कधी छोट्यामोठ्या कारणाने मी खचलो की ते वाचुन प्रचंड बळ मिळतं. बॅटरी पुन्हा टणाटण चार्ज होते.


5) जे सुरु केलंय त्याचा शेवट करा - 

हातात घेतलेलं काम पुर्ण करायचं म्हणजे करायचं!

मनावर विजय मिळवण्यासाठी मनाचाच वापर करायचा, काम सुरु होतानाच असं भासवायचं की ते पुर्ण झालेलं आहे, आणि मन गोंधळुन जातं आणि ते पुर्ण करुनच एका जागेवर शांत बसतं!

‘आसान है’ हा यशाचा मुलमंत्र नेहमी लक्षात ठेवायचा!


6) कंफर्ट झोन तोडा -

नवी आव्हाने स्वीकारा - तु मागच्या एक महिन्यामध्ये अशी कोणतीही एक गोष्ट केलीस का, जे तुला येत नाही, जे करण्याची तुला भिती वाटते?


7) कमीत कमी तीस मिनीटे व्यायाम - 

मनाला ताजंतवाणं ठेवण्याचा हुकुमी एक्का आहे, शरीराला व्यायाम करायला भाग पाडायचं, मन आपोआप ताळ्यावर येतं!

जगातल्या प्रत्येक यशस्वी व्यक्तीला हे सुत्र माहित आहे.


8) ध्यान, सर्व समस्यांवर रामबाण उपाय - 

तुझं शारीरीक व्यंग हे तुझ्या आयुष्यात कधीही अडथळा बनु शकत नाही, कारण तु म्हणजे तुझं शरीर नाहीस!

खरा तु तर वेगळाच कोणीतरी आहेस, हे तुला ध्यान करायला लागलं की आपोआप उमगत जाईल.

आतापर्यंत केला नसशील तर एकदा आर्ट ऑफ लिविंगचा हॅपिनेस कोर्स नक्की कर.


9) महिन्याला एक वाईट सवय सोडा - 

आपल्या प्रत्येकामध्ये वाईट सवयी असतात, मी एका महिन्याला एक वाईट सवय सोडायची आहे, आणि एक चांगली सवय जोडायची आहे, असं प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला अंतर्मनाला सांगतो. महिनाभर त्याची कसोशीने अंमलबजावणी करतो.


10) आपल्या आजुबाजुला प्रसन्नतेचा शिडकावा करा -

घरातुन बाहेर पडण्याआधी एकदा आरशात बघुन स्वतःलाच वचन देतो की आज माझ्या संपर्कात येणार्‍या प्रत्येक व्यक्तीला मी आनंद आणि प्रसन्नता वाटणार आहे. प्रत्येकाच्या चेहर्‍यावर हसु फुलवणार आहे.

कधी एखाद्या उपाशी माणसाला पोटभर खावु घालावं, कधी एखाद्या लहान मुलाशी लहान बनुन खेळावं!

कधी रस्त्याने जाताना कोणाला लिफ्ट द्यावी, कधी जोक्स सांगुन लोकांना खळखळुन हसवावे.


11) जे मिळालयं त्याबद्द्ल कृतज्ञ रहा -

जो कृतज्ञ आहे, त्यालाच ब्रम्हांड अजुन जास्त भरभरुन देतं, हेच सिक्रेट आहे.

आपल्याला मिळालेल्या दहा वरदानांबद्द्ल रोज मनःपुर्वक आभार व्यक्त केल्यास आयुष्यातली सगळी दुःखे आपोआप नाहीशी होतात, याचा मी स्वतः अनुभव घेतला आहे.


12) यशस्वी लोकांसोबत मैत्री करा - 

असे लोक ज्यांनी स्वतःचा ठसा ह्या जगात उमटवला आहे, त्यांच्याशी अधिकाधिक ओळखी कराव्यात, त्यांच्याशी भेटण्याच्या संधी शोधाव्यात.

यश ही उत्साहासारखं संसर्गजन्य असतं!


13) सुरक्षित अंतर ठेवा -

जे लोक आपलं मानसिक खच्चीकरण करतात, आपली टर उडवतात, अशा लोकांपासुन चार हात दुर रहावे. निगेटीव्ह लोकांना आपल्या आयुष्यात आणि आपल्या मनात कुठेही स्थान देऊ नये.


14) तीस दिवसांचा प्लान - 

पुढच्या तीस दिवसात मी काय करणार आहे, ह्याचा प्लान महिन्याच्या सुरुवातीला तयार करुन भिंतीला चिटकवुन टाकावा.

एकेक लक्ष्य साध्य केलं की ‘विजयी’ असं लिहुन त्याचं अगदी उत्साहाने आणि आनंदाने ‘सेलिब्रेशन’ करावं....!!!!


Sunday, 4 July 2021

माणुसकीची किंमत


अमेरिकेतल्या एका आडबाजुच्या शहरातील आडबाजुला असलेल्या एका सामान्य हॉटेलात रात्रीच्यावेळी एक वृद्ध जोडपे शिरले. बाहेर मुसळधार पाऊस चालु होता. थंड वादळी वारे वहात होते. प्रचंड थंडी पडली होती. अशा या थंडीत हे वृद्ध जोडपे हॉटेलात शिरले तेव्हा थंडीने त्यांचे अंग थरथरत होते. कपडे पण थोडेसे पावसात भिजलेले होते. तसे त्यांचे कपडे सामान्यच होते. त्यावेळी हॉटेलच्या काऊंटरच्या मागे अगदी सामान्य असा दिसणारा एक निग्रो तरुण बसला होता.

‘आम्हाला आजची रात्र रहाण्यासाठी या हॉटेलात रुम मिळेल का?’ त्या म्हातार्याा आजिबाईंनी थंडीत कुडकुडत त्या निग्रो तरुणाला विचारले.

‘सॉरी मॅम! आज हॉटेल मध्ये सगळ्या रुम्स फुल आहेत. एकही रुम शिल्लक नाही.’ त्या निग्रो तरुणाने सांगीतले पण सांगताना त्याचा चेहेरा असा झाला होता की हॉटेलात एकही रुम शिल्लक नाही हा जणुकाही त्याचा अपराध असावा.

‘बघाना काही जमते का? हवे तर दुप्पट पैसे घ्या. बिल नाही दिलेत तरी चालेल.’ म्हातारबुवा म्हणाले. थोडक्यात त्या रुमचे पैसे त्या निग्रो तरुणाने खुशाल खीशात घालावेत असे ते म्हातारबुवा सुचवत होते. पण तो निग्रो तरुण त्यामुळे काही बधेल असे वाटे ना.

‘हे बघा मी तुम्हाला माझी रुम देऊ शकतो. माझी रुम तशी छोटी आहे पण त्यात तुमची सोय होईल. मला जर 10 मिनिटे वेळ दिलात तर मी माझी रुम जरा आवरून येतो. तोपर्यंत मी तुम्हाला गरमागरम चहा आणुन देतो. त्यामुळे तुम्हाला थोडे बरे वाटेल’. असे म्हणुन तो निग्रो तरुण किचनमध्ये चहा करायला गेला आणि थोड्याच वेळात वाफाळलेल्या चहाचे दोन कप आणि कुकिज घेऊन आला आणि आपली खोली साफ करायला निघुन गेला.

थोड्या वेळात तो निग्रो तरुण परत आला तेव्हा ते म्हातारबुवा आपल्या गाडीच्या डिकितुन एक जाडजुड बॅग काढत असतातना दिसले. ‘थांबा मी तुम्हाला मदत करतो’ असे म्हणुन तो निग्रो तरुण पुढे आला आणि तो बॅग काढुन हॉटेलमध्ये घेऊन आला.

‘चला मी तुम्हाला तुमची रुम दाखवतो’ तो म्हणाला आणि त्या वृद्ध जोडप्याला आपल्या रुमपाशी घेऊन आला.

‘ही घ्या किल्ली! काही लागले तर मला हाक मारा!’ तो निग्रो तरुण म्हणाला.

‘तु कोठे झोपणार?’ त्या आजिबाईंनी विचारले.

‘तुम्ही काळजी करू नका! मी बाहेर हॉलमध्ये झोपेन. माझ्याकडे स्लिपिंग बॅग आहे! गुड नाईट!’ तो निग्रो तरुण म्हणाला.

आजीबाईंनी खोलीचे दार उघडले. खोली तशी लहानशीच होती पण व्यवस्थित आवरून ठेवलेली होती. खोलीचे बाथरुम पण स्वच्छ करून ठेवले होते. खोलीचा हिटर चालु करून ठेवला होता. तसेच पलंगावर दोन इस्त्री केलेले नाईट गाऊन्स ठेवलेले होते. प्यायचे पाणी पण भरुन ठेवले होते.

दुसर्या दिवशी सकाळी ते वृद्ध जोडपे फ्रेश होऊन बाहेर पडले. आता त्यांना निघायचे होते.

‘किती पैसे झाले?’ त्या आजोबांनी वरचारले

‘पैशांचे आपण नंतर बघु. आधी चांगला ब्रेकफास्ट करा! मी तुमच्यासाठी ब्रेकफास्ट घेऊन येतो.’ असे सांगुन तो निग्रो तरुण पॅन्ट्रिमध्ये गायब झाला आणि थोड्याच वेळात ऑम्लेट, टोस्ट आणि गरम कॉफी घेऊन आला.

‘किती पैसे द्यायचे?’ त्या म्हातारबुवांनी ब्रेक फास्ट झाल्यावर विचारले.

‘त्याचे असे आहे. मी तुम्हाला माझी खोली वापरायला दिली. ती काही हॉटेलची खोली नव्हती. त्यामुळे त्याचे पैसे काही नाहीत.’ तो निग्रो तरुण म्हणाला.

‘असे कसे? बर मग चहाचे आणि ब्रेकफास्टचे किती पैसे द्यायचे’ त्या आजीबाईंनी विचारले.

‘मॅडम! मला आई वडील नाहीत. माझे आई वडील माझ्या लहानपणीच गेले. तुम्हाला पाहीले आणि मला माझे आई वडील आठवले. आज जर माझे आई वडील या हॉटेलमध्ये आले असते तर मी त्यांच्याकडुन चहाचे आणि नाष्त्याचे पैसे घेतले असते का? नाही ना! मग मला तुमच्याकडुन पैसे नकोत’ तो निग्रो तरुण म्हणाला.

तो निग्रो तरुण काऊंटरजवळ गेला आणि आपल्या खिशातुन काही पैसे काढुन हॉटेलच्या गल्यात टाकु लागला. म्हातारबुवा कुतुहलाने ते बघत होते. त्यांच्या लक्षात आले की त्यांनी जो चहा घेतला होता आणि ब्रेकफास्ट केला होता त्याचे पैसे तो निग्रो तरुण स्वतःच्या खिषातुन हॉटेलच्या गल्यात टाकत होता.

ते वृद्ध जोडपे जायला निघाले. त्या निग्रो तरुणाने त्यांची जड बॅग त्यांच्या गाडीच्या डिकित आणुन ठेवली. तेवढ्यात त्याची नजर गाडीतील रिकाम्या पाण्याच्या बाटल्यांकडे गेली. ‘थांबा मी तुम्हाला पाणी आणुन देतो.’ असे म्हणुन त्याने त्या दोन्ही वाटल्या स्चच्छ करून पिण्याच्या पाण्याने भरुन आणून दिल्या. ते वृद्ध जोडपे एकमेकांकडे बघत होते.

‘हे पहा आम्हाला या ठिकाणी जायचे आहे. आम्ही या गावात नवीन आहोत. आम्हाला कसे जायचे हे सांगायला थोडी मदत करणार का?’ आजोबांनी विचारले.

थोडे थांबा’ असे म्हणुन तो निग्रो तरुण आत गेला आणि गावाचा नकाशा घेऊनच बाहेर आला. त्याने तो नकाशा आजोबांना देताना म्हणाला ‘आत्ता तुम्ही या ठिकाणी आहात. तुम्हाला येथे जायचे आहे. हा बघा हा रस्ता तुम्हाला सरळ तेथे घेऊन जाईल.’ म्हातारबुवांनी बघीतले. त्या निग्रो तरुणाने नकाशावर पेन्सिलने व्यवस्थित खुणा केल्या होत्या.

त्या आजिबाई त्या निग्रो तरुणाचे आभार मागताना म्हणाल्या. ‘तुझे नाव काय? तुझे बिझनेस कार्ड असेल तर मला दे.’

‘सॉरी मॅम! माझ्याकडे बिझनेस कार्ड नाही कारण मी सध्या टेम्पररी नोकरीवर आहे. पण हॉटेलच्या बिझनेस कार्डवर माझे नाव लिहुन देतो. परत या बाजुला आलात तर आमच्या हॉटेलवर जरुर या!’ असे म्हणत त्या निग्रो तरुणाने आपल्या खिशातुन हॉटेलचे बिझनेस कार्ड काढले, त्यावर पेनने आपले नाव लिहीले आणि ते कार्ड आजीबाईंना दिले.

पंधरा दिवस असेच गेले आणि त्या निग्रो तरुणाच्या नावाने एक भला मोठा लिफाफा पोस्टाने आला. तशी त्याला पत्रे वगैरे फारशी येत नसत. हा लिफाफा कोणाचा म्हणुन त्याने उघडुन बघीतला. ओ कॅफे हॉटेलचे लेटर हेड बघुन तो चमकला. ओ कॅफे ही त्याकाळची अमेरिकेतील अत्यंत नावाजलेली अशी हॉटेल्सची साखळी होती. अमेरिकेतील बहुतेक मोठ्या आणि महत्वाच्या शहरांमध्ये ही हॉटेल्स होती. बहुतेक हॉटेल्स पंचतारांकीत होती. ओ कॅफे हॉटेल्समध्ये काम करायला मिळावे अशी अनेकांची ईच्छा असायची.

ओ कॅफे हॉटेलकडुन कसले पत्र आले आहे हे बघावे म्हणुन तो पत्र वाचु लागला आणि उडालाच. त्याला चक्क इंटरव्ह्युचा कॉल आला होता. त्याच्या शहराजवळच ओ कॅफेचे एक नवीन पंचतारांकीत हॉटेल सुरु झाले होते. तिथे त्याला इंटरव्ह्युला बोलावले होते. पण आपण अर्ज केलेला नसताना आपल्याला इंटरव्ह्युचा कॉल कसा आला याचे त्या आश्चर्यच वाटत होते.

तो इंटरव्ह्युच्या दिवशी त्यातल्या त्यात चांगला पोशाख करुन आणि आपली फाईल घेऊन इंटरव्हुला हजर झाला. या हॉटेलमध्ये आपल्याला वेटरची नोकरी मिळाली तरी पुष्कळ झाले असे त्याला वाटले. त्याने रिसेप्शन काऊंटरवर आपले इन्टरव्ह्युचे लेटर दिले. त्याला सांगण्यात आले की हॉटेलचे चेअरमनसाहेब स्वतः त्याचा इंटरव्ह्यु घेणार आहेत. त्याला आश्चर्यच वाटले. थोड्याच वेळात त्याला हॉटेलच्या सातव्या मजल्यावर असलेल्या चेअरमन साहेबांच्या ऑफीसमध्ये नेण्यात आले. त्यांचे ऑफीस चांगले भव्य होते. थोड्याच वेळात त्याला आत बोलावण्यात आले. तो चेअरमन साहेबांच्या भव्य केबिममध्ये शिरला. त्याने समोर नजर टाकली आणि तो उडालाच.

चेअरमन साहेबांच्या डेस्कच्या मागे तेच वृद्ध जोडपे बसले होते जे त्याच्या हॉटेलमध्ये आले होते.

‘मी जॉन ओ किफे. या माझ्या पत्नि लिलियन ओ किफे. ओ किफे चेन हॉटेल्स आमच्या मालकीची आहेत.’ ते आजोबा म्हणाले.

‘त्या दिवशी रात्री तु आम्हाला जी माणुसकीची वागणून दिलीस त्यामुळे आम्ही भारावुन गेलो आहोत. हल्ली अशी माणुसकी बघायला सुद्धा मिळत नाही.’ आजीबाई म्हणाल्या

‘मला तुझ्यासारखी माणुसकीची जाण असणारी माणसेच माझ्या हॉटेलसाठी हवी आहेत. मी या हॉटेलच्या जनरल मॅनेजर पदासाठी तुझा विचार करतो आहे. तु आमच्या हॉटेलमध्ये जनरल मॅनेजर म्हणुन जॉईन होशील का?’ ओ किफे साहेब म्हणाले.

‘जनरल मॅनेजर?’ तो निग्रो तरुण चांगलाच उडाला होता, ‘सर! पण मी या पदासाठी लायक आहे का? कारण माझे शिक्षण--- ‘

‘आम्ही तुझी सर्व माहिती काढली आहे.’ ओ किफे साहेब मधेच त्याला थांबवत म्हणाले, ‘घरच्या परिस्थितीमुळे तुला काही फारचे शिक्षण घेता आले नाही हे आम्हाला कळले. तसेच तुझ्या काळ्या रंगामुळे पण तुला कुठे चान्स मिळत नाही हे पण आम्हाला समजते. पण माणुसकी काही शिकवून मिळत नाही. ती उपजतच असावी लागते. आम्ही शरीराचा कलर, जाती, धर्म असा भेद करत नाही. आम्ही माणसातील गुणवत्तेला महत्व देतो. त्या दिवशी रात्री आम्ही तुझी परिक्षा घेत होतो त्यात तु उत्तम मार्काने पास झाला. जेव्हा तु आमच्या चहाचे आणि ब्रेकफास्टचे पैसे तुझ्या खिशातुन हॉटेलच्या गल्यात टाकलेस तेव्हाच आमच्या लक्षात आले की तु नुसताच प्रामाणीक माणुस नाहीस तर ऊत्तम कॅरॅक्टर असलेला माणुस आहेस. आमच्या या हॉटलचा जनरल मॅनेजर म्हणुन तुझे स्वागत असो!’ ओ किफे साहेब म्हणाले आणि त्यांनी त्या निग्रो तरुणाशी शेकहॅन्ड केला.

कधी कधी माणुसकीची आणि कॅरॅक्टरची अशी पण किंमत मिळते.

(एका सत्य घटनेवर आधारीत)

आयुष्य संपवण्याचे विचार मनात कसे येतात आणि ते कसे रोखावेत?

        आत्महत्या हा अनेक दशके आपल्या समाजात दुर्लक्षलेला विषय राहिला आहे. सुशांत सिंग राजपूत, जिया खान, भय्यूजी महाराज अशा व्यक्तींच्या आत्...