Wednesday, 19 April 2023
Friday, 3 February 2023
Sunday, 6 November 2022
Friday, 4 November 2022
बदक की गरुड ?
एकदा विमानतळावर असताना माझी एका टॅक्सी चालकाशी गाठ पडली आणि त्याच्या टॅक्सीत सर्वप्रथम माझ्या नजरेस एक गोष्ट पडली ती म्हणजे, एक पाटी जिच्यावर लिहिले होते की
"बदक की गरुड
तुमचे तुम्हीच ठरवा."
दुसरी गोष्ट जाणवली ती स्वच्छ आणि चकचकीत गाडी, ड्रायव्हर अतिशय टापटीप आणि स्वच्छ आणि इस्त्रीच्या ड्रेस मध्ये होता. स्वच्छ पांढरा इस्त्रीचा शर्ट आणि पँट वर टाई.
ड्रायव्हर स्वतः उतरून गाडीबाहेर आला आणि त्याने माझ्यासाठी गाडीचा दरवाजा उघडला. आणि बोलला,
" माझे नाव जॉन आहे. आणि मी तुमचा वाहक आहे. जो पर्यंत मी तुमचे समान गाडीच्या डिकीत ठेवतो तोपर्यंत आपण माझे हे मिशन कार्ड वाचावे सर."
त्या कार्ड वर लिहिले होते,
जॉन चे मिशन
माझ्या ग्राहकांना लवकरात लवकर, सुरक्षित आणि रास्त दरात त्यांच्या इच्छित स्थळी पोहचवणे आणि तेसुद्धा आल्हाददायक आणि मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये.
मी भारावून गेलो होतो.
गाडीतील आतील बाजूही तेवढीच टापटीप आणि स्वच्छ, नीटनेटकी होती.
जॉन ने मला विचारले.
"आपल्याला कॉफी घ्यायला आवडेल काय?"
मला त्याची गंमत करायची लहर आली म्हणून मी त्याला म्हणालो. "नाही, मला ज्यूस हवा आहे."
तात्काळ जॉन उत्तरला...
"काही हरकत नाही सर, माझ्याकडे तीन वेगवेगळ्या थर्मास आहेत. ह्यापैकी एकात ज्यूस, एकात डायट ज्यूस आणि एकात पाणी आहे."
तुम्हाला वाचायचे असेल तर माझ्याकडे आजचे वर्तमानपत्र आणि काही मासिके आहेत.
जेव्हा आमचा प्रवास चालू झाला तेव्हा जॉन मला म्हणाला की जर मला गाणी किंवा बातम्या ऐकायच्या असतील तर हा रिमोट आहे आणि ह्या वरील नंबर्स प्रमाणे तुम्ही तुम्हाला पाहिजे त्याचा आनंद घेऊ शकता.
मला अजूनही धक्का बसायचा बाकी होता. कारण
पुढे त्याने अत्यंत मार्दवपूर्ण स्वरात विचारले. "सर, एसी चे तापमान ठीक आहे की आपणास काही वेगळे हवे आहे?" त्यानंतर त्याने मला माझ्या गंतव्य स्थानी जाण्याचा सर्वात चांगला मार्ग कोणता आहे हे सांगितले आणि पुढे विचारले की, तो माझ्याशी बोललेले चालेल की त्याने शांत राहावे ?
न राहवून मी त्याला विचारले,
_"तू नेहमी तुझ्या ग्राहकांना अशी सेवा देतोस?"_
त्यावर तो उत्तरला. "नेहमी नाही, दोन वर्षांपासून देतो आहे. माझ्या सुरवातीच्या काळात मीही इतर टॅक्सी चालकांसारखा सतत तक्रार करीत असे आणि असमाधानी राहत असे, पण एकदा एका डॉक्टर कडून मी व्यक्तिमत्त्व सुधारणांबाबत ऐकले.
त्यांनी एक पुस्तक लिहिले होते. त्याचे नाव होते. "तुम्ही जे कोणी आहात त्याने फरक पडतो" ज्यात पुढे लिहिले होते. जर तुम्ही सकाळी उठून असा विचार कराल की आज दिवस वाईट जाणार आहे. फक्त अडचणीच आहेत तर खरेच तसेच होईल. तुमचा तो दिवस वाईट आणि अडचणींचा जाईल.
बदक बनू नका
गरुड बना
बदक फक्त आणि फक्त आवाज करतो. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देतो. आणि गरुड सर्व समुदायापासून वेगळा आणि उंच उडतो.
आणि माझ्या लक्षात आले की मी सतत रडतो आहे फक्त तक्रारी करतो आहे.
म्हणून मी स्वत:ला बदलण्याचे ठरविले. माझ्या दृष्टिकोनात बदल करून गरुड बनण्याचे ठरविले.
मी इतर टॅक्सी चालकांकडे बघितले. अस्वच्छ, गलिच्छ टॅक्सीज आणि आडमुठे चालक आणि म्हणून असमाधानी ग्राहक. असे चित्र होते ते.
मी काही बदल करायचे ठरवले. आणि माझ्या ग्राहकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे नंतर आणखी काही बदल करीत गेलो.
आणि गरुड बनण्याचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्याच वर्षी माझा व्यवसाय दुप्पट झाला आणि ह्यावर्षी आत्तापर्यंतच्या चौपट झालेला आहे.
तुम्ही सुदैवी आहात की आज मी तुम्हाला इथे सापडलो. अन्यथा आजकाल माझे ग्राहक माझ्याकडे आगाऊ रिझर्व्हेशन करून माझी टॅक्सी सेवा घेत असतात. किंवा मला मेसेज करून माझी टॅक्सी बुक करतात. मला शक्य नसेल तेव्हा मी अन्य गरुड बनलेल्या टॅक्सीचालक द्वारे ती सेवा ग्राहकाला पुरवतो.
जॉन बदलला होता. तो साध्या टॅक्सीतून लीमोझीन कार सर्व्हिस पुरवत आहे. जॉन ने बदका सारखे सतत आवाज करत, सतत तक्रार करणे सोडून दिले आहे. आणि गरुडासारखी भरारी मारायला सूरूवात केली आहे.
तुम्ही कुठे आणि काय काम करता याने काहीही फरक पडत नाही तर तुम्ही ते कसे आणि कोणत्या मनोभूमिकेतून करता याने नक्की फरक पडतो.
CP
Sunday, 9 October 2022
जागतिक मानसिक आरोग्य दिन
दरवर्षी १० ऑक्टोबर रोजी मानसिक आरोग्य शिक्षणाविषयी जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो.हा दिवस पहिल्यांदा १९९२ मध्ये वर्ल्ड मेंटल हेल्थ असोसिएशनच्या पुढाकाराने साजरा करण्यात आला, १५० पेक्षा जास्त देशांमध्ये सदस्य आणि संपर्क असलेली जागतिक मानसिक आरोग्य संस्था.या दिवशी, हजारो समर्थक मानसिक आजार आणि जगभरातील लोकांच्या जीवनावर होणारे त्याचे मोठे परिणाम याकडे लक्ष वेधण्यासाठी हा वार्षिक जागरूकता कार्यक्रम साजरा करण्यासाठी येतात.ऑस्ट्रेलियासारख्या काही देशांमध्ये हा दिवस मानसिक आरोग्य सप्ताहाचा भाग असतो.
१० ऑक्टोबर १९९२ रोजी प्रथम उप-महासचिव रिचर्ड हंटर यांच्या पुढाकाराने जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला.इ.स. १९९४ पर्यंत या दिवसाची सामान्य मानसिक आरोग्याला प्रोत्साहन देणे आणि जनतेला शिक्षित करणे याशिवाय कोणतीही विशिष्ट संकल्पना नव्हती.
तत्कालीन महासचिव यूजीन ब्रॉडी यांच्या सूचनेनुसार १९९४ मध्ये पहिल्यांदा जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. पहिली थीम होती "जगभरातील मानसिक आरोग्य सेवांची गुणवत्ता सुधारणे".
जागतिक मानसिक आरोग्य दिनाला विश्व स्वास्थ्य संस्था (WHO) ने पाठिंबा दिला आहे, जो जगभरातील आरोग्य मंत्रालये आणि नागरी समाज संस्थांशी असलेल्या मजबूत संबंधांचा वापर करून मानसिक आरोग्याच्या समस्यांवर जागरूकता निर्माण करतो. डब्ल्यूएचओ तांत्रिक आणि संप्रेषण सामग्री विकसित करण्यात देखील मदत करते.
मानसिक आरोग्य म्हणजे काय?
देशाच्या विकासासाठी आपले आरोग्य फार गरजेचे आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने आरोग्याची परिभाषा अशी दिली आहे, “शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक स्वस्थता असणे आणि फक्त आजार किंवा दौर्बल्याचा अभाव नाही.” वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने मानसिक आरोग्याची परिभाषा अशी दिली आहे, “मानसिक स्वस्थता ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या क्षमतेचा अनुभव येतो, ती जीवनातले सर्वसामान्य ताणतणाव सांभाळू शकते, उत्पादक काम करू शकते आणि समाजाला योगदान देऊ शकते”. या निर्णायक तात्पर्याने असे म्हणता येईल की मानसिक आरोग्य हे व्यक्तीच्या स्वस्थतेची आणि सामाजिक प्रभावी कार्यासाठी संस्थापना आहे.
मानसिक आरोग्याचे प्रभाव ह्यांवर दिसतात -
- शैक्षणिक निकाल
- उत्पादनक्षमता
- सकारात्मक व्यक्तिगत संबंधाचा विकास
- गुन्हेगारीचे दर
- मद्य आणि अमली पदार्थाचे वाईट उपयोग / व्यसन
मानसिक आरोग्य का महत्त्वाचे आहे?
४५०० लाख पेक्षा जास्त लोक मानसिक विकाराचा शिकार आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, २०२० साली औदासीन्य (depression) चा दबाव पूर्ण जगात दुस-या क्रमांकावर असेल. (मरे आणि लोपेज, १९९६). मानसिक आरोग्याचा जागतिक दबाव हे विकसित आणि विकास होणा-या देशाच्या उपचारा क्षमता पेक्षा जास्त असेल. मानसिक विकाराच्या वाढत्या भाराशी संबंधित सामाजिक व आर्थिक खर्चा मुळे मानसिक आरोग्याचा प्रचार करण्यास आणि पायबंद व उपचार करण्यास केंद्रित झाले. म्हणून, मानसिक आरोग्य वर्तणुकीवर अवलंबून आहे, आणि शारीरिक आरोग्य व जीवनाच्या दर्जासाठी प्रामुख्याने आवश्यक आहे.
- शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा फार जवळचा संबंध आहे. आणि हे निःसंदिग्धपणे सिद्ध झाले आहे की औदासीन्यामुळे ह्रदयरोग व नाडी संबंधित रोग होऊ शकतात.
- मानसिक विकारांचा परिणाम एखाद्या व्यक्तीच्या दररोजच्या बाबींवर होऊ शकतो, उदा. व्यवस्थित जेवणे, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, सुरक्षित लैंगिक संबंध ठेवणे, मद्य आणि तंबाखूचे सेवन न करणे, औषधोपचार नियमित घेणे इ. ह्यांचा शारीरिक आरोग्यावर प्रभाव पडू शकतो.
- मानसिक विकारांमुळे सामाजिक समस्या वाढू शकतात, उदा. बेरोजगारी, विस्कळित कुटुंब, गरिबी, अमली पदार्थाचे व्यसन आणि त्याच्याशी संबंधित गैरकृत्ये इ.
- कमजोर मानसिक आरोग्यामुळे आपल्या रोगप्रतिकारक क्षमतेच्या कार्यावर मोठा प्रभाव पडू शकतो.
- औदासीन्य असलेल्या रुग्णांना, औदासीन्य नसते अशा रुग्णांपेक्षा जास्त त्रास होतो.
- मधुमेह, कर्करोग, ह्रदय रोग असल्याने औदासीन्याचे धोके वाढू शकतात.
Monday, 2 May 2022
विश्रांतीचा अपराध..
स्त्रीला निसर्गतः विश्रांतीची गरज असते. ती दुबळी नसते पण तिची यंत्रणा वेगळया पध्दतीनं काम करत असते. एक तास अभ्यास करुन 60% मिळत असतील तर दोन तास अभ्यास करुन 120% मिळणार नाहीत, हे आपल्याला कधी कळणार ?
पुरुषांकडे पाहून तुलना करत स्वतःला आळशी समजणं म्हणजे स्वतःला त्रास देणं आहे. पुरुषाच्या वेळापत्रकात मासिकधर्म नाही, त्याच्या आयुष्यात बाळंतपण नाहीत, मुलांची 'आई' होणं नाही, तरीही विश्रांती घेताना मात्र स्त्रीच्या मनात अपराधीभाव असेल तर गंभीरपणे विचार करण्याची वेळ आलेली आहे.
स्त्री हक्कांसाठी लढता लढता विश्रांतीचा हक्कच दुर्लक्षित राहिलाय. कदाचित सुपरवुमन होण्याच्या नादात तिचं स्वतःचंच दुर्लक्ष झालंय. बिरबलाच्या गोष्टीतल्या बाभळी आणि बोरी वेगळया असतात हे विसरुन इतरांना काॅपी करताना स्वतःच्या गरजा, मर्यादा, वेगळेपण ती विसरतेय.
सेलिब्रिटिजवरचे सिनेमे, सोशल मिडियावरचे मोटिवेशनल स्पिकर यशाचे फाॅर्म्युले सांगत असतात. या जगात कष्टाचे गोडवे गाण्याची जुनी प्रथा आहे. सहज यश मिळालं म्हटलं की, त्यात मजा नसते, ड्रामा नसतो.
टिव्हीवरचे रियालिटी शोज बघा. घरची गरीबी दाखवून कलेला फ्रेम केलं जातं, का?
कलाकार हा कलाकार असतो त्याच्या बॅकग्राऊंडशी तुम्हाला काय करायचंय ? पण नाही !
आपल्याला साधं सरळ यश पचत नाही. आपण यशाचा संबंध टाॅर्चरशी जोडलेला आहे, मग तसंच आपल्या अंतर्मनाचं प्रोग्रॅमिंग होतं.
आपण इतरांचं पहातो. लाॅ ऑफ अट्रॅक्शननुसार कष्ट आणि अडचणी मागतो मग यश मिळाल्यावर ते दु:ख मिरवतोसुध्दा ! आपलं मन सहज सोपा मार्ग नाकारतं हे अनकाॅन्शस लेवलला चाललेलं असल्यानं आपल्याला कळतही नाही. परत प्रश्न विचारत फिरतो की माझ्या मार्गात इतक्या अडचणी का आहेत?
कारण बिलिफ, मनात खोलवर रुजलेलं कष्टाचं व्यसन !
यशस्वी लोकं जे बोलतात ते पुर्ण नसतं. बाह्यमन 10% असतं, अंतर्मनाचं गूढ 90% असतं. मग यशाची सूत्रं विचारली की ते कष्ट सांगतात. त्यांनी स्वतःवर प्रेम केलं, स्वतःला महत्व दिलं, हवा तेव्हा आराम केला हे अस सांगतील तर त्यांच्यावर विश्वास कोण ठेवेल? मी सहज गेले आणि जिंकले अस म्हटलं तर कोण ऐकेल? आपल्याला वेदना ऐकायच्या असतात. डोळयात पाणी आलं पाहिजे.
का? तर उद्या आपल्याला पळ काढायचा असेल किंवा अपयश आलं तर आपले कष्ट कमी पडले असं म्हणता यावं. कारण अहंकार स्वतःचे दोष तर पहातच नाही तो शरीराला दोष देऊन मोकळा !
ऐकलंय कधी पालकांना बोलताना, मुलगा / मुलगी हुशार आहे हो, फक्त कष्ट कमी पडतात !
दुसरं
आपला न्यूनगंड आपल्याला सुखानं बसू सुध्दा देत नाही. माझी किंमत मला काम करून सिध्द करावीच लागेल. तरच मी worthy आहे असं आपल्याला वाटतं. यु ट्युबवरचे स्त्रियांचे व्हिडियो पहा, तव्याच्या काळया कडा कशा चमकवायच्यापासून अमक्यापासून तमुक तयार करण्याचे भरमसाठ DIY आहेत. मुलांच्या संगोपनावर तर आयुष्य संपलं तरी शिकणं संपत नाही इतका आईला गिल्ट असतो.
आपण चांगली आई नाहीच असं वाटत असतं.
कधी विचार केलाय? का? कशासाठी?
कारण स्वतःबद्दल खोलवर मुरलेला न्यूनगंड ! मी गृहिणी आहे तर आहे, आराम करतेय, मला नाही येत एखादी कला, नाही जमत इतरांसारखं. काय हरकत आहे साधं रुटीन आनंदानं जगायला?
आयुष्यभर सासरचं केलं माहेरचं केलं मुलं शिकली यशस्वी झाली. धाव धाव धावले आता आणखी काय?
अजूनही किंमत कुठे आहे? आता मी सोशल मिडियावर पाहीन कुणी गृहउद्योग करतेय, कुणी कला शिकतेय, कुणी.....
आता मी स्वतःला फटके मारेन, स्वतःला युसलेस म्हणत परत धावायला सुरुवात करेन. त्याला स्वतःची ओळख वगैरे छानसं नाव देईन आणि दमलेली थकलेली परत नवी रेस शोधून काढेन. ताजं फ्रेश दिसण्यासाठी मेक्अप करेन, हसेन.
Stop ! कुठेतरी हे थांबवा, स्वतःला फसवणं.
आपल्याला इतरांच अप्रूवल हवं असतं सारखं काहीतरी करुन. त्यासाठी आपण गिल्ट न बाळगता निवांत बसतही नाही, शांत बसून शरीराला आराम देणंच आपल्याला माहीत नाही.
असच नुसतं बसायचं दहा मिनिटं ?असं कसं ?
ध्यान करु, मंत्र म्हणू पण काहीतरी करु !
सतत काहीतरी केलंच पाहिजे या प्रोग्रॅमिंगमधून आपण बाहेर पडलं पाहिजे.
शरीराचं ऐकलं पाहिजे ते बोलत असतं अंग दुखतंय कंबरेत वेदना आहे. खांदा ठणकतोय... ते एका लहान मुलासारखं आई आई ...करतंय पण आई लक्ष देत नाही. एक दिवस ते टाहो फोडतं जोरात रडतं. शरीराचा आक्रोश म्हणजेच आजारपण !
तेव्हा शरीराकडे लक्ष जातं, औषधाचा पैसा खर्च करुन आपण विकत काय घेतो तर सक्तीची विश्रांती !
बरं होऊन आपण परत त्याच जुन्या कामाला लागतो.
आराम करता आला पाहिजे. लेख वाचणा-या प्रत्येकीला गिल्ट फ्री विश्रांतीच्या शुभेच्छा... 👍🏻
साभार: आरोग्य मानसशास्त्र
Saturday, 30 April 2022
Tuesday, 12 April 2022
स्त्री सुलभ मन गेलं कुठे?
माझ्या देशातील भगिनींनो, आपण महिला, क्लारा झेटकीन याना, त्यांनी महिलांसाठी केलेल्या चळवळीसाठी मनापासून धन्यवाद देत आलोय,देतोय. त्यांच्यामुळे आंतरराष्ट्रीय महिला दिन सुरू झाला. स्त्रीला स्वतःचा हक्क मिळाला. ती आपली मतं मांडू शकली.
पण, सख्यानो, तुम्हाला माहिती आहे का?स्वतःची मत मांडणं, हक्कासाठी झगडणं, न्यायासाठी पुढे येणं ह्या गोष्टी सुरू असताना, त्या हक्कांचा काही वेळेस गैरवापर होतोय का? हे सुद्धा समाजात, महिलांनी पाहिलं पाहिजे ना?
महिलांना, योग्य वेळी,योग्य त्या कारणासाठी झगडताना,लढताना पाहिलं की अभिमान वाटतो. आम्हीही आहोत त्यांच्यासोबत! समाजातील स्त्री वर मानसिक ,शारीरिक अत्याचार,स्त्री भ्रुण हत्या, बलात्कार, शोषण कितीतरी क्लेशदायक गोष्टी पूर्वीपासून आणि अजूनही सुरू आहेत...ह्या घटना एकीकडे हृदय पिळवटून टाकतात. मग, त्यांच्यासाठी आपल्याकडून खारीचा वाटा मदत करताना, शब्दांनी त्यांची पाठ थोपटावी, आधार द्यावा,त्यांना वर उचलून घ्यावं ,त्यांना नवीन जीवन जगण्यास प्रेरणा द्यावी आणि त्याच शब्दांनी समाजात कस पेटून उठावं? हे ही शिकवलं जातं. आणि त्या महिलांनाही आपला हक्क काय हे समजावं हे साधे सहज कार्य हे सुरू असत. पण दुसरीकडे चित्र दिसतंय ते खूपच भयंकर!
सखी, आपल्यातल्याच काहीजणी आपल्या देशाची संस्कृती , धर्माचे संस्कार पायदळी तुडवत आहेत. विसरत चाललीय का संस्कृती? की साता समुद्रापलीकडच्या मॉड संस्कृतीच आकर्षण वाटून आपल्या संस्कारांचा अवलंब मुद्दाम केला जात नाहीए? तुम्हाला आपले संस्कार 'चीप' वाटू लागलेत?
...हो आता तुम्हाला कसलंही बंधन नको असत. बरोबर ना? तुम्ही लग्नासारख्या पवित्र संस्काराला लाथाडून 'सिंगल' राहण पसंत करत आहात. कारण चतुर्भुज होण्यातली जबाबदारी आता नकोय तुम्हाला. हवं तेव्हा गरजेपुरत डबल होणं...हे स्वीकारता तुम्ही. कारण त्यात भावनिक गुंतवणूक नसते. तुमच्या अपेक्षा वाढल्यात.. कारण तुमचं पॅकेज वाढलंय! अशा वेळी तुमच्या वयाचा विचार करता? हल्लीची आई सुद्धा मुलीला काय शिकवण देते कुणास ठाऊक? ...मुलीच लग्नाचं वय, मानसिक,शारीरिक बदल ,त्या त्या वयातील गरजा ,गरोदरपण, बाळंतपण , मुलांची वाढ ह्या सर्व गोष्टींचा सारासार विचार आज करण्यात येतो का? कितीतरी मुली फॅशन म्हणून गर्भाशयाच काढून टाकत आहेत. मग गरोदरपण , बाळंतपण काय? हाताचा झुला काय? नी अमृताचा पान्हा काय? महिलांचं स्त्री सुलभ मन कुठे गेल? त्यांच्या ह्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक मार्ग मूलं आणि मुलीही शोधतात. अनेक ऑफिस मध्ये, कॉर्पोरेट मध्ये, अनेक...अनेक... ठिकाणी आज जे चित्र दिसत, ऐकिवात येत,ते भयंकर आहे. विचित्र आहे.
काही ठिकाणी महिला पुरुषांचं आणि महिलांचंही मानसिक आणि शारीरिक शोषण करत आहेत. मग स्वतः लग्न केलेलं असो वा नसो, बेताल वागणे, कोणतीही मर्यादा नसणे, स्वतःसोबत दुसऱ्याच चारित्र्य ही नष्ट करणे. क्षणभंगुर सुखासाठी दुसऱ्याच्या वैवाहिक जीवनात महिला लुडबुड करताना, व्यभिचार करताना दिसत आहेत.
हक्क,स्वातंत्र्य याचा योग्य अर्थ न समजून घेता... चक्क अनेक ठिकाणी स्वैराचार करत आहेत. अशा महिलांना सखी म्हणण्याचीही लाज वाटते.
आणखी एक गोष्ट विचारविशी वाटते,किती स्त्रिया एकमेकींना समजून घेतात? की जगासमोर आम्ही समजून घेतो असा आव आणतात? सासू,सून,नणंद,बहीण,आई, वहिनी,मैत्रीण, शेजारीण? कितीतरी स्त्री नाती... असूया,मत्सर असा काही तुडुंब भरलेला असतो की जर कुणी आपल्या पुढे जाते म्हटलं की एकमेकांचे पाय ओढणे, गॉसीपिंग करणं सुरू होत. आज आपल्याला 'टिपिकल स्त्री' म्हणून जगत, मिळालेल्या संधी वाया घालवायच्या आहेत? की काहीतरी वेगळं करायचंय? आपला आदर्श ठेवायचा आहे? आपण पुढे जात असताना, 'ती' आणि 'त्या' सोबत येत असतील तर त्यांचा हात धरावा की मागे ढकलाव? काही वेळेस तर स्त्री कडून स्त्रीलाच माणूस म्हणूनही वागणूक मिळत नाही. मग समाज, पुरुष आणि जगाच काय घेऊन बसलात?
सर्वतोपरी विकास साधायचा असेल तर उच्च ध्येयासोबत, निरामय पारदर्शकता , सहिष्णुता, मैत्रीपूर्ण संबंध, सहनशीलता, चिकाटी या गोष्टी अतिशय गरजेच्या असतात.
आपला, आपल्या कुटुंबाचा, राज्याचा,देशाचा विकास आपण स्त्री म्हणून करू शकतो. तेवढं सामर्थ्य आपल्यात आहे. पण प्रत्येक स्त्री ने आज, मानसशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर आपल्या वागणुकीचा स्वतः विचार करावा. आपण कुठे योग्य ,अयोग्य वागत आहोत का? आपली विचारसारणी आपलं वर्तन आणि त्यानुसार भोवतालच वलय तयार करत असते. मग त्या वलयातील आजची झाशी, जिजाबाई, सावित्रीबाई ,रमाबाई व्हायचं की अनेकांचे संसार उध्वस्त करण्यास कारणीभूत ठरायच याचा विचार तीनच केला पाहिजे.
*©® सौ अश्विनी कुलकर्णी*
*सांगली*
Friday, 1 April 2022
जागतिक स्वमग्नता दिन विशेष
आज 2 एप्रिल, जागतिक स्वमग्नता जनजागृती दिवस. या दिनानिमित्ताने जाणून घेऊयात स्वमग्नतेविषयी....
संदर्भ : vachanmitra. com
Tuesday, 29 March 2022
मनाचं कंडिशनिंग
रशियन शरीरशास्त्रज्ञ एव्हान पॅवलॉव्ह कुत्र्याच्या पचनयंत्रणेचा अभ्यास करीत होता. अन्नाची थाळी दिसल्यानंतर कुत्र्याच्या तोंडातून लाळ गळते, तशीच अन्न घेऊन येणाऱ्या नोकराच्या पावलांचा आवाज ऐकला, तरी कुत्र्याच्या तोंडून लाळ गळते, ही गोष्ट त्याच्या लक्षात आली. त्यानं एका ठरावीक वेळेला कुत्र्याला अन्न द्यायला सुरवात केली. पण, त्याच्या काही क्षण आधी तो घंटी वाजवायचा. हीच गोष्ट काही दिवस करीत राहिल्यावर अन्न न देता केवळ घंटी वाजवली, तरी कुत्र्याच्या तोंडून लाळ गळते, असं त्याला आढळलं. या प्रक्रियेला त्यानं 'क्लासिकल कंडिशनिंग' असं नाव दिलं. थोडक्यात, केवळ घंटी वाजली, तरी लाळ गळणं, याची कुत्र्याला लागलेली सवय. कुत्र्याला विशिष्ट सवय मुद्दाम ठरवून लावता येते, तशीच गोष्ट माणसाच्या बाबतीतही शक्य आहे, हे आणखी एका शास्त्रज्ञानं दाखवून दिलं आणि यातून बिहेविअरिझम ( वर्तनवाद ) नावाची शाखा मानसशास्त्रात उदयाला आली. डॉ. जे. बी. वॅटसन ज्याला 'वर्तनवादाचा जनक' म्हणतात, त्यानं अल्बर्ट या अकरा महिन्यांच्या मुलावर प्रयोग केला. सुरवातीला अल्बर्ट मजेत सशांसोबत खेळायचा. नंतर अल्बर्ट सशांना स्पर्श करायला जायचा, तेव्हा वॅटसन मोठा भीतीयुक्त आवाज त्याच्या मागं करायचा. हा प्रयोग ५-६ वेळा केल्यानंतर आधी मजेत सशांशी खेळणारा अल्बर्ट ससा दिसला, तरी रडायला लागायचा. वॅटसननं मुद्दाम ठरवून अल्बर्टच्या मनात सशाविषयी भीती निर्माण करून दाखवली.
आपलं प्रत्येक चांगलं आणि वाईट वर्तन म्हणजे आपल्या आयुष्यात घडलेल्या घटनांमधून झालेलं कंडिशनिंग (लागलेली सवय) आहे. मन एकाग्र न होणं, लक्षात न राहणं, प्रश्न विचारण्याचा, उत्तरं देण्याचा आत्मविश्वास नसणं, नेमक्या वेळी तयारी करूनही काहीच न आठवणं, घाम फुटणं, यासारख्या असंख्य गोष्टी आपल्या मनात कंडिशन्ड झालेल्या आहेत. सुरवातीला एक-दोनदा अशा घटना घडल्या, तरी त्या मनात कंडिशन्ड होतात आणि नंतर तशी विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली, की कंडिशन्ड झालेली (सवय झालेली) कृतीच दरवेळी आपल्या हातून घडते. कुणी टिंगलटवाळी केली, तर स्वतःची लाज वाटते, तुम्ही स्वत:ला दूषणं देता. हा प्रसंग मनात कंडिशन्ड झाला. दर वेळी मग तसंच घडतं. ही घटना आपल्याच बाबतीत घडली पाहिजे, असं नाही. दुसऱ्याच्या बाबत असं घडलं, तरी त्याचा परिणाम आपल्यावर होऊ शकतो.
बऱ्याच समस्या अशाच पद्धतीनं कधीतरी मनात कंडिशन्ड होत जातात. त्याचे परिणाम आपण भोगत असतो. हे परिणाम घालवले नाहीत, तर त्याच चुका वारंवार घडतात, समस्या आणखी वाढतात. आपण हतबल होत जातो. चुकीच्या अनावश्यक गोष्टी आपल्या मनात कंडिशन्ड झाल्या, तशाच त्या घालवताही येतात. तीच कंडिशनिंगची प्रक्रिया वापरून मनाचं रिकंडिशनिंग करता येतं व समस्या घालवता येतात.
(प्रा. राजा आकाश, दै. सकाळ)
Monday, 7 March 2022
शब्दांनी घोळ घातलाय !!
बाई...महिला...स्त्री हे शब्द बरोबर आहेत कारण ते स्त्रीलिंगी आहेत. पण...
हे सर्व शब्द 'मानव' या शब्दाखाली मांडले जातात ! बाई असो, महिला असो, स्त्री असो. त्या सर्व 'मानव' आहेत.
मानव हा शब्द मनु या शब्दापासून बनलाय. मनुचा अर्थ आहे ब्रम्ह्याचा पुत्र, अंतःकरण, मंत्र.
पुत्र हा अर्थ घेतला तर स्त्री पुत्र होऊ शकत नाही. म्हणजे पुल्लिंगी होऊ शकत नाही. मग स्त्रीसाठी 'मानव' या अर्थी स्त्रीलिंगी शब्द कोणता?
कोणताच नाही.
मग स्त्रीने पुरूषी, पुल्लिंगी शब्दाचा आधार घेऊन स्वतःला मानव म्हणवून घ्यायचे.
पुरूषांच्या आधारे स्वतःचे अस्तित्व दाखविणे हे स्त्रीसाठी क्लेशकारक स्त्रीलाच वाटत नाही.
स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी झगडणार्या सर्व स्त्रिया पुरूषी शब्द 'मानव व मनु' वर परावलंबी आहेत.
कारण मानव या पुरूषी शब्दाला स्त्रीलिंगी पर्यायी शब्दच उपलब्ध नाही!
मग परंपरा म्हणून तोच शब्द वर्षानुवर्षे वापरणे चालूच आहे. स्त्री मुक्त शब्दशः अजुनही व्हायची आहे!!
सामान्य बोलीत त्या माणूस आहेत. बोलताना देखील 'बाईमाणूस' असा शब्द वापरला जातो. शब्दांचा घोळ आहे तो इथेच. म्हणजे...
माणूस हा शब्द पुल्लिंगी आहे. आणि पुल्लिंगी शब्द हा या सर्व मानवजातीचा प्रमुख बनला आहे. म्हणजे स्त्री, बाई किंवा महिला यांच्यासाठी मानव किंवा माणूस हा शब्द सर्रास वापरला जातो.
भाषा जेव्हा निर्माण झाली तेव्हा ती आदिम अवस्थेत होती. आणि आदिम अवस्थेतला मानव हा नरपशू होता. माद्यांवर मालकी, अत्याचार आणि अंकुश ही त्याची शस्त्रे तो अथकपणे वापरत होता. स्त्री आणि पुरुष हे सुरुवातीला नर आणि मादी या नावाने ओळखले जात. म्हणजेच शब्दाने ओळखले जात. पण नराचे वर्चस्व अबाधित होते. हेच वर्चस्व शब्दांमध्ये देखील उतरले आहे. स्त्री साठी वापरले जाणारे शब्द हे नरप्रधान आहेत! पुरुषप्रधान आहेत!!
माणूस प्रधान आहेत!!!
मानव प्रधान आहेत..!
म्हणजे तुम्ही-आम्ही सहज बोलताना देखील स्त्रियांवर पुरुषी शब्द लादत असतो. माणूस हा शब्द आपण माणुसकी या अर्थाने जर बघितला तर स्त्री साठी सुद्धा माणुसकी या अर्थाने शब्द माणूस शब्दांतून येतो. म्हणजे विशेषण जे आपण वापरतो स्त्रीसाठी ते पुरुषी आहे किंवा पुल्लिंगी आहे.
स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी हे व्याकरण दृष्ट्या आणि आणि जीवशास्त्रदृष्ट्या भाषेसाठी स्पष्टपणे व्यक्त व्हायला हवे. अन्यथा पुरुष वाचक शब्द स्त्रीवर लादले जाणे सहज शक्य होते. किंबहुना ते आत्ता झालेच आहे.
जीवशास्त्र दृष्ट्या बघितले तर नर आणि मादी हे शब्द योग्य आहेत. पण स्त्री साठी इतर शब्द जर पाहिले तर मात्र प्रत्येक शब्द हा 'पुरुष' गृहीत धरून बनला आहे.
म्हणजे इथेही शब्दांचा घोळ आहे...
स्त्री हा शब्द संस्कृतमध्ये ज्या अर्थाने वापरलेला आहे तो असा-
" त्सायेते शुक्र शोणिते यस्याम सा स्त्री ".
याचा अर्थ असा आहे की, स्त्री म्हणजे जिच्यामध्ये शुक्र आणि रक्त यांचा संचार असतो ती व्यक्ती. शुक्र म्हणजे पुरूषांचे वीर्य. म्हणजे इथे स्त्री कोण आहे ? 'तो' वीर्य जिच्यात सांडतो 'ती'! वीर्याशिवाय स्त्री बनू शकत नाही का?
सूत्री किंवा सोत्रि या शब्दापासून बनलेल्या स्त्रीचा एक अर्थ आहे जी मुलं धारण करते ती. स्त्री फक्त मुलं पैदा करते? त्यापलीकडे ती काहीच करत नाही?
स्त्रीचा दुसरा अर्थ असा आहे की स्त्री म्हणजे भार्या, बायको, मादी. जी पुरूषाशिवाय राहते ती कोण?
आयुर्वेदात म्हटले आहे... स्त्रवते अशी जी स्त्रावण म्हणजे स्त्री.
पुरूष देखील स्त्रवतो. दुसरे म्हणजे रक्त स्त्रावणे एवढे एकच काम स्त्रीचे असते का?
'स्त्यै' या धातूपासून स्त्री हा शब्द बनला आहे असेही म्हटले जाते. याचा अर्थ आहे, लाजून चूर होणे म्हणजे..
" लज्जार्थस्य लज्जन्तेपि हि ता:l"
स्त्री लाजते..पण पुरुषही लाजतो. पण त्यांची कारणे ही जन्मताच नसतात. लाजणे ही एक समाजामध्ये संस्काराने निर्माण होणारी गोष्ट आहे. आज तर स्त्री डोळ्यात डोळे घालून पुरुषाच्या बरोबरीने कामे करते आहे. ती कुणी लाजणारी बाहुली बनलेली नाही.
पतंजलीने पाणिनीय सूत्र घेऊन म्हटले आहे की..
" स्तन-केशवती स्त्री स्यात्लोमशः पुरूष: स्मृत: l"
म्हणजे जिला स्तन आणि केस असतात अशी स्त्री. खरेतर पुरुष आणि स्त्री दोघांनाही केस असतात. जीवशास्त्रीय दृष्ट्या स्तन दोघांनाही असतात. सस्तन प्राणी फक्त स्त्री नसते. पुरूषही आहे.
ऋग्वेदात म्हंटले आहे..
" स्त्रिय: एव एता: शब्द-स्पर्श-रूप-गन्धहारिण्य: l"
म्हणजे स्त्रीच्या शब्द, स्पर्श, रूप, वगैरेंनी पुरुष आपली मानसिक तृप्ती करतो. पण स्त्री देखील आपली मानसिक तृप्ती पुरुषाच्या शब्द,रूप, इत्यादींनी करते. मग पुरुषाच्या तृप्तीची गोष्ट समोर ठेवून स्त्रीचा शब्द तयार करणे हे पुन्हा पुरुषसत्ताक शब्द लादणे होय.
ज्योतिषशास्त्र लिहिणाऱ्या वराहमिहिर याने...' जिला नुसते पाहिले किंवा जिचे नुसते ऐकले किंवा तिची नुसती आठवण झाली तरी सुखच सुख मिळते अशी म्हणजे कोण असेल तर ती स्त्री होय' असे बृहत्संहिता या ग्रंथात म्हटले आहे.
" श्रुतं दृष्टं स्पृष्टं स्मृतमपि नृपा ह्लादजननं न रत्न स्त्रीभ्योन्यत् क्वचिदपि कृतं लोकपतिना l"
पुरूषाची स्त्रीभोगी लालसा यातून व्यक्त होते. स्त्रीसुख एवढ्याच चौकटीत जर, पुरूषांनी आपली नजर ठेवली तर प्रत्येक स्त्री मादीच राहील. आणि तो नर. पशुपातळीवरील व्यवहार!
नारी हा शब्द नर पासून बनलेला आहे. काहींच्या मते नर याचा अर्थ आहे नाचणारा पुरुष. जेव्हा कामपूर्ती साठी हातापायाने जो नाचतो व नाचवतो तो नर होय. आणि नराच्या या कामपुर्तीत स्त्री सहभागी होते म्हणून ती नारी ठरते.
स्त्रीयांविषयी विचार करताना सेक्सच्या पलीकडे पुरूषाची नजर "या" अर्थाने कशी जाणार?
तीच गोष्ट महिला या शब्दाची आहे. पतीचा सन्मान करणारी म्हणजे महिला. स्त्री साठी वापरल्या जाणार्या प्रत्येक शब्दात पुरूष कशासाठी?
माणूस या अर्थाने स्त्री आणि पुरुष या दोघांसाठी इंग्रजीत देखील ह्युमन हा शब्द वापरला जातो. यामध्ये ह्यु+मॅन आहे. मॅन म्हणजेच पुरुष याचा अंतर्भाव आहे. तिथेही परंपरेनं सुरुवातीपासून स्त्रीसाठी मानव या अर्थाने योग्य शब्द तयार केला नाही.
इंग्रजीत 'वुमन आणि फीमेल' असे शब्द आहेत. म्हणजे इथेही 'मॅन किंवा मेल' हे पुरुष आलेच. म्हणजे स्त्री शब्दांसाठी जिकडंतिकडं पुरूष चिकटलाय!
स्त्रियांसाठी असलेल्या भाषेच्या दुर्भिक्ष्यासाठी बदल घडवायला हवंय. नवीन शब्द शोधून काढायला हवेत. यासाठी स्विडन देशात सातत्याने प्रयत्न होत आहेत. भाषिक वृद्धीची चळवळ व्हायला हवीय. जर भाषेतच लिंग भाव असेल तर लिंग द्वेष किंवा लिंग असमानता फैलावलेलीच राहील.
स्त्रीवादी भाषा सुधारणा किंवा फेमिनिस्ट लँग्वेज रिफाॅर्म आंतरराष्ट्रीय स्तरावर ५० वर्षापूर्वी ध्यानात आलं होतं. अँड्रोसेंट्रीजम इन ग्रामर या अर्थाने त्याकडे लक्षही वेधण्यात आले. मराठीत तर या सगळ्याचा विचार देखील झालेला नाही. आॅस्ट्रेलिया, फ्रान्स या देशांनीही या विषयी पुढाकार घेतला होता.
पुरूषसत्ताक व्यवस्था मोडीत काढायची असेल तर भाषा आणि शब्दांपासून सुरवात करावी लागेल!
- डाॅ. प्रदीप पाटील
Saturday, 5 March 2022
Friday, 18 February 2022
मानसशास्त्रीय विचारधारा
- आपल्या हावभावांसह कसे बोलायचे हे आपणास कधीच शिकवले जात नाही, परंतु आपल्याला शब्दांद्वारे बोलणे शिकविले जाते.
- पौल एकमन
- ज्या लोकांचा आम्ही तिरस्कार करतो त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जर आपला विश्वास नसेल तर आम्ही त्यावर अजिबात विश्वास ठेवत नाही. -नोम चॉम्स्की
- माझ्या पिढीचा महान शोध असा आहे की मनुष्य त्यांच्या मनोवृत्तीत बदल करून आपले जीवन बदलू शकतो. - विल्यम जेम्स
- अप्रभाषित भावना कधीही मरत नाहीत. त्यांना जिवंत पुरले आहे आणि नंतर ते आणखी वाईट मार्गाने बाहेर येतात.
- सिगमंड फ्रायड
- ज्या लोकांचा असा विश्वास आहे की त्यांच्या जीवनात काही प्रमाणात नियंत्रण ठेवण्याची शक्ती आहे, त्या लोकांपेक्षा आरोग्यासाठी अधिक प्रभावी आणि यशस्वी आहेत ज्यांना त्यांच्या जीवनात बदल करण्याची क्षमता नाही यावर विश्वास नाही
-अल्बर्ट बंडुरा
- एखादी व्यक्ती बौद्धिकदृष्ट्या निष्क्रीय असेल तर तो नैतिकदृष्ट्या मुक्त होऊ शकणार नाही.
- तुम्हाला सर्व काही माहित आहे असे कधीही समजू नका. आपण स्वत: ला किती उच्च महत्त्व देता, तरीही स्वत: ला सांगण्याची हिम्मत ठेवा: मी अज्ञानी आहे
-इवान पावलोव्ह
- पूर्णत: साध्य नसतानाही आपण उच्च ध्येय राखण्याचा प्रयत्न करून चांगले होऊ.
- विक्टर फ्रेंकल
- बर्याच सामाजिक घटना संदर्भात समजल्या पाहिजेत कारण वेगळ्या झाल्यास त्यांचा अर्थ गमावतो.
-सोलोमन अस्च
- आपल्याला खरोखर काहीतरी समजून घ्यायचे असल्यास ते बदलण्याचा प्रयत्न करा.
-कर्ट लेविन
- आपल्या अंतःकरणाचे अनुसरण करा परंतु आपल्या मेंदूला आपल्याबरोबर घ्या
-अल्फ्रेड अँडलर
- देणे हे प्राप्त करण्यापेक्षा अधिक आनंद देते, कारण ते वंचित आहे असे नव्हे तर देण्याच्या कृतीतून माझे चैतन्य व्यक्त होते.
-एरिक फ्रोम
- अपरिपक्व प्रेम म्हणतात: "मी तुझ्यावर प्रेम करतो कारण मला तुझी गरज आहे." प्रौढ प्रेम म्हणतात: "मला तुझी गरज आहे कारण मी तुझ्यावर प्रेम करतो".
-एरिच फोरम
Saturday, 29 January 2022
रोगप्रतिकारशक्ती कमी झाली.. कसं ओळखाल?
संवाद हा आपल्या जगण्यातला अतिशय महत्त्वाचा घटक. कोणी आपल्याशी बोलायला नसलं, आपण एकटे असलो तरी संवाद थांबत नाही. आपण मनातल्या मनात आपल्या स्वत:शी संवाद साधत राहातो. संवादामुळे मन मोकळं होतं, ज्ञान मिळतं, असलेलं ज्ञान इतरांपर्यंत पोहोचतं. रंजन-मनोरंजन होतं. माहितीची देवाण घेवाण होते. जगण्यात संवाद नसता तर काय झालं असतं? आपण कसे जगलो असतो, याचा विचार देखील करवत नाही. इतका संवाद महत्त्वाचा आहे. पण म्हणून आपण संवादाकडे खरंच लक्ष देतो का? असा प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे आपलं आपल्या शरीराकडे. आरोग्याकडे होणारं दुर्लक्ष. शरीराच्या आत विविध क्रिया सुरु असतात. त्या जाणवतही नाही इतक्या त्या सहज होतात. पण त्यात काही अडथळा आल्यास, काही बिघाड झाल्यास त्याची कुणकूण शरीराला लागते. शरीर आपल्याला आरोग्याबाबतीत काहीतरी बिघडलंय हे सांगण्याचा प्रयत्न विशिष्ट लक्षणांद्वारे करत असतं. पण शरीर आपल्याशी साधणाऱ्या संवादाकडे आपण दुर्लक्ष करतो आणि आजारी पडतो. म्हणून तज्ज्ञ म्हणतात, की शरीर काहीतरी सांगत असतं, ते ऐकायला, समजून घ्यायला शिकलात तर निरोगी राहाण्याचा मार्ग सहज सापडतो. आपण निरोगी आहोत, सशक्त आहोत हे जसं आपलं शरीर सांगतं तसेच आपल्या आरोग्याचं रक्षण करणारी रोगप्रतिकारशक्ती कमी झाली आहे हे देखील शरीर आपल्याला सांगत असतं. याकडे जर दुर्लक्ष झालं तर आजारांपासून आपण आपल्या आरोग्याचं रक्षण करु शकत नाही.
कोरोना संसर्गापासून आपल्याला रोगप्रतिकारशक्तीची आपल्या आरोग्य राखण्यातली भूमिका किती महत्त्वाची आहे हे कळायला लागलं. विविध प्रकारच्या विषाणुंचा, घातक जिवाणुंचा संसर्ग होण्यापासून केवळ आपल्याकडील रोगप्रतिकारशक्तीच आपल्याला वाचवू शकते असं आरोग्यतज्ज्ञ सांगत आहेत. आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्याकडे लक्ष देऊन आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचं आपण मनावर घ्यायला हवं. आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती चांगली की ढासळलेली हे समजून घेण्यासाठी कुठल्याही बाहेरच्या तपासण्यांची गरज नसते. आपलं शरीर रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याचं विशिष्ट लक्षणांद्वारे सांगत असतं. लक्षणांद्वारे आपली रोगप्रतिकारशक्ती कमी झाली आहे हे ओळखता येतं. या लक्षणांकडे लक्ष देण्याची, ती वेळेत लक्षात घेऊन वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेतला तर आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवून आपण आपल्या आरोग्याचं रक्षण करु शकतो.
रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याची काही लक्षणे
1. सतत थकवा वाटणं
शारीरिक किंवा बौध्दिक कष्टाचं काम केल्यानंतर शरीराला, मेंदूला थकवा येतो. थोडासा आराम केला, काही खाल्ल्यास ऊर्जा येते. झोपेतून उठल्यानंतर सकाळी छान वाटतं. ताजंतवानं वाटतं. पण रात्री खूप वेळ झोपूनही सकाळी आपल्याला जर थकवा वाटत असेल, उत्साह वाटत नसेल , कष्टाचं काम न करताही थकल्यासारखं वाटत असेल, उठल्यानंतरही परत झोपावसं किंवा सुस्त वाटत असल्यास आपली रोगप्रतिकारशक्ती कमी झाली आहे हे समजावं. रोज व्यायाम केल्यास थकलेल्या शरीरला ऊर्जा मिळते. त्याचा परिणाम रोगप्रतिकारशक्ती वाढण्यावर होतो. पण व्यायाम करुनही थकवा जात नसेल, व्यायाम केल्यानंतरही थकवा जास्त वाटत असल्यास वैद्यकीयतज्ज्ञांचा सल्ला घेण्याइतपत आपली रोग प्रतिकारशक्ती कमी झाली आहे हे समजावं.
2. टिकून रहाणारी सर्दी आणि खोकला
प्रौढ व्यक्तींना वर्षातून दोनदा सर्दी पडसं होणं, खोकला होणं ही सामान्य बाब आहे असं तज्ज्ञ म्हणतात. सर्दी खोकला झाल्यावर त्याचा मुकाबला करण्यासाठी शरीर औषधं घेण्याआधीच सज्ज होतं. सर्दी खोकल्याशी नैसर्गिक रित्या लढण्यासाठी आवश्यक ती प्रतिपिंडं ( ॲण्टिबाॅडीज)विकसित करण्यासाठी आणि त्यांच्याशी लढण्यासाठी किमान 3 ते 4 दिवस लागतात. 4-5 दिवसानंतर सर्दी खोकला औषधाशिवायही कमी व्हायला लागतो. याचं कारण आपली रोगप्रतिकारशक्ती. पण तिच जर कमजोर असेल तर सर्दी खोकला 4-5 दिवसात आपोआप कमी न होता, तो वाढतो, आठवडा उलटून गेल्यावरही टिकून राहातो. दीर्घकाळ टिकून रहाणारी सर्दी आणि खोकला आपली रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याचं सांगते.
3. पोटाच्या पचनाच्या समस्या
पचनाचा थेट संबंध हा रोगप्रतिकारशक्तीशी असतो. एखाद्याचं पोट जर कायमच खराब असेल, पचनाशी निगडित समस्या जर एखाद्याला कायमच सतावत असतील तर तज्ज्ञांच्या मते अशी व्यक्ती कधीच निरोगी राहात नाही. वैद्यकीय तज्ज्ञ म्हणतात की आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या ऊती आपल्या आतड्यात असतात. वारंवार जुलाब होणं, आतड्यांना सूज येणं, बध्दकोष्ठतेचा त्रास कायम जाणवणं या पोटाशी, पचनाशी निगडित समस्या आपली रोगप्रतिकारशक्ती कमजोर असल्याचं सांगतात.
4. नेहमीपेक्षा जास्त तणाव घेणे
रोगप्रतीकारशक्ती कमी झालेली असल्यास छोट्याछोट्या गोष्टींचा ताण येतो, सोपी सहज कामं करताना चिडचिड होते. ताणतणाव जास्त झाल्यास , चिडचिड होत असल्यास त्याचा परिणाम म्हणून रोगप्रतिकारशक्ती आणखी कमी होते. आपली रोगप्रतिकारशक्ती ही रक्तातील पांढऱ्या पेशी, लसिका ग्रंथी आणि शरीरातील प्रतिपिंडांवर अवलंबून असते. मानसिक ताणतणावाचा परिणाम या तिन्ही गोष्टींवर होतो. म्हणून एरवीपेक्षा आपण जास्तच चिडचिड करतोय किंवा सततच्या तणावानं अस्वस्थ वाटत असल्यास आधी डाॅक्टरांकडे जावं. दुर्लक्ष केल्यास कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती आणखी कमकुवत होते.
5. जखमा भरायला उशीर लागणे
काम करताना, चालताना हातापायाला छोटी जखम झाली तर ती दोन तीन दिवसात भरायला लागते, हे प्रत्येकाला कळतं. पण छोट्या जखमा भरायलाही शरीर जास्त वेळ घेत असेल तर त्याचा संबंध कमी झालेल्या रोगप्रतिकारशक्तीशी असतो. म्हणून सावध होवून डाॅक्टरांकडे जाणं हा योग्य उपाय ठरतो.
(संदर्भ : लोकमत)
Monday, 3 January 2022
सोशल मीडिया आणि मेंदू
पहिली पिढी
जिच्या सामाजिक आंतरक्रिया आणि संवाद प्रामुख्याने ऑनलाईन जगात आकाराला येतात, अशी मानवी इतिहासातील पहिली किशोरवयीन पिढी आपण एकविसाव्या शतकात पाहतो आहोत. तिचे भावविश्व सोशल मिडियाने व्यापलेले आहे. या माध्यमाने देहाने दूर असणाऱ्यांना परस्परांच्या जवळ आणले. जीवनातल्या सुख-दु:खाला त्वरित व्यक्त करण्याची संधी दिली. जगाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या घटनांची माहिती २४×७ पुरवायची जबाबदारी घेतली. आणीबाणीच्या प्रसंगात तात्काळ मदतीसाठीचे मार्ग उपलब्ध करून दिले. अन्न-वस्त्र-निवारा या शारीरिक गरजांइतकीच ‘संवाद’ ही मूलभूत मानसिक गरज असल्याने ती भागवण्याची मोठीच सोय करणारा हा ‘सोशल मिडिया’ आता केवळ त्यांच्याच नाही तर प्रौढांच्याही जीवनाचा अविभाज्य घटक बनू पाहतो आहे! मात्र, छोट्या-छोट्या सुखांचे आवळे सतत चाखायला देणाऱ्या या सोशल मीडियाला त्याबदल्यात आपण ‘बुद्धीचा कोहळा’ तर काढून देत नाही आहोत ना? प्रश्न थोडा विचित्र वाटेल, पण मेंदूचे अभ्यासक, डॉक्टर्स, मानसोपचारतज्ञ, समाजशास्त्रज्ञ, सुजाण पालक या साऱ्यांनाच हा प्रश्न भेडसावतो आहे. एवढेच नव्हे, तर ज्यांनी हा उद्योग यशस्वी करण्यात मोलाची भूमिका बजावली त्यांनीही आता ‘जागल्या’ची भूमिका घेत या संभाव्य धोकयांचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
हि खालील काही उदाहरणे पहा :
१. ‘मादक द्रव्यसेवन आणि जुगार खेळताना मेंदूतील जे चेतामार्ग उत्तेजित होतात, तेच मार्ग स्मार्टफोनवर सोशल मीडिया वापरताना उत्तेजित होतात’ – ख्रिस मारसिलिनो, ‘आय फोन’चे ‘पुश’ नोटिफिकेशन विकसित करणारा तज्ञ
२. ‘मेंदूतील डोपामाइन या चेतरसायनावर आधारीत तात्काळ सुख देणारी जुळणी खऱ्याखुऱ्या सामाजिक संवादास मारक ठरेल हे माहीत असूनही, याच मानवी कमजोरीचा फायदा घेत आम्ही ‘फेसबुक’चे आर्थिक साम्राज्य उभारले. त्याबद्दल मला प्रचंड अपराधी वाटते’. – चामथ पलिहापितीया, माजी व्हाईस प्रेसिडेंट, ‘फेसबुक’ ग्राहक वृद्धी विभाग
३. ‘अवधान क्षमतेचा ऱ्हास/नाश करणारी बलाढ्य अर्थव्यवस्था आम्ही निर्माण केलीयं. आता तिचे धोके समाजाला समजावून सांगत, तिचा सर्व पातळ्यांवर विवेकी वापर वाढावा यासाठी मी प्रयत्नशील आहे’. – ट्रायस्टन हॅरिस, प्रॉडक्ट व्यवस्थापक, ‘गुगल’ कॉर्पोरेशन
४. ‘स्क्रीनच्या वापराने होणाऱ्या अवधान क्षमतेच्या ऱ्हासापासून आपल्या देशाची पुढची पिढी वाचवण्यासाठी शाळांमध्ये स्मार्टफोन वापरण्यावर बंदी घातलेली आहे’. – जिन-मिशेल ब्लॅक्वेर, फ्रान्सचे शिक्षण मंत्री (सप्टेंबर, २०१८ पासून हा कायदा तिथे अंमलात आलाय).
डोपामाईनवर आधारीत उद्योग...
मानवी उत्क्रांतीचा विचार केला तर सुख देणाऱ्या वर्तनाची माणूस पुनरावृत्ती करताना दिसतो. चविष्ट अन्नाची मेजवानी, लैंगिक सुख, केली गेलेली स्तुती अशा अनेक गोष्टींसाठी माणूस हपापलेला असतो. ते मिळाले की डोपामाईन नावाचे रसायन (तांत्रिक भाषेत चेतपारेषक) मेंदूत स्त्रवते आणि सुखाची अनुभूती येते. मात्र, हे हवहवेसे वाटणारे सुख तात्पुरत्या काळापुरते असते. त्यामुळे ते पुन्हापुन्हा मिळावे यासाठी माणूस खटपट करीत राहतो. नेमकी हीच मानवाची कमजोर बाजू सोशल मिडियाने विविध संशोधनांतून सखोल अभ्यासली आहे. त्यांचे फायद्याचे गणितच मुळात जाहिरातींवर आधारलेले असल्याने त्या मिळवण्यासाठी वापरकर्त्यांची नजर सतत स्क्रीनवर खिळवून ठेवण्याची आवश्यकता त्यांना आधी जाणवलेली होतीच. मग कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर सुखाची झुळूक सतत निर्माण करण्यासाठी ‘डोपामाइन’ कार्यन्वित करू शकणारे अत्युच्च दर्जाचे संगणकीय ‘अल्गोरीदम्स’ म्हणजेच प्रोग्राम्स या कंपन्यांनी बनवले आणि अब्जावधी डॉलर्सचा धंदा उभारला! विविध प्रकारचे भाव व्यक्त करणारे इमोजी, रंगीबेरंगी शब्दांच्या-चित्रांच्या-‘गिफ’च्या माध्यमातून केलेले कौतुक, ओळखीच्या व्यक्तींचे सकारात्मक संदेश, चोवीस तास नोटिफिकेशनची आणि अलर्टची सुविधा, भूतकाळातील स्मृतींचे कोलाज उपलब्ध करून देणे, लाईक्सची संख्या देणे, अनेकांशी संपर्क करण्यास सुचवणे, आवडीनिवडीनुसार विविध गोष्टी सतत पुरवत राहणे...किती गोष्टी सांगाव्यात! अशा सुखावणाऱ्या पर्यावरणाची करोडो लोकांना भुरळ पडली नसती तरच नवल! त्यातही तात्कालिक सुखाच्या पाठीमागे धावण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांना तर सोशल मिडियाचे व्यसन लागणेही ओघानेच आले. कोरोनाच्या महामारीने यात भरच घातली आणि आता सोशल मीडिया नियमितपणे न वापरणारे शोधावे लागतील अशी स्थिती आहे.
माणसाची आवड सवयीत कशी बदलते आणि सवय व्यसनात कशी परावर्तित होते याबाबतचे अनेक सिद्धांत मानसशास्त्रातील संशोधकांनी प्रस्थापित केलेले आहेत. त्यातील स्कीनर नावाच्या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने (याने पहिल्या महायुद्धात कबूतरांना प्रशिक्षण देऊन शत्रूपक्षांवर बॉम्ब टाकण्याचा प्रस्ताव अमेरिकन लष्कराला सादर केला होता.) प्रथम सिद्ध करून दाखवलेली ‘बदलती प्रबलन सारणी’ सोशल मीडिया कंपन्या सर्रास वापरताना दिसतात. यात वापरकर्त्याची आशा सतत वाढती राहील आणि तो पुन्हापुन्हा आपल्या वॉलवर येत राहील अशा पद्धतीने त्याला संदेश देण्याची व्यवस्था अतिशय सूत्रबद्ध रीतीने केलेली असते. त्यासाठी जागतिक दर्जाच्या तज्ञांची भलीमोठी फौज कंपन्यांच्या दिमतील असते. ‘डोपामाइन लॅब’ या कॅलिफोर्नियामधील कंपनीच्या अभ्यासानुसार इन्स्टाग्राम नव्या ग्राहकांना मिळणारे सुरुवातीचे ‘लाईक्स’ हेतूपूर्वक दडवून ठेवते की जेणेकरून वापरकर्त्यांचे मन खट्टू होईल आणि ते पुन्हापुन्हा ‘इन्स्टा’वर येतील. नंतर मग एकदम सारे ‘लाईक्स’ दाखवले जातात आणि डोपामाइनचा प्रवाह मेंदूत वाहू लागून ते खूप खुश होताना दिसतात! ‘फेसबुक’ यासाठी शब्दांचे रंग, उडणारे फुगे आदी अनेक क्लृप्त्या सतत लढवत असते. नोटिफिकेशन ‘ऑन’ ठेवण्याचे डिफॉल्ट सेटिंग यासाठीच तर असते. आता आपण म्हणू की छोटे-छोटे विरंगुळयाचे, संवादाचे, विनोदाचे, कौतुकाचे क्षण आपल्याला सोशल मीडिया उपलब्ध करून देत असेल तर छानच आहे की. त्यात बिघडले कोठे? तर्क खरंच बिनतोड आहे पण जरा गंभीर विचार केला तर दुसरी बाजूही समोर येते.
... अवधानक्षमतेचा ऱ्हास
एकाचवेळी अनेक कामांमध्ये लक्ष विभागले जात असेल तर ‘समग्रतेकडून सूक्ष्माकडे’ जाण्याचा प्रक्रियेस खीळ बसते. आपली खोलात जाऊन आकलन करण्याची क्षमता कमी कमी होत जाते आणि दीर्घकालीन स्मृती विकसित होण्यात अडथळा निर्माण होतो. खरेतर कोणत्याही कामातली अत्युच्च गुणवत्ता गाठण्यासाठी त्यात खोलवर बुडी मारावी लागते. आजूबाजूची सारी व्यवधाने गळून पडावी लागतात आणि दीर्घकाळ एकाग्रचित्ताने कार्यरत व्हावे लागते. त्यातूनच सर्जनशील आनंदाची आणि सार्थकतेची अनुभूती येते. सोशल मिडियावर दीर्घकाळ राहणारी मंडळी या अनुभूतीला पारखी होत आहेत अशी अनेक संशोधने सांगत आहेत (उदा. ली, २०१५). त्यांच्या मेदूतील ऍन्टिरिअर सिंग्यूलर कॉर्टेक्समधील ग्रे मॅटरची दिसून आलेली कमतरता याचेच निदर्शक आहे. नोमोफोबिया (नो मोबाईल फोन फोबिया) असणाऱ्या कुमारांच्या मेंदूमध्ये ‘गाबा’ रसायनाची अतिरिक्तता आणि ‘ग्लुटामेट-ग्लुटामाइन’ची कमतरता आढळल्याने अवधान केंद्रित करण्याच्या त्यांच्या क्षमतेवर प्रतिकूल परिणाम झाल्याचे दक्षिण कोरियन विद्यापीठातील अभ्यासात दिसून आले आहे. कोणतेही काम करत असताना १५ सेकंदांपेक्षा जास्त काळ इतर गोष्टींकडे आपले अवधान गेल्यास मुख्य कामामधल्या चुकांची संख्या लक्षणियरीत्या वाढते असे अनेक संशोधनांचे एकत्रित निष्कर्ष सांगतात. २००० ते २०१३ या कालावधीत कॅनडामधील लोकांच्या अवधान क्षमतेमध्ये ३३ टक्क्यांनी घट झाल्याचा निष्कर्ष ‘मायक्रोसॉफ्ट’ कंपनीच्या २०१५ च्या अहवालात नमूद करण्यात आला आहे. हार्वर्ड मेडिकल स्कूलने सोशल मिडियाच्या वापरवृध्दी बरोबरच अवधान अक्षमतेने बाधित विद्यार्थ्यांच्या संख्येतही प्रचंड वाढ होत असल्याचा इशारा दिला आहे. चीनमधील ७००० शालेय विद्यार्थ्यांवरील संशोधनातूनही असेच निष्कर्ष हाती आलेले आहेत. सततच्या सोशल मिडियामध्ये डोकावण्याच्या सवयीमुळे कामातली एकाग्रता वारंवार भंग पावत आहे. त्यामुळे उत्पादक कार्याचा कालावधी जवळपास ४० टक्क्यांनी कमी होत असून (उदा. मेयर) भविष्याचा सारासार विचार करून बौद्धिक नियमन करणाऱ्या मेंदूमधील प्री-फ्रन्टल कॉर्टेक्सच्या कार्यात गोंधळ निर्माण होतो आहे (लोह व कानाई, २०१५, मोईसाला व सहकारी, २०१६). ‘जगाशी जोडले जात आहोत’ या क्षणभंगूर सुखाच्या लकेरीत बहुतेकांचे या गोष्टीकडे दुर्लक्ष होत आहे.
सोशल मिडियामुळे आपल्याला हवी ती माहिती, फोटो, व्हिडिओ इ. कधीही उपलब्ध होऊ शकणार असल्याने प्रत्यक्ष अनुभव घेताना करावयाचे सूक्ष्म निरीक्षण, होणारी तरल भावनांची निर्मिती, त्रिमीतिय अवकाशाचा विचार आणि त्यातून जगावायचे वर्तमान याकडे माणूस दुर्लक्ष करू लागला आहे. परिणामी, नव्या पिढीला ‘डिजिटल स्मृतिनाश’ नावाच्या नव्या समस्येला तोंड द्यावे लागण्याची भीती शास्त्रज्ञ व्यक्त करीत आहेत (काहानमान, २०११; कासपेरस्की लॅब, २०१५). वास्तविक पाहता, हा ‘केवळ व्यत्यय’ नाहीयं. तो आपल्या मनात एकाचवेळी आपण खूप गोष्टी करतो आहोत असा भ्रमित आनंद निर्माण करतो आहे आणि प्रत्यक्षात मात्र आपल्याला प्राधान्याने करावयाच्या गोष्टींपासून भरकटायला लावतो आहे. त्यामुळे वेळीच सावध होणे आवश्यक आहे.
ताण – भीती – बर्नआउट - नैराश्य...
जेव्हा आपण समाज माध्यमावर सतत सक्रीय राहतो तेव्हा मेंदूकडून ग्लुकोजचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे, सततचा ताण, मानसिक ओझे, काम करताना लवकर थकायला होणे, बर्नआउट/कार्य-क्लांती, सहनशीलता कमी होऊन चटकन चिडचिड होणे आदी वर्तनातील बदल होताना दिसत आहेत. मेंदूत ‘ताण-भीती व त्यांची स्मृती’ असे जाळे विकसित होऊन चिंता, नैराश्य, विचारांमधील अस्पष्टता, वास्तवातील सामाजिक संवाद करताना येणारे अडथळे, झोपेच्या समस्या आदी तक्रारींमधील वाढीबाबतही अनेक संशोधने आपल्याला जागे करू पाहात आहेत (अमेरिकन सायकॉलॉजीकल असोसिएशन सर्वेक्षण; कंझ्यूमर मोबिलिटी रिपोर्ट, २०१५; मॅक्स विन्टरमार्क, न्यूरोरेडिओलॉजिस्ट, स्टॅनफोर्ड विद्यापीठ; ह्यूंग सुक सिओ, न्यूरोरेडिओलॉजिस्ट, कोरिया; लस्टिंग, एंडोक्रोनोलॉजिस्ट).
विचारप्रक्रियेचे ध्रुवीकरण
सोशल मिडियाच्या वापरकर्त्याला हवी तेवढी पण एकाच प्रकारची माहिती सतत पुरवत राहण्याच्या व्यावसायिक गरजेमुळे आभासी दुनियेतील संवादामध्ये समाजाचे वैचारिक ध्रुवीकरण होतानाही दिसते आहे. समोरासमोर होणाऱ्या संवादातील संवेदनशीलता, आपुलकी, आदर कमी होत जाऊन माणसे आक्रमक, तर्कदुष्ट आणि एकारलेपणाकडे झुकत आहेत. मेंदूमध्ये विचारांचे पूर्वग्रहात आणि कट्टरतेत रूपांतर होऊन सामाजिक सौहार्द आणि विविधतेचा आदर कमी होत चालला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सोशल मिडियाच्या बेलगाम व्यवहारावर वाजवी बंधने घालण्याबाबत जनमत तयार करण्याच्या चळवळी हळूहळू मूळ धरू लागल्या आहेत.
विवेकी वापर शक्य आहे
मानवाच्या प्राणीय स्तरावर कार्यरत असणाऱ्या ‘तात्काळ सुख’ मिळवण्याच्या सहजप्रवृत्तीला समाज-माध्यमांमधून आता ‘सामाजिक दर्जा/स्टेटस’चे रूप प्राप्त झाले आहे. ह्या ‘आभासी दर्जा’मध्ये अडकून न राहता अधिक तारतम्याने वागण्याची निकड समजावून घेण्याची आता हीच वेळ आहे. माहिती-तंत्रज्ञानाच्या चौथ्या क्रांतीचा हा संक्रमणकाळ आहे. अशा संक्रमणकाळात नेहमीच ‘जुने ते सारे कालबाह्य’ आणि ‘नवे ते सारे सोने’ वाटत असते. अशावेळी योग्य काय अन् अयोग्य काय, चूक काय अन् बरोबर काय, इष्ट काय अन् अनिष्ट काय हे ठरवता येणारा सारासार विवेक निरंतर प्रयत्नांनी रूजवावा लागतो. वैज्ञानिक निरीक्षणांचा आधार इथे विशेषत्वाने उपयुक्त ठरतो. सोशल मिडियाने मेंदूलाच ‘लक्ष्य’ केल्याने अवधानक्षमतेबाबत आधुनिक विज्ञान काय सांगते हे पाहणे म्हणूनच कळीचे आहे. ज्याप्रमाणे पैसा हे आर्थिक व्यवहाराचे चलन आहे आणि ते काटकसरीने वापरून आपण आपली प्रगती साधायला शिकलो त्याप्रमाणेच ‘अवधानक्षमता’ हे बौध्दिक व्यवहाराचे चलन आहे! निसर्गाने आपल्याला ते मर्यादीत स्वरूपात दिलेले आहे हे उत्क्रांतीच्या वैज्ञानिक अभ्यासात अधोरेखितही झालेले आहे. सोशल मिडियाच्या आहारी जाऊन तिची उधळपट्टी न करता आपल्या संपन्न आणि समाधानी आयुष्यासाठी ते पैशासारखेच जपून वापरणे म्हणूनच शहाणपणाचे ठरणार आहे. उन्नत अशी मानवी स्तरावरील दीर्घकालीन उद्दिष्टांची निर्मिती करणे, ध्येयपूर्तीसाठी निरंतर ‘लगे रहो’ची वृत्ती घडवणे, प्रतिकूल परिस्थितीतही निर्धाराने उभे राहण्याची ताकद कमावणे आदींसारख्या कुवती विकसित करण्यासाठी अवधानक्षमतेचाच प्रमुख आधार आपल्याला असणार आहे. जागतिक स्पर्धेचे २१ वे शतक छोट्या-छोट्या मोहांना वा व्यत्ययांना बळी न पडता ठरवलेल्या कार्यावर दीर्घकाळाकरता लक्ष केंद्रित करून ते उत्कृष्टरित्या पार पाडणाऱ्यांनाच करिअर बहाल करणार आहे. ‘सोशल मिडियाची आकर्षक भूल’ विरुद्ध ‘स्वयं-शिस्तीचे व्यवधान’ या नव्या द्वंद्वाची सोडवणूक कठोर आत्मपरीक्षणाने शक्य होणार आहे. नोटिफिकेशन ऑफ करणे, स्क्रीनचा प्रकाश मंद करणे, उठसूट स्क्रीन पाहून संदेश पाठवण्यावर लगाम घालणे आदींसारख्या नव्या सवयी आता अंगिकाराव्या लागणार आहेत. स्मार्टफोनमध्ये व्यसनी बनविण्याचे अंगभूत गुण असल्याने आपण ‘मानसिक आजारी तर बनत नाही ना’ हा प्रश्न रोखठोक पद्धतीने विचारावा लागणार आहे. सोशल मिडियावर जाण्याऐवजी पुस्तक वाचणे, वाद्य वाजवणे, मैदानावर खेळणे, न थांबता सलग ३० मिनिटे लिहीणे, गाणे गाणे, व्यायाम करणे, नवी भाषा शिकणे, छंदासाठी पुरेसा वेळ देणे, छोटे- छोटे समाजोपयोगी कार्य करणे, ध्यान करणे, निसर्गात भटकंती करणे, फोटोग्राफी करणे, चित्रे काढणे, नृत्य करणे... अशा कितीतरी उत्पादक गोष्टींची कास धरावी लागणार आहे. दिवसातून विशिष्ट वेळीच सोशल मिडियावर जाणे आणि आठवड्यातून काही दिवस ‘नो सोशल मीडिया डेज’ म्हणून साजरे कराणे ही काळाची गरजसुद्धा ओळखावी लागणार आहे. मेंदूचे आरोग्य तो तरतरीत, तल्लख आणि सर्जनशील राहण्यात आहे ही खूणगाठ मनाशी बांधून आपण सोशल मिडियाचा विवेकी वापर करू शकलो तरच नवे तंत्रज्ञान रुजवू पाहात असलेल्या माहिती-क्रांतीच्या संक्रमणकाळाला सकारात्मक प्रतिसाद दिला असे आपण ठामपणे म्हणू शकू.
- प्रा. डॉ. शिरीष शितोळे, मानसशास्त्र विभाग, महावीर महाविद्यालय, कोल्हापूर
Monday, 27 December 2021
रत्नपारखी
दुसऱ्यांशी चांगले वागूनही लोक आपल्याशी वाईट का वागतात? जाणून घ्या कारणं...
आपण चांगले तर जग चांगले, ही थोरामोठ्यांची शिकवण आपण अंमलात आणतो. परंतु बरेचदा अनुभव असा येतो, की कितीही चांगले वागा, पण लोक आपल्याशी वाईटच वागतात. असे का? हा प्रश्न आपल्याला पडतो आणि चांगुलपणावरून आपला विश्वास उडायला लागतो. त्यावर उत्तर दिले एका साधूमहाराजांनी!
एका गावातला एक तरुण अतिशय साधा, भोळा आणि प्रेमळ होता. कोणी कसेही वागो, पण त्याने आपला चांगुलपणा कधीच सोडला नव्हता. परंतु एक वेळ अशी येते, जेव्हा संयमाचा बांध फुटतो आणि आपल्याला स्वत:च्या चांगुलपणाचाही राग येऊ लागतो. मन व्यवहारी होते, स्वार्थी होते, परंतु हा बदलही आपल्याला सहन होत नाही. कारण चांगले वागणे हा आपला स्थायी भाव असतो.
त्या तरुणाच्या बाबतीतही तेच झाले. तो अतिशय अस्वस्थ होता. त्याने गावातल्या एका साधूबाबांकडे जाऊन शंकेचे समाधान विचारले. साधू महाराजांनी त्याला आपल्या सदऱ्याच्या खिशातून एक अंगठी दिली आणि म्हणाले, `पुढचा आठवडाभर ही अंगठी तू तुझ्याजवळ ये आणि त्याची किंमत किती मिळू शकेल याचा शोध घे. फक्त काही केल्या ही अंगठी विकू नकोस!'
प्रश्न आणि उत्तर यांचा परस्पर काहीही संबंध नसताना साधूमहाराजांनी दिलेले काम पाहून तरुण निराश झाला. परंतु त्याने दिलेले काम पूर्ण करायचे ठरवले. तो एका व्यापाऱ्याजवळ गेला. त्याला अंगठी दाखवली. तो त्या अंगठीचे हजार रुपये देईन म्हणाला. तरुण मुलगा दुसऱ्या व्यापाऱ्याकडे गेला,त्या व्यापाऱ्याने दहा हजाराची बोली लावली. तिथून तो एका सोनाराकडे गेला. सोनाराने अंगठी नीट पाहिली आणि म्हणाला एक लाख रुपए देतो, पण ही अंगठी मलाच विक! तरुण मुलगा गोंधळला. तिथून तो एका जवाहिराकडे गेला. त्याने मोल ठरवायला वेळ लावला पण त्याने जे उत्तर दिले ते ऐकून तरुण मुलगा चक्रावला. जवाहीर म्हणाला, `माझी सगळी संपत्ती देऊ केली तरी या अंगठीचे मोल मला फेडता येणार नाही,हे ऐकून गोंधळलेला तरुण साधूमहाराजांकडे परत आला. त्याने सगळी हकीकत सांगितली. त्यावर साधूमहाराज म्हणाले, बाळा, अंगठीची किंमत ज्याने त्याने आपल्या कुवतीनुसार सांगितली. जो खरा रत्नपारखी होता त्याने ही अंगठी अमुल्य आहे असे सांगितले. याचाच अर्थ आपले गुण ओळखणारा आणि त्या गुणांची कदर करणारासुद्धा तेवढाच गुणवान असावा लागतो. जे लोक तुझी किंमत करत नाहीत, ते त्यांच्या कुवतीप्रमाणे तुझ्याशी व्यवहार करतात. मात्र जे तुला ओळखतात ते तुझी किंमत , योग्यता समजतात. तू ही अंगठी आहेस हे आधी ओळख आणि तुझी किंमत सामान्य व्यापाऱ्याने ओळखावी अशी अपेक्षा करू नकोस. तू तुझा चांगुलपणा कायम ठेव. कोणीतरी रत्नपारखी आयुष्यात नक्कीच भेटेल.
Wednesday, 24 November 2021
Friday, 12 November 2021
मनाची भूमिका आणि शारीरिक आजार
*कुठलाही आजार आपल्याला का होतो?*
तर त्याचे सहज सोपे उत्तर आहे.
*तुम्ही स्विकारल्यामुळे!*
आपल्या शरीरात पाण्यावर तरंगण्याची नैसर्गिक शक्ती आहे. पण तरीही माणूस पाण्यात बुडून मरतो. याला काय म्हणाल आपल्या मनाने अतिशय स्ट्रॉंगली स्विकारलेय की मला पोहायला येत नाही आणि कोणालाही पोहायला येत नाही ही अंधश्रद्धा आहे. हत्ती किती जड आहे तोही पोहतो. कारण त्याने ठरवलेले नाही. त्याला माहीतच आहे तो पाण्यावर तरंगणार आहे. अहो सापाला हात पाय नसतात. तोही पाण्यात पोहतो. म्हणजे हात पाय हलवले, तरच आपण पाण्यावर तरंगू शकतो हाही गैरसमजच आहे. बघा जी माणसं पाण्यात बुडून मरतात त्यांचे शरीर काही वेळाने पाण्यावर तरंगायला लागते. याप्रमाणेच आपल्यात प्रतिकारशक्ती आहे.
ती आपल्याला कसलाच आजार होऊ नये यासाठी सतत काम करत असते. तिला मनापासून स्ट्रॉंगली मान्य करा. हेच खरे शरीर शास्त्र आहे. मेडीकल सायन्स ही शक्ती तुमच्यात नसेल तर काहीच करू शकत नाही. तर ताप आल्यावर,सर्दी झाल्यावर, शिंक आल्यावर कसलाही आजार झाल्यावर थोडे थांबा.
*तुमच्यातील प्रतिकारशक्तीला काम करू द्या.*
अशा आजारांवर वारेमाप खर्च करणे *शरीरावर अत्याचार* आहेत. ही अंधश्रद्धा आहे.
शरीरशास्त्रात नैसर्गिक प्रतिकारशक्ती म्हणजे खरे विज्ञान आहे.
आपल्या शरीरातली अर्ध्याहून अधिक आजारांच्या मागे आपलं अज्ञ मन असतं. पण कित्येकदा पेशंटला याची माहीती नसते. डॉक्टरांकडे गेलं आणि उपचार घेतले की तात्पुरतं बरं वाटतं, थोड्या दिवसांनी पुन्हा दुखणं, उफाळून येतं, काय करावं, ते समजत नाही.
*मन आणि शरीर यांना जोडणारी काही लक्षणे बघू या.*
१) एखाद्या गोष्टीची जबरदस्त भिती किंवा चिंता वाटली की घशाला कोरड पडते.
२) परीक्षेचा किंवा अजून कसला तणाव असेल तर पोटात गोळा येतो,
३) समोर एखादा अपघात किंवा दुर्घटना पाहिली की हातापायातली शक्ती गळून जाते.
४) आणि याविपरीत सतत हसतमुख असणारी व्यक्ती नेहमी क्वचितच आजारी पडते.
तर हे सिद्ध झाले आहे की, आपल्या शरीरातल्या आंतरिक क्रियांवरही अज्ञात मनाची सत्ता चालते. जसं की, समोर मातीचे कण उडाले की सेकंदाच्या दहाव्या भागात लगेच पापण्या मिटतात. अज्ञात मन शक्तीशाली आहे पण एखाद्या सेनापतीसारखं, त्याच्यावर सत्ता चालते विचारांची!
ताकतवार असला तरी तो गुलामच! दिलेला आदेश पाळणं एवढचं त्याचं काम!
आपण जे काही बोलतो तेच आपले विचार आहेत.
१) ब्लडप्रेशर आणि हृदयविकार -
समजा एखादा माणुस, नकळत, अशी वाक्ये पुन्हा पुन्हा वापरत असेल,
उदा.
- त्याला बघितलं की माझं रक्तच खवळतं!
- ह्यांच्यासाठी मी रक्ताचं पाणी केलं, आणि हे बदलले!
- माझी तळपायाची आग मस्तकाला जाते!
क्वचित अशी वाक्ये वापरली गेली, तर हरकत नाही, पण पुन्हा पुन्हा हेच बोलल्यास आणि ते सुप्त मनात गेल्यास त्याचा विपरीत परिणाम रक्ताभिसरणावर नक्कीच होतो.
डॉक्टरकडे गेल्यावर औषध-उपचाराने काही काळ बरं वाटतं, पण अज्ञात मन त्याचा पिच्छा सोडत नाही.
ही सर्व वाक्य सतत तणावात असणार्या व्यक्तीच्या सवयीचा भाग बनतात आणि लवकरच तिला ब्लडप्रेशर आणि मोठ्या स्वरुपाचे हृदयाचे विकार घेरण्यास सुरुवात करतात.
थोडक्यात सतत मानसिक तणाव, हताशपणा आणि निराशा अनुभव करणाऱ्या व्यक्तीला हृदयाचे विकार लवकर घेरतात.
२) आतड्यांचे विकार – जी व्यक्ती स्वतःलाच घालून पाडून बोलते, स्वतःची निंदा करते, स्वतःला दुबळा समजते, तिला छोट्या आतड्यांच्या विकारांची समस्या उदभवते.
३) अपचन – बहुसंख्य लोक ह्या आजाराने त्रस्त आहेत, खरं तर मलविसर्जन ही अतिसहज आणि नैसर्गिक क्रिया आहे, तरीही काही जणांना ‘धक्का देण्यासाठी’ कृत्रिम उपायांचां, जसं की एखादे चुर्ण किंवा एखादं औषध ह्यांचा आधार घ्यावा लागतो.
आता ह्याची बरीचशी कारणं आहेत, इथे एका उदाहरणची चर्चा करुयात.
काही वेळा ह्याचं कारण बाल्यावस्थेत दडलेलं सापडतं, कडक शिस्तीच्या नादात आई वडीलांनी मुलाला एखादी शिक्षा केलेली असते, त्याचा राग त्याच्या मनात असतो, लहान मूल आईवडीलांवर राग काढू शकत नाही, त्याला त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकावीच लागते, त्यांना विरोध म्हणून ही क्रिया तो रोखून धरतो.
ह्या ठिकाणी आई वडील त्याला जबरदस्ती करु शकत नाहीत, हळुहळू तो मोठा होतो, शिस्तीचा बडगाही संपतो पण आपल्या आतड्यांवरचं नैसर्गीक नियंत्रण तो हरवून बसतो.
असं ही बघण्यात आलं की जेव्हा व्यक्ती आर्थिक संकटात सापडते, तेव्हा तिची पचनशक्ती कमजोर होते. जे लोक कंजुष वृत्तीचे असतात, त्यांच्यामध्ये मुळव्याध्याची समस्या जास्त आढळते.
४) छोट्याछोट्या गोष्टींवरही एखादी व्यक्ती वारंवार उत्तेजित होते, चिडते, अस्वस्थ होते, त्याचा परिणाम जठर आणि पित्ताशयावर पडतो.
५) डोकेदुखी –
आजकाल बहुतांश भगिनीवर्गाला झंडुबाम शिवाय झोप येत नाही. कारण काय असेल बरं?
- ह्या व्यक्तीला बघितलं की माझं डोकं दुखतं!
- त्याने माझं खुप डोकं खाल्लं!
- आमच्या ह्यांच्यासमोर कितीही डोकं फोडा, काही फायदा नाही,
निरंतर, नकळत असं बोलत राहील्याने अज्ञ मनात संदेश पोहचतो की माझ्या डोक्याला दुखायचे आहे.
आणि मायग्रेनचा त्रास चालू!
डोकेदुखीची अजुनही काही कारणे आहेत, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एखादी अप्रिय घटना घडलेली असतेच, पण तिला मनातल्या मनात पुन्हा पुन्हा तिला उगाळण्याचा स्वभाव असेल तर डोकेदुखी सुरु होते.
तेव्हा असे कटु अनुभव विसरुन जाणेच इष्ट!
कधी नकोसे वाटणारे काम, त्रासदायक काम अंगावर येऊन पडते, आणि डोके दुखते. जितके पोस्टपोन केले तेवढा त्रास होतो, तेव्हा अशी कामे तात्काळ निपटून काढावीत.
६) पाठदुखी वा कंबरदुखी –
एखादी व्यक्ती सतत जबाबदारीच्या ओझ्याने वाकून थकुन गेली असेल तेव्हा तिला पाठदुखीला वा कम्बरदुखीला सामोरं जावं लागतं. असह्य वेदना होतात, ह्यात मानेपर्यंतचे स्नायू आखडले जातात. त्यांच्यावरचा ताण जाणवतो.
चेहरा मूळ स्थानी न राहता उजवीकडे किंवा डावीकडे कलतो.
आता सर्वात महत्वाचे, ह्यावर उपाय काय आहे?
आपापले औषधौपचार चालू ठेवा, पण हे रोग शरीरातून समूळ उपटून काढायचे असतील तर स्वयंसुचन हाच ह्यावरचा एकमेव उपाय आहे.
जसं की डोकेदुखीचं उदाहरण घेऊ – तंद्रावस्थेत जाऊन आपल्या अज्ञात मनाला सुचना द्या –
आता माझं डोकं एकदम हलकं हलकं होत आहे,
आता ते अजून शिथील आणि हलकं झालं आहे,
डोके दुखण्याचे प्रमाण कमी होत आहे, माझ्या डोक्यात जमा झालेलं अतिरीक्त रक्त आता शरीराच्या इतर भागात सुरळीतपणे पसरत आहे.
माझा डोकेदुखीचा त्रास नाहीसा होत आहे, काही क्षणांमध्ये ही बैचेनी दुर होईल!
आणि डोकेदुखी गायब!
प्रत्येक रोगासाठी अशा सुचना तयार करुन त्या अज्ञ मनापर्यत पोहचवून रोगमुक्त होता येते.
सारांश काय तर मित्रांनो, भावनांची कोंडी करुन जगू नका, रोग बनून ते शरीराला पोखरतील, राग व्यक्त करा, आणि मोकळे व्हा!
इथे मला एका महापुरुषाचा दृष्टांत आठवतो, त्यांना राग आल्याक्षणी ते कागद घ्यायचे आणि सविस्तर लिहून काढायचे, मनातले संपुर्ण भाव ओतून रिते व्हायचे, ते कागद दोन चार दिवस तसेच टेबलावर ठेवायचे आणि नंतर जाळून किंवा फाडून टाकायचे.
अशा प्रकारे मनातली सारी खळबळ बाहेर काढून टाकता येते. आता क्रोधाची भावना नाहीशी होते आणि हलकं हलकं वाटतं.
चला तर मग सर्वांनी निरोगी आणि ठणठणीत आयुष्यासाठी प्रयत्न करूया..
Sunday, 7 November 2021
भावना दुखावण्याच्या आजारावर औषध!
‘भावना दुखावण्या’चे परिणाम वाईटच : अपमान / अपयश / टीका सहनशक्तीच्या पलीकडे जाऊन, टोकाचे पाऊल उचलले जाते… हे व्यक्तींच्याच नव्हे, तर समाजांच्याही बाबतीत होऊ शकते. या आजारावर मात कशी करायची, याची पद्धती शोधणारे डॉ. आरॉन बेक नुकतेच दिवंगत झाले…
डॉ. आरॉन बेक या जगविख्यात मनोविकारतज्ज्ञाचे नुकतेच फिलाडेल्फिया येथील राहत्या घरी निधन झाले. शंभर वर्षांचे अत्यंत अर्थपूर्ण आणि समाधानी आयुष्य त्यांना मिळाले. मानवी मनाची ‘अव्यक्त मन आणि व्यक्त मन’ अशी मांडणी करणारा सिग्मंड फ्रॉइड आपल्याला थोडाबहुत माहीत असतो; पण डॉ. आरॉन बेक आणि त्यांचे मनोविकार क्षेत्रातील काम यांविषयी आपण ऐकले किंवा वाचले नसणे अगदी स्वाभाविक आहे. या पार्श्वभूमीवर मानवी मनाचे आणि वर्तनाचे आकलन मूलगामी पद्धतीने बदलणाऱ्या डॉ. आरॉन बेक यांचे काम समजावून घेणे हे त्यांचे स्मरण करण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे असे वाटते. त्यांच्या कामाला आपल्या काळाचादेखील एक अत्यंत महत्त्वाचा संदर्भ आहे. एवढ्या तेवढ्या कारणांवरून भावना दुखावल्या जाणाऱ्या कालखंडात आपण सगळे जगात आहोत! केवळ त्या भावना स्वत: दुखावून घेऊन आपण थांबत नाही तर सगळ्या समाजाला आपल्या दुखण्यासाठी वेठीस धरण्याची एक पद्धत आपल्याकडे रूढ झाली आहे. अशा कालखंडात तर, ‘भावना दुखावण्याच्या आजारावर औषध शोधणाऱ्या’ डॉ. आरॉन बेक यांचे विचार खूपच अधिक महत्त्वाचे ठरतात.
भावना दुखावण्याचे दैनंदिन जीवनातील अनेक प्रसंग आपण सहज आठवू शकतो. कामाच्या ठिकाणी बॉस घालून-पडून बोलतो म्हणून अस्वस्थ होणे, परीक्षेत अपेक्षेइतके गुण मिळाले नाहीत म्हणून येणारे वैफल्य, प्रेमाच्या नात्यात किंवा लग्नात अपयश आल्याने झालेले अतीव दु:ख अशा अनेक गोष्टी आपण आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या स्वत:च्या आयुष्यात अनुभवत असतो. यामधून जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या भावना दुखावण्याच्या कारणांचा आपण जर लसावि काढला तर तो, ‘परिस्थिती अशी निर्माण झाली म्हणून माझ्या भावना दुखावल्या’ किंवा ‘दुसऱ्याने मुद्दामच माझ्या भावना दुखावल्या’ हा निघतो. थोडक्यात, आपल्या अस्वस्थतेसाठी दुसऱ्या व्यक्तीला किंवा परिस्थितीला दोष देणे सुरू होते. याची पुढची पायरी म्हणजे, ‘समोरची व्यक्ती किंवा परिस्थिती बदलत नाही तोपर्यंत माझे भावनिक दुखणे दुरुस्त होणार नाही,’ अशी धारणा करून घेतली जाते. यातूनच परिस्थिती शरणता आणि परिस्थिती बदलावी म्हणून कर्मकांडे, त्यामधून येणारी फसवणूक, हे सारे सुरू होते. डॉ. बेक यांनी हा भावना दुखावल्या जाण्याचा जो आजार आहे, त्याविषयी नवीन- कोरी करकरीत- मांडणी केली. अगदी मुळावरच घाव घातला म्हटले तरी चालेल.
त्या मांडणीनुसार, ‘कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला होणारा भावनिक त्रास हा प्रत्यक्षातील घटनेचा नसून त्या घटनेचा आपण जो अर्थ लावतो त्याचा असतो!!’ एक छोटे उदाहरण घेऊ. दरवर्षी हजारो मुले परीक्षेत नापास होतात. पण त्यामधली फारच थोडी नापास झालो म्हणून आत्महत्येचा प्रयत्न करतात. आता याचा अर्थ सरळ आहे की, आत्महत्येचे विचार हे परीक्षा नापास होण्याच्या घटनेशी थेट संबंधित नाहीत. तसे असते तर प्रत्येक नापास मुलाने आत्महत्येचा विचार केला असता. प्रत्यक्षात असे होताना आपल्याला दिसत नाही. मग काय घडते तर ज्या मुलांचे मन असा विचार करते की, ‘आपण परीक्षेत नापास झालो म्हणजे आपण जगण्यास लायक नाही’ तीच मुले आत्महत्येचा विचार करतात. जी मुले, ‘आता नाही तर पुढच्या वेळी पास होऊ!’ असा विचार करतात; ती आत्महत्येच्या वाटेला जात नाहीत. याचाच अर्थ असा की, आपल्याला होणारा भावनिक त्रास हा त्या नापास होण्याच्या घटनेमुळे नसून त्या घटनेचा आपण जो अर्थ लावतो त्याच्याशी संबंधित आहे! म्हणजे हा ‘भावना दुखावण्याचा आजार’ नसून ‘भावना दुखावून घेण्याचा आजार’ आहे. डॉ. बेक यांच्या मांडणीतून हे सत्य पुढे आले. तेवढेच महत्त्वाचे दुसरे सत्य असे की, एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेसारखे हे विचार आपल्या मनाच्या पटलावर उमटत असतात. त्यांच्या या स्परूपामुळे आपण असे धरून चालतो की ते विचार योग्यच आहेत. प्रत्यक्षात मात्र परिस्थितीच्या पलीकडे जाऊन, स्वत: निर्णय घेऊन आपण कुठल्याही परिस्थितीला दिलेला स्वत:चा प्रतिसाद बदलू शकतो; अधिक विवेकी आणि विधायक करू शकतो, असा त्या उपचार पद्धतीचा गाभा आहे. एकदा का आपण अशा प्रकारे ‘स्वत:चे विचार तपासायची आणि बदलायची सवय’ स्वत:ला लावली की आपल्याला परिस्थितीमधून येणारी भावनिक हतबलतासुद्धा बदलता येते. आपल्या मनावर आपला ताबा मिळवण्याच्या दृष्टीने आपले एक महत्त्वाचे पाऊल पडते.
साधारण १९६० ते ७० च्या दशकाच्या दरम्यान ही मांडणी जेव्हा डॉ. बेक यांनी केली, तेव्हा ‘मानवी वर्तनाला त्याच्या अव्यक्त मनातील आणि बालपणातील अनेक घटनांशी संबंधित कारणे असतात,’ या स्वरूपाची सिग्मंड फ्रॉइड यांची मांडणी प्रबळ होती. मानवी मनाच्या अभ्यासात तिचे म्हणून एक स्वतंत्र महत्त्व आहे. त्या अभ्यासावर मानवी अंतर्मन आणि अव्यक्त भावना यांचा खूप मोठा प्रभाव आहे. आपल्या सर्व भावभावना या अंतर्मनाच्या गुलाम आहेत आणि अंतर्मनाचा गुंता सुटल्याशिवाय आपण आपली वर्तणूक बदलू शकत नाही, अशी एक हतबलता आणि परिस्थिती शरणता त्यामध्ये आहे. डॉ. बेक यांनीदेखील या ‘सायकोअॅनालिसिस’ (मनोविश्लेषण) म्हटले जाणाऱ्या पद्धतीचा अभ्यास केला होता. मात्र ‘सायकोअॅनालिसिस’च्या मर्यादाही लक्षात आल्यामुळे त्यांनी ही मानवी विचारांना केंद्रस्थानी ठेवणारी आणि प्रत्येक माणसाला- परिस्थिती कशीही असली तरी- आपल्या भावनांचा लगाम आपल्या हातात घेता येऊ शकेल अशी विचारनिष्ठ उपचार पद्धती शोधून काढली.
याच स्वरूपाची मांडणी आणि काम करणारे डॉ. अल्बर्ट एलीस आणि डॉ. आरॉन बेक हे दोघेही साधारणत: समकालीन होते. डॉ. एलीस यांनी ही विचार आणि उपचार पद्धती सामान्य लोकांपर्यंत नेण्यासाठी त्यांची हयात खर्च केली; तर डॉ. बेक यांनी त्याचा शास्त्रीय अभ्यास, संशोधन आणि त्याविषयी प्रशिक्षण देणे यांवर आयुष्यभर जोर दिला.
जगप्रसिद्ध जर्नल्समध्ये साधारण ६०० शोधनिबंध आणि दोन डझन पुस्तके ह्यांच्या माध्यमातून त्यांनी आपले विचार आणि संशोधन मांडून ठेवले आहे. आजअखेर लाखो लोकांनी मानसिक अस्वस्थतेच्या वेळी त्यांनी शोधलेल्या उपचार पद्धतीचा वापर करून स्वत:ला सावरले आहे आणि येत्या कालखंडात ही संख्या वाढतच जाणार आहे.
डिप्रेशनच्या आजाराच्या सौम्य टप्प्यावर ही उपचार पद्धती औषधांच्या इतकीच प्रभावी ठरते, असे संशोधन आता जगभर मान्य आहे. केवळ डिप्रेशन नव्हे, तर व्यक्तिमत्त्व दोष, व्यसनाधीनता यांच्यापासून ते तीव्र मानसिक आजारापर्यंत अनेक आजारांमध्ये या विचारकेंद्री उपचार पद्धतीचा वापर केला जातो.
नातेसंबंध टिकावे आणि बहरावे यासाठी त्यांनी ‘लव्ह इज नॉट इनफ!’ (केवळ प्रेम पुरेसे नाही..) अशा गंमतशीर नावाचे पुस्तक लिहिले आहे. चांगल्या आणि अर्थपूर्ण नात्यासाठी केवळ प्रेम पुरेसे नसते. त्याबरोबर मनाची संवेदनशीलता, उदारता, जबाबदारीचे भान, निष्ठावानपणा असे अनेक महत्त्वाचे गुण असतात हे डॉ. बेक यांनी आपल्या लक्षात आणून दिले आहे. एकमेकांच्यावर अतीव प्रेम करणारी अनेक नाती दीर्घकाळ का टिकू शकत नाहीत आणि फारसे प्रेम नसलेली नातीदेखील अनेक वेळा कशी दीर्घकाळ टिकतात याचे उत्तर हे पुस्तक वाचताना मिळू शकते.
डॉ. बेक यांनी दोन वेळा- २००२ आणि २०१५ मध्ये – दलाई लामा यांच्याशी संवादाचा कार्यक्रम केला. ही विचारकेंद्री उपचार पद्धती आणि बुद्धविचार यांमध्ये मोठे साम्य असल्याचे निरीक्षण डॉ. बेक यांनी नोंदवून ठेवले आहे. विविध धर्मांमधील पुनर्जन्म, ‘मागच्या जन्मीचे पाप’, स्वर्ग-नरक या संकल्पनांच्या पलीकडे जाऊन आपल्या जीवनातील दु:खाचे ‘स्वत:च्या आत असलेले कारण’ शोधणाऱ्या ज्या परंपरा आहेत त्यांनादेखील पुढे नेणारा हा विवेकवादी विचार आहे. केवळ वैयक्तिक दु:ख आणि भावनांचे दुखावणे नाही; तर समाजपातळीवरदेखील हे विचार खूप महत्त्वाचे आहेत. ‘शत्रूकेंद्री जगणे’ आणि आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्या कोणाला तरी जबाबदार धरण्याची जणू एक पद्धत आपल्याकडे निर्माण झाली आहे. या शत्रूकेंद्री आणि भूतकाळवादी विचारधारेला एक सशक्त पर्याय देण्याचे सामथ्र्य या ‘स्व’लक्ष्यी, विचारनिष्ठ आणि वर्तमानाला महत्त्व देणाऱ्या पद्धतीमध्ये आहे.
शेवटपर्यंत कार्यरत राहिलेल्या डॉ. बेक यांचे काम हे आता बेक इन्स्टिट्यूटच्या (स्थापना : १९९४) माध्यमातून पुढे जात राहील. ‘मनाच्या पृष्ठभागावरदेखील खूप काही असते- आपण केवळ डोळे उघडून बघायला हवे,’ हा डॉ. बेक यांचा संदेश आपण ध्यानात घेतला पाहिजे. आपले स्वत:चे, आपल्या कुटुंबाचे आणि एकुणात समाजाचे खूप भले करण्याची ताकद या विचारात आहे!
संदर्भ : दै. लोकसत्ता
Saturday, 9 October 2021
संतुलित मन, समाधानी जीवन
आपल्या मनाला कसं सांभाळावं
जसं एखादं वाद्य वाजवण्यासाठी त्यामध्ये संतुलन जसं गरजेचं असतं. तंबोऱ्याच्या तारा कसल्या तर त्या तुटून जातील आणि त्या जर ढिल्या सोडल्या तर त्यामध्ये नाद निर्मिती होणार नाही. म्हणजेच त्याच्यामध्ये योग्य संतुलन असणं गरजेचं आहे. तसंच आपलं देखील आहे. आपलं शरीर हे यंत्र आहे. शरीर-मन-मेंदू यामध्ये देखील योग्य संतूलन असणं गरजेचं आहे. शरीराचं यंत्र हे मनावर अवलंबून आहे. यासाठी आपलं मन सतत सकारात्मक विचारांमध्ये गुंतवूण ठेवणं गरजेचं आहे. थोडासाही ताण जाणवला तर त्यावर वेळीच उपचार करणं महत्त्वाचं आहे. जसं आपण पाय दुखतोय, गुडघा दुखतोय म्हणून डॉक्टरकडे जातो तसंच जरासंही मन दुखलं तरी डॉक्टरकडे जाणे गरजेचे आहे. मन आनंदी नसेल तर आपण समाधानी राहू शकत नाहीत.
ताण - तणाव घालवण्यासाठी सोपे उपाय
सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आपल्या आवडीचा छंद जोपासणं गरजेचं आहे. सर्वांनी खेळायला पाहिजे कारण खेळ आपल्याला चांगल्या पद्धतीनं जगण्याचं शिकवत असतं. खेळामुळे आपण खूप आनंदी राहत असतो. वर्तमानात कसं आनंदी रहावं हे आपण खेळातून शिकतो. जसं की एखाद्या खेळाडून गोल केला तर तो आनंद साजरा करतो त्याला याची चिंता नसते की आपण उद्याचा सामना जिंकणार की हारणार. तो फक्त आजचा क्षण आनंदानं साजरा करत असतो. त्यामुळे सर्वांनी खेळणं खूप गरजेचं आहे. शिवाय आपल्याला ज्या गोष्टीमध्ये वेळ घालवणं गरजेचं आहे. ध्यानधारणा, सूर्य नमस्कार, योगा यामुळे देखील ताण तणाव खूप प्रमाणात कमी होतील. तसेच आपल्याला खूपच ताण जाणवत असेल तर मानसोपचार तज्ज्ञाचा किंवा समुपदेशकाचा सल्ला घेणं कधीही आवश्यक आहे.
मानसिक आरोग्य बिघडण्याचं कारणं
मानसिक आरोग्य बिघडण्याचं मुख्य कारण म्हणजे आजची जीवनशैली होय. आजच्या स्पर्धेच्या युगात मनात आलेली आणि हवी असलेली गोष्ट लगेच हवी आहे. कोणतीही गोष्ट प्राप्त करण्यासाठी जो संयम लागतो तो आजच्या पिढीमध्ये दिसून येत नाही. महत्त्वाकांक्षा असणं वेगळं आणि अतिमहत्त्वाकांक्षा असणं हे वेगळं. या अतिमहत्त्वाकांक्षेपायी आजचा तरूण तणाखाली येत आहे.
गंभीर मानसिक आजाराचं प्रमाण
साधारणपणे गंभीर मानसिक आजाराचं प्रमाण ३० टक्के आहे. तसं पाहिलं तर आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक व्यक्तीला कोणता ना कोणता ताण असतोच. अनेक जण आपण केलेल्या कामाबद्दल समाधानी नसतात, ८ ते १० तास काम करुनही काम केल्याचं समाधान मिळत नाही. अशावेळी आपण आपल्या जीवनशैलीकडे बारकाईने पाहणं गरजेचं असतं. आपला जास्तीत जास्त वेळ कशात जात आहे, आपला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे हे आपण पाहणं गरजेचं आहे. याकडे दुर्लक्ष केलं तर आपला प्रवास गंभीर मानसिक आजाराकडे होऊ शकतो.
मानसिक रुग्णांबद्दल महत्त्वाची बाब
ही महत्त्वाची बाब आहे. कारण रुग्ण तर सोडाच पण कुटूंबिय देखील हे मान्य करत नाहीत की आमच्या कुटूंबात कोणी मानसिक रुग्ण आहे. यासाठी वेगवेगळ्या प्रकारे रुग्णांना डॉक्टरपर्यंत आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. जसे की त्याला डॉक्टरकडे जायचे आहे असं न सांगता आपल्याला एका मॅडमला भेटायला जायचे आहे असे सांगावे लागते. त्याला आवडणाऱ्या गोष्टींवर पहिल्यांदा चर्चा केली जाते. एकदा त्याचा विश्वास संपादन केला की, मग उपचाराला सुरूवात केली जाते.
मानसिक आजारामध्ये अनुवांशिकता आणि परिस्थितीजन्य प्रकार
तसं पाहिलं तर अनुवांशिकता खूप महत्त्वाची आहे. आपल्या आजोबा, वडील यांना जर एखादा मानसिक आजार असेल तर शक्यता असते की पुढल्या पिढीला याचा धोका असतो. तसंच परिस्थितीजन्य प्रकारात कुटूंब देखील महत्त्वाचा भाग असतो. आपण एका कुटूंबाचे घटक असतो. आपण कोणत्या कुटूंबातून आलोत, कुठल्या वातावरणात वाढलो आहोत, शिक्षण कोणत्या क्षेत्रात घेतलं आहे हे खूप महत्त्वाचं आहे. यातून देखील ते तणावाखालून जातात. तरूण पिढीमध्ये तर तणावाचं कारण खूप वेगवेगळे असल्याचं दिसून येत आहे कारण बरेच तरूण फेसबुकवर मला खूप लाईक्स मिळाले, मला गर्लफ्रेंड नाही, मला बॉयफ्रेंड नाही अशा गोष्टींवरून देखील तणावाखाली जाताना पहायला मिळतात.
मानसिक रुग्णाच्या प्रमाणात उपलब्ध मानसोपचार तज्ज्ञ किंवा समुपदेशक
तसं पाहिलं तर मानसिक रुग्णाच्या प्रमाणात खूपच कमी मानसोपचार तज्ज्ञ आणि समुपदेशक उपलब्ध आहेत. समाजातील संतुलन योग्य ठेवण्यासाठी तरूणांनी या क्षेत्राकडे वळणे गरजेचे आहे. करिअरसाठी हे क्षेत्र चांगलं आहे.ज्यांना समाजासाठी काहितरी करायचं आहे त्यांनी निश्चितच याकडे वळणं योग्य राहिल. मानसशास्त्र किंवा समाजशास्त्र या विषयात पदवी अथवा पदविका प्राप्त करुन समुपदेशानाचे कार्य करता येते. महत्त्वाचे म्हणजे समुपदेशकामध्ये संयम खूप महत्त्वाचा असतो. कारण मानसिक रुग्ण हा पूर्णपणे खचलेला असतो अशा वेळी समुपदेशकाने त्यामध्ये सामावून जाता तटस्थ राहून त्याच्याशी संवाद साधणं गरजेचं आहे. कंटाळून न जाता त्याला वारंवार मार्गदर्शन करणं गरजेच आहे.
संदर्भ : आरोग्यविद्या डॉट कॉम
आयुष्य संपवण्याचे विचार मनात कसे येतात आणि ते कसे रोखावेत?
आत्महत्या हा अनेक दशके आपल्या समाजात दुर्लक्षलेला विषय राहिला आहे. सुशांत सिंग राजपूत, जिया खान, भय्यूजी महाराज अशा व्यक्तींच्या आत्...
-
आत्महत्या हा अनेक दशके आपल्या समाजात दुर्लक्षलेला विषय राहिला आहे. सुशांत सिंग राजपूत, जिया खान, भय्यूजी महाराज अशा व्यक्तींच्या आत्...
-
अतींद्रियाचे विज्ञान "विपरीत..विचित्र..अलौकिक.. अतींद्रिय..दैवी" अशा अनेक घटना घडतात व त्या सत्य आहेत असे मानणारे श्रद्धाळू आणि अं...