हा लेख भारतातील प्रत्येक एका व्यक्तीसाठी आहे मग ती जेष्ठ नागरिक असो किंवा तरुण स्त्री, पुरुष किंवा लहान मुलं असो. कोरोना या Virus किंवा आजाराने प्रत्येक एका व्यक्तीच्या मनामध्ये भीती निर्माण केलेली आहे आणि या भीती पासून किंवा चिंता निर्माण करणाऱ्या विचारांपासून किंवा नैराश्यापासून आपल्याला प्रत्येकाला स्वतःला वाचवायचे आहे. मन आणि शरीर या दोन्हींना बळकट करून, तसेच स्वछता करून, कोरोना या आजाराला नष्ट करायचे आहे.
आपण स्वतःला घरात बंद केलेले आहे, आणि आपण सरकार जे काही स्वच्छतेविषयी उपक्रम राबवता आहेत, किंवा जनजागृती करीत आहेत त्याचे आपण पालनही करतो, पण कुठे तरी मनात पाल चुकचुकतेचं, कारण आपण टीव्ही समोर जरी बसलो तरी न्यूज चॅनेल शिवाय काही पाहत नाही कारण मनात कोरोनाविषयीची भीती असतें, आणि मग आपल्याला सगळ्या जगाची स्थिती कळते, जसेकी, स्पेन या देशात इतके संक्रमित, फ्रान्स मध्ये इतके संक्रमित तसेच इटलीमध्ये आणि चीनमध्ये सुद्धा संक्रमितांची संख्या इतकी इतकी....... आणि मग एकूण पूर्ण जगात मरणाऱ्यांची संख्या इतकी इतकी......आहे असे समजते. आणि जेवढे लोक टीव्ही बघत असतात त्यांच्या मनात एकदम धस्स होते. आणि घरात बसून स्वतःची, कुटुंबाची आणि घराची स्वच्छता करूनही, मनात नकारात्मक विचार यायला सुरु होतात, आणि मग आपण सगळेच जण न्यूज चॅनल्स लाही दोष द्यायला लागतो. कारण आपल्या मनामध्ये येणारे नकारात्मक विचार आपल्याला दोष द्यायला भाग पाडतात. पण, माझे म्हणणे आहे, आपण नकारात्मक विचारच का करायचे किंवा नकारात्मक विचार जरी मनात आले तरी, त्याला महत्व का द्यायचे? कारण न्यूज चॅनेल चालवणाऱ्यांचा उद्देश आपली मानसिकता खचविण्याचा मुळी नसतोच. ते फक्त इतर देशांची माहिती देऊन आपल्या भारताची अवस्थाही तशी होऊ नये, तसेच काय काळजी घेऊन आपण या कोरोना नावाच्या आजारापासून आपल्या देशाचा बचाव करू शकतो! इतकाच काय तो उद्देश असतो. पण आपण टीव्ही बघून किंवा नकारात्मक चर्चेतून आपले मानसिक खच्चीकरण करून घेतो, आणि आपल्यापैकी बरेच जण नकारात्मक विचारांना महत्व देऊन डिप्रेशन मध्ये सुद्धा जातात आणि टोकाचे पाऊल उचलतात.
आपल्याला नकारात्मक विचारांना बाजूला ठेऊन सकारात्मक विचार करून मीडिया च काय पण सरकार, डॉक्टर आणि जे जे लोकं सेवेत आहे त्यांची आपल्या सगळ्यांना वाचवण्याची धडपड पाहून, आपणही सकारात्मक विचार करून आणि त्याप्रमाणे वागून त्यांचे आणि स्वतःचे सहकार्य करूयात आणि कोरोनाला पळवून लावूयात.
आपल्याला सद्या फक्त जोही विचार येतो, तो फक्त जगण्यासाठीचा असतो, माझं कुटुंब आणि मी, माझे शेजारी आणि माझा सम्पूर्ण देशच कसा जगवता येईल! या सकारात्मक विचाराने प्रत्येक एक व्यक्ती चिंतीत आहे, आणि विचार हा नकारात्मक असो किंवा सकारात्मक तो फक्त जगण्यासाठीचाच असतो. काही व्यक्ती अशाही दिसून येतात, कि साधी सर्दी जरी झाली तरी त्या व्यक्तीला वाटते कि मला कोरोना तर नाहीना झाला! आणि या वाटण्याने व्यक्ती नैराश्यात जाते, आणि टोकाचे पाऊल उचलते. पण कधी विचार केला का नकारात्मक विचार सुद्धा जगण्यासाठीचाच असतो, मग असे टोकाचे पाऊल का बरे उचलायचे? त्यापेक्षा आपण कोरोनासारख्या आजाराला कसे हरवायचे याचा सकारात्मक विचार करू आणि आपल्या मनापासून आणि शरीरापासून कोरोनाला दूर ठेऊ.
आपण तर फक्त घरात बसून नकारात्मक विचारांनी स्वतःला खचवतो, पण कधीतरी विचार केला आहे का! त्या डॉक्टरांचा? जे कि संक्रमित असलेल्या रुग्णांची रात्र आणि दिवस सेवा करीत आहेत, ते तर किती जवळून कोरोना अनुभवता आहेत त्यांचे मन काय म्हणत असेल!, हा विचार आपल्या मनात यायला हवा आणि आपणही सकारात्मक विचार करून कोरोना विरुद्ध विचार करून योग्य ती वर्तणूक करायला हवी.
संक्रमित असलेल्या रुग्णांच्या सेवेत असणारे डॉक्टरांचे आपण खूप आभार मानायला हवेत. सेवा करणारे सगळेच मग ते आपलं सरकार असो किंवा डॉक्टर असो, पोलीस कर्मचारी असो किंवा गरिबांना अन्नपाण्याची मदत करणारे असो, या सर्वांचे आपण मनापासून खूप खूप आभार मानू आणि कोरोनाशी लढण्याची तयारी करू, मन आणि शरीर बळकट करू आणि स्वच्छ हाथ धुवू, कुटुंबालाही स्वच्छता करायला लावू आणि या स्वछतेवर विश्वास ठेवून कोरोना या आजाराला मुळापासून आपल्या देशातून नष्ट करू आणि हे मोठे युद्ध जिंकूनच राहू.
(कॉपी पेस्ट)
No comments:
Post a Comment