#सुखाची_गुरुकिल्ली
परवाच एका स्नेह्यांना भेटायला एका नामांकित हॉस्पिटलमध्ये गेले होते .
समोरून आलेल्या डॉ . समिक्षा ने मला Hi मावशी , आज इथे कशी काय ? म्हणून प्रश्न केला .
क्षणभर तिचा .... आत्मविश्वास , रुबाबदार व्यक्तिमत्व !! हॉस्पिटलमध्ये तिला मिळणारा मान बघून माझा ऊर अभिमानाने भरून आला . तिने मला आग्रह करून तिच्या केबिनमध्ये नेऊन कॉफी ऑफर केली . गप्पांच्या ओघात अनेक विषय झाले ....नुकतीच तिचे कॉन्फरन्स निमित्ताने अनेक परदेशी दौरे झाले होते .....!! बोलता बोलता
समिक्षा म्हणाली खरे सांगू मावशी तू जर मला त्या वेळेस खडे बोल सुनावले नसतेस ...... थोडक्यात माझे counselling केले नसते तर मी त्या धक्क्यातून सावरले नसते तुझे माझ्या कुटुंबावर , माझ्यावर खूप उपकार आहेत !! ....बास कर समिक्षा !! ....जो तो आपआपल्या परीने झगडत असतो . आपला मार्ग शोधतो फक्त मी एक तुझ्यासाठी निमित्त ठरले !
बस इतकंच !! ...चल पुन्हा भेटूया या रविवारी नक्की म्हणून मी तिचा निरोप घेतला .... घरी परतताना राहून राहून समिक्षा प्रकरणाची आठवण होत होती ....!!
समिक्षा तिच्या आई व भावासह आमच्या सोसायटीत राहायला आली ....आपल्या बोलक्या , मनमिळावू स्वभावाने ती लवकरच आमच्यात मिसळून गेली
.....तिची आई रमाताई फारच बुजऱ्या स्वभावाच्या त्यातून छोट्या गावाकडून पुण्यासारख्या शहरात आल्याने त्या भांबावून गेल्या होत्या . पण माझ्या सहवासात आमची नाती फुलत गेली ....
समिक्षा १२ वि ची परीक्षा , NEET वगैरे उत्तम गुणांनी प्राविण्य मिळवून पास झाली .तिने मेडिकल ला ऍडमिशन घेतली . तर छोटा भाऊ सुजय १०वी नंतर नुकताच डिप्लोमा मेकॅनिकल ला होता ....!!
दोघेही बहीण भाऊ खूप हुशार !! गावी शेती वाडी , वडील नामांकित बागायतदार द्राक्ष , ऊस मळा शेतीवाडी यात ते रममाण !! स्वतः शिकलेले असूनही त्यांनी हेतुपुरस्सर ही वाट चोखाळली होती !! अनेक आधुनिक , सुधारित बदल करून त्यांनी शेती - व्यवसाय मध्ये आपले पाय भक्कम रोवले होते .
आजही त्यांचा शेतीचा माल फॉरेनला जातो ....
आपल्या मुलांनी शिकून मोठे व्हावे हा एकच ध्यास या दांपत्यानी घेतला होता .
पुण्यात मुलांकडे येताना ते आम्हालाही भाजीपाला वगैरे आणत .
दोन्ही मुलांकडे त्यांचे खुप चांगले लक्ष असायचे
आम्हालाही ते मुलांवर लक्ष ठेवा .....वगैरे सूचना देत असत !! असे हे समाधानी कुटुंब !!
समिक्षा कॉलेजमध्ये पहिल्यापासून आघाडीवर
पण एका छोट्या गावातून
आलेल्या मुलीचा पाणउतारा करण्यात काही स्टायलिश मुली आघाडीवर होत्या . सुरुवातीला समिक्षाने त्यांच्याकडे दुर्लक्ष करून अभ्यासावर लक्ष केंद्रित केले .....हळूहळू ती कॉलेजमध्ये रुळली , ओळखी झाल्या !! .....
कॉलेजचे फंक्शन , गॅदरिंग सगळ्यात तिचा उस्फुर्त सहभाग असे !!
आवाज ही गोड असल्याने गाणी अतिशय सुंदर म्हणत असे !! .....
हळूहळू पाहिले वर्ष सरले
.....अपेक्षेप्रमाणे समिक्षा कॉलेजमध्ये पहिली आली .....!! आता मात्र टिकाटिपण्णी करणारे तिच्याकडे अभिमानाने पाहू लागले . समिक्षा सगळ्यांचा कौतुकाचा विषय झाली .....!!
नंतर दुसऱ्या वर्षात असताना ती कॉलेजमध्ये न जाता चार चार दिवस घरातच राहू लागली . रमाताईंनी तिला खोदून खोदून माहिती विचारली तरीही ती काही बोलेना . अबोल होऊन हताश बनून राहिली .....!!
रमाताईंनी घाबरून आम्हा दोघांच्या कानावर ही गोष्ट घातली . मी ह्यातून नक्की मार्ग काढेन असे आश्वासन देऊन रमाताईंची पाठवणी केली ठरल्याप्रमाणे ....बोलता बोलता मी व समिक्षा एका सांस्कृतिक गाण्याच्या कार्यक्रमाला जाणार असे सांगून तिला घेऊन गेले . संपूर्ण कार्यक्रमात तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून मी कळून चुकले की ही कुठल्यातरी पेचप्रसंगात सापडली ... कार्यक्रम पार पडल्यावर मस्तपैकी हॉटेलमध्ये नेऊन तिला बोलते केले .....!!
त्यातून तिच्याबद्दल कॉलेजमध्ये होत असलेले गॉसिप न चर्चा याला ती जाम वैतागली होती .....!!
कोमल मनाची समिक्षा पार कोमेजून गेली होती .
तिला मी ह्यातून बाहेर काढण्याचा निर्धार केला सलग एक आठवडा तिला अनेक प्रकारे समजावून सांगितले .
समिक्षा ....हे बघ तुझ्यापुढे तुझे ध्येय , करियर चे विश्व आहे ...
तू स्वतःप्रति प्रामाणिक आहेस . सगळ्यांशी मिळून मिसळून वागतेस वेळेला मदत करतेस !! कोणात दुजाभाव करत नाहीस , वादविवाद या पासून चार हात लांब राहतेस !! ....मग तू कोणत्याही गोष्टीला घाबरायचे कारण नाही ...
आणि विशेष म्हणजे तुझे मनोधैर्य खच्चीकरण करण्यासाठी हे डावपेच असतात !! ....यातून तू सावरलीस तरच तुझे भले होईल !! ....जर लोकांना घाबरून तू घरात स्वतःला कोंडून घेतलंस तर तुझे आयुष्य उध्वस्त होईल !!
या ज्या काही कॉलेजमधील बड्या लोकांच्या मुली आहेत त्या तुला डिवचायला पाहतात . त्याचे कारण तू त्यांच्याकडे लक्ष देतेस म्हणूनच !!
अगं ! एखादे परके कुत्रे भुंकते आहे म्हणून आपण घेतो का त्याची दखल ? तसेच हे आहे !! तुला मिळणारी वाहवा , शाबासकी ही ह्यांची खरी पोटशूळ आहे !! तर ......
सावर स्वतःला !! तुझ्या आई - बाबांचे कष्ट विचारात घे !! लहान सुजय ने तुझा आदर्श घ्यावा असे तुझे वर्तन हवे नुसताच वेष झकपक असून चालत नाही तर त्याला मन ही निर्मळ असले पाहिजे हे लक्षात घे !!
आणि शेवटी मी इतकंच सांगेन समिक्षा तुझ्या सुखाची गुरुकिल्ली तू स्वतःहून का त्यांच्या हाती सोपवत आहेस ?
.....त्या नंतर समिक्षा यातून बरीच सावरली आज ती नामांकित डॉक्टरांच्या पंक्तीत जाऊन बसली . नंतर या कुटुंबीयांनी दुसरीकडे फ्लॅट घेतला , घर बदलले पण माझ्याप्रति असलेला तिचा आदर ....!!
फोनवर प्रत्यक्ष अधूनमधून भेटीगाठी होतातच !! एका मुलाखतीत तर तिने तिच्या यशाचे गमक म्हणजे माझी मावशी .....
की जिने मला सुखाचा मूलमंत्र दिला . वेळीच मला डिप्रेशन मधून सावरायला मदत केली !!
स्वतःच्या सुखाच्या चाव्या स्वतःच्याच हाती ठेवण्यास भाग पाडले ....
म्हणूनच आज मी ती सुखाची गुरुकिल्ली जोपासत , समाजसेवेचे व्रत घेतलंय !! तिच्या या वाक्यावर अनेकांचे रिप्लाय पेपरमध्ये वाचून मी अलवार माझ्या डोळ्यातील अश्रू टिपले ..
तो प्रसंग अजूनही डोळ्यासमोर येतो ......!!
म्हणतात ना !! आठवणी या मोरपिसासारख्या असतात !! ह्रदयाच्या गाभाऱ्यातील आवाज त्यांना साद घालतो !! म्हणूनच त्या आपण प्राणापालिकडे जपतो !!
🌹🤝🌹🤝🌹🤝
©️सौ राजश्री भावार्थी
पुणे
( रिपोस्ट )
Very nice and motivated story👌👌👌
ReplyDeleteThanks for your valuable comment
ReplyDelete