जाणून घेऊयात मानसिक आरोग्य दिनाविषयी...
आजच्या काळात मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या जसे की नैराश्य, चिंता आणि तणाव इत्यादींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अनेक लोक मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त आहेत. मानसिक आरोग्य ही गंभीर समस्या म्हणून पाहिली जाते. याबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 10 ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा केला जातो.
जागतिक मानसिक आरोग्य दिनाचा इतिहास-
संयुक्त राष्ट्र संघाने 1992 मध्ये पहिल्यांदा जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा केला. या वर्षीपासूनच हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर, 1994 मध्ये, संयुक्त राष्ट्रांचे तत्कालीन महासचिव, यूजीन ब्रँड यांनी तो साजरा करण्याचा सल्ला दिला. तेव्हापासून हा दिवस इतर देशांमध्येही साजरा केला जातो.
महत्त्व-
मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यामागचा उद्देश हा आहे की लोकांना या विषयाची जवळून माहिती व्हावी. अनेक लोक नैराश्य आणि तणाव ही एक छोटी समस्या मानून दुर्लक्ष करतात, ज्यामुळे गंभीर आरोग्य समस्या देखील उद्भवू शकतात. ही एक अतिशय गंभीर समस्या आहे, ज्यामुळे दरवर्षी शेकडो लोकांना आत्महत्या करण्यास भाग पाडले जाते. या दिवशी ठिकठिकाणी शिबिरे घेण्याबरोबरच लोकांना त्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहावे यासाठी चर्चासत्रही दिले जातात आणि ते टाळण्याचे उपायही सांगितले जातात.
थीम-
दरवर्षी जागतिक मानसिक आरोग्याची थीम वेगळी असते. या वर्षी (2023) या दिवसाची थीम वर्ल्ड फाउंडेशन ऑफ मेंटल हेल्थने मानसिक आरोग्य हा सार्वत्रिक मानवी हक्क ही ठेवली आहे.
उपचार-
बहुतेक लोक कोणत्या ना कोणत्या कारणाने मानसिक आरोग्याच्या समस्यांनी ग्रस्त असतात. काही लोक या विषयावर उघडपणे बोलण्यासही लाजतात, परंतु असे केल्याने त्यांच्या शारीरिक आरोग्यावर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो. कोणत्याही प्रकारच्या मानसिक विकाराच्या बाबतीत, त्याला हलके घेऊ नका आणि ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या जेणेकरुन वेळीच समस्याचे निराकरण करता येईल.
संदर्भ: वेबदुनिया
No comments:
Post a Comment