Welcome to the Blog of Department of Psychology at Kanya Mahavidyalaya, Miraj

Saturday, 29 May 2021

चुकीची छाप

      रोजच्या दैनंदिन जीवनात आपला संपर्क अनेक व्यक्तींशी येतो. त्यापैकी आपण काही व्यक्तींना बरोबर ओळखतो. काही व्यक्ती ओळखण्यात आपण चूक करतो. एखादी व्यक्ती चुकीची वाटल्यास आपण त्या व्यक्तीबद्दल अनेक मते तयार  करतो. एखादी व्यक्ती आपल्याला मैत्रीस योग्य वाटते तर एखादी व्यक्ती अयोग्य वाटते. एखाद्या व्यक्तीबद्दल पूर्ण माहिती नसल्यामुळे त्याबाबत चुकीचे मत तयार करणे याला चुकीची छाप म्हणजेच Mistaken Impressions असे म्हणतात. आपण अपुऱ्या माहितीवरून एखाद्या व्यक्तीला आकार देत असतो. जेव्हा चटकन एखाद्याचे मूल्यमापन करतो तेंव्हा आपण आपल्या मानसिक पातळीवरती जवळचा मार्ग शोधतो. त्यामुळे चुकीचा निर्णय घेतला जातो. चुकीची छाप पडण्यामागे काही कारणे आहेत. त्यामध्ये साचेबंदपणा, सकारात्मक व नकारात्मक पूर्वग्रह आणि आरोपण इत्यादी घटकांचा परिणाम होतो. 


१. साचेबंदपणा : आपण बरेचदा एका समस्येतून सर्वच व्यक्तींबद्दलचे मूल्यमापन करत असतो. त्यामुळे चुकीची छाप पडत असते. उदा. सगळे शिक्षक सारखेच असतात. पोलीस, वकील, शासकीय क्षेत्रात नोकरी करणाऱ्या व्यक्तींबद्दल साचेबंदपणातून पाहिले जाते. त्यामुळे चुकीची छाप निर्माण होते. चित्रपट, विविध टिव्ही मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका करणाऱ्या पात्रांचे सादरीकरण ठराविक साच्यातून केले जाते. उदा. पुरुष अधिक स्वावलंबी आणि सर्जनशील असतात. स्त्रीया अधिक स्वावलंबी व सर्जनशील नसतात. जाहिरातीमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांनाच अधिक प्रमाणात दाखविले जाते. काही संशोधनानुसार, साचेबंदपणा हा नैसर्गिक व आपोआप येत असून साचेबंदपणाविषयी सार्वजनिक जीवनात आक्रमक प्रतिक्रिया दिसते. दुर्देवाने साचेबंदपणा नकारात्मक असेल तर त्याचा नातेसंबंधांवर प्रतिकूल परिणाम होतो. 


२. सकारात्मक आणि नकारात्मक पूर्वग्रह : लोकांना काही गुणविशेषणाच्या आधारे चांगले व वाईट असे लेबल लावण्याची वृत्ती आपल्याकडे असते. असे लेबल लावताना आपण व्यक्तींमधील आपण एखादाच चांगला गुण विचारात घेतो व संबंधित व्यक्ती चांगली आहे असे समजतो. काही गुणविशेष नकारात्मक असणाऱ्या व्यक्तीचे संवेदन नकारात्मक होते. उबदार, हुशार, उदयोगशीलता या गुणांच्या आधारे सकारात्मकता ठरवली जाते.  तर माघार घेणाऱ्या, शांत व अबोल व्यक्ती असतील तर त्यांची छाप नकारात्मक पडते. खरेतर व्यक्ती चांगल्या व वाईट गुणांचे एक मिश्रण असते. प्रत्येकाचा इतरांकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगवेगळा असतो व त्यातून छाप निर्माण होते. 


३. आरोपण : आपण लोकांच्या बाह्य किंवा सभोवतालच्या परिस्थितीचा वर्तनावर होणारा परिणाम विचारात न घेता त्याच्या बाबतीत गैरसमज करून घेतो; त्या संदर्भातील त्रुटी म्हणजे आरोपण होय. आपण वर्तनाचे मूल्यमापन करताना काही मानदंड वापरतो आणि इतरांच्या वर्तनाचे मापन करतो. लोक नेहमी एकाच भूमिकेतून वावरत असतात, असे आपण गृहीत धरतो. उदा. एखाद्याच्या हातून कॉफीचा कप पडला तर त्या संबंधित दोन प्रकारे आरोपण केले जाते. पहिले म्हणजे, ती व्यक्ती अडाणी आहे; तर दुसरे म्हणजे, कॉफी गरम असल्याने कप पडला असेल. खरे सत्य हे आहे की, लोक क्षणिक परिस्थितीशी बांधील असतात. आरोपणाचा सहसंबंध व्यक्तिमत्वाशी जोडला जातो. सभोवतालच्या परिस्थितीचा विचार केला जात नाही असे सामाजिकदृष्ट्या घडत असते. यास मूलभूत आरोपणाची त्रुटी असे म्हणतात. 


शेवटी काय तर एखाद्या व्यक्तीबद्दल आपण किती जाणून घेतो. त्याच्याशी आपल्या आंतरक्रिया कशा होतात यावर अचूक छाप अवलंबून असते. एखाद्या व्यक्तीला सारासार समजून न घेता काढलेला निष्कर्ष हा चुकीचा ठरु शकतो.  त्यामुळे संभाषणाची शैली, सामाजिक मानदंड, शाब्दिक संकेत, अशाब्दीक संकेत, भावनाविष्कार याचे अचूक मूल्यमापन करण्याचे कौशल्य विकसित करणे आवश्यक आहे. 



 (संदर्भ: उपयोजित मानसशास्त्र : नाईक, शिरगावे, घस्ते, बिराजे) 



Thursday, 27 May 2021

यशप्राप्तीचे मूलमंत्र

 

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी २६ परफेक्ट गुरूमंत्र..


1. *Empower smiling*.

चेहऱ्यावर हास्य असू द्या


2. *Relax yourself*.

आरामशीर / तणावमुक्त रहा


3. *Have a clear understanding*.

आपले विचारात सुस्पष्टता असू द्या


4. *Avoid misconceived thoughts*.

गैरसमज / चुकीचे समज टाळा


5 *Prompt decision - making*.

तात्काळ निर्णयक्षमता


6. *Avoid inferiority complex*.

न्यूनगंड बाळगू नका


7. *Believe yourself*.

स्वतःवर विश्वास ठेवा


8. *Be inspirational*.

प्रेरणादायी रहा


9. *Develop challenging attitude*.

आव्हानात्मक दृष्टिकोन विकसित करा


10. *Be a positive thinker*.

सकारात्मक विचार ठेवा


11. *Have self – encouragement*.

स्वयंप्रेरित रहा


12. *Avoid procrastination*.

चालढकल (दिरंगाई) टाळा


13. *Learn lessons from others*.

इतरांकडून प्रेरणा घ्या


14. *Dont lose your spirit*.

हिंमत / धीर सोडू नका


15. *Think about time-use*.

वेळेचे काटेकोर नियोजन करा


16. *Be smart at all costs*.

नेहमी चाणाक्ष रहा


17. *Be a goal setter*.

ध्येय निश्चित करा


18. *Be punctual*.

तत्पर रहा


19. *Focus Involvement*.

कामावर लक्ष केंद्रित करा


20. *Possess mental alertness*.

मानसिकरित्या तत्पर रहा


21. *Sharpen your intelligence*.

आपली बुद्धीमत्ता अधिक तीक्ष्ण करा


22. *Try to be intellectual*.

बुद्धीमान बनण्याचा प्रयत्न करा


23. *Be co-operative*.

सहकार्याची भावना बाळगा


24. *Avoid fearful feelings*.

मनातील भीतीची भावना टाळा


25. *Strengthen your will power*.

आपली इच्छाशक्ती प्रबळ असू द्या


26. *Never bother about failure*.

कधीही अपयशाच्या तणावाखाली राहू नका


(कॉपी पेस्ट)

Tuesday, 18 May 2021

चला निराशा पळवून लावू

 *मानसिक आजार पळवुन लावणार्‍या चौदा कृती!…*

*कसल्याही प्रकारच्या निराशेला नाहीशी करणारी चौदा सुत्रे*

1) सतत पॉझीटीव्ह -

कितीही वाईट घडो, नेहमी पॉझीटीव्हच रहायचं!

उदा. “एक डोळा गमावला पण दुसरा डोळा शाबुत आहे,” ज्यामुळे मी हे सुंदर जग पाहु शकतो, देवाची किती कृपा आहे.

प्रत्येक अपयश मला एक संधी देऊन जात आहे.

उदा. जेव्हा लोक आपल्याला टाळतात, आपल्याकडे बघुन नाकं मुरडतात, तेव्हा तर अधिकधिक आकर्षक दिसण्याबद्द्ल, आपण जागरुक होतो.

आपली मस्करी उडवली की, आपला कोणी कळत नकळत अपमान केला की, आपल्यातल्या महत्वकांक्षा जागृत होतात.

2) पॅशन निर्माण करा - आयुष्यात पोकळी आणि निराशा आली की एक असं पॅशन शोधावं, ज्यासाठी संपुर्ण आयुष्यच पणाला लावावं.

पॅशन म्हणजे अशी एखादी गोष्ट जी गोष्ट न थकता, अगदी उत्साहाने, महिन्याचे तीस दिवस, दिवसातल्या दहा-बारा तासाच्या वर आपण ते करु शकतो, ह्याला म्हणतात पॅशन!

त्या गोष्टीसाठी अक्षरशः आयुष्य झोकुन द्यावं. अगदी स्वतःला विसरायला लावतं, तेच खरं पॅशन!

कोणासाठी व्यापार हे पॅशन असेल, कोणासाठी खेळ हे पॅशन असेल, कोणासाठी भटकंती हेच पॅशन असेल.

त्याच्याशिवाय आपण जगु शकत नाही, आणि मग एके दिवशी जगही आपल्याला त्या एकाच गोष्टीसाठी ओळखु लागतं.

सचिन-क्रिकेट, धीरुभाई-रिलायन्स, अमिताभ-एक्टींग, लता मंगेशकर-गायन, मोदी-नेतृत्व, पटनायक-वाळुची शिल्पे, प्रकाश आमटे-आनंदवन, श्रीश्री रविशंकर गुरुजी – आर्ट ऑफ लिविंग, स्टीव्ह जॉब्ज-गॅझेट्स,

ह्या यादीत आपलंही नाव येऊ शकतं, आपणही आपल्या पॅशनसाठी वेडं बनलो तर!….

३) महिन्याला दोन पुस्तके - माझ्या आयुष्यातल्या अत्यंत वाईट आणि पडत्या काळामध्ये मला फक्त आणि फक्त चांगल्या विचारांच्या पुस्तकांनीच तारलं, नाहीतर कदाचित मी आज हा लेख लिहायला शिल्लकच राहीलो नसतो, इतके पुस्तकांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत.

महिन्याला कमीत कमी दोन तरी चांगली पुस्तके तरी वाचुनच काढेन आणि त्यातल्या चांगल्या गोष्टी तात्काळ जीवनात आणेन, हा चंगच बांधावा, आपोआप जे जे हवे ते सारे मिळत जाते, हा माझा स्व-अनुभव आहे.

4) डायरी लिहा - दररोज घडलेल्या बर्‍या वाईट घटना आपल्याला बहुमुल्य अनुभव देऊन जातात, त्यांना शब्दबद्ध करत गेलं की जगण्याची रंगत वाढत जाते.

माझ्या मनात चाललेले द्वंद बाहेर काढण्यासाठी मला ह्या डायर्‍यांनी खुप मदत केली. झालेले अपमान, आलेले अपयश, भविष्याच्या चिंता, मनाचं रिकामपण, सगळी मळमळ मी बाहेर काढली, आणि प्रत्येक जखम डायर्‍यांमध्ये जपुन ठेवली, आणि शहाण्या बाळांसारखं त्या सर्वांनीही मला त्रास देणं बंदच करुन टाकलं.

आजही माझ्या कॉम्पूटर मध्ये मी स्वतःलाच लिहलेली शेकडो पत्रं आहेत, जी वाचुन मला आता खुप गंमत वाटते. कधी छोट्यामोठ्या कारणाने मी खचलो की ते वाचुन प्रचंड बळ मिळतं. बॅटरी पुन्हा टणाटण चार्ज होते.

5) जे सुरु केलंय त्याचा शेवट करा - हातात घेतलेलं काम पुर्ण करायचं म्हणजे करायचं!

मनावर विजय मिळवण्यासाठी मनाचाच वापर करायचा, काम सुरु होतानाच असं भासवायचं की ते पुर्ण झालेलं आहे, आणि मन गोंधळुन जातं आणि ते पुर्ण करुनच एका जागेवर शांत बसतं!

‘आसान है’ हा यशाचा मुलमंत्र नेहमी लक्षात ठेवायचा!

6) कंफर्ट झोन तोडा. नवी आव्हाने स्वीकारा - तु मागच्या एक महिन्यामध्ये अशी कोणतीही एक गोष्ट केलीस का, जे तुला येत नाही, जे करण्याची तुला भिती वाटते?

7) कमीत कमी तीस मिनीट व्यायाम - मनाला ताजंतवाणं ठेवण्याचा हुकुमी एक्का आहे, शरीराला व्यायाम करायला भाग पाडायचं, मन आपोआप ताळ्यावर येतं!

जगातल्या प्रत्येक यशस्वी व्यक्तीला हे सुत्र माहित आहे.

8) ध्यान, सर्व समस्यांवर रामबाण उपाय - तुझं शारीरीक व्यंग हे तुझ्या आयुष्यात कधीही अडथळा बनु शकत नाही, कारण तु म्हणजे तुझं शरीर नाहीस!

खरा तु तर वेगळाच कोणीतरी आहेस, हे तुला ध्यान करायला लागलं की आपोआप उमगत जाईल.

आतापर्यंत केला नसशील तर एकदा आर्ट ऑफ लिविंगचा हॅपिनेस कोर्स नक्की कर.

9) महिन्याला एक वाईट सवय सोडा - आपल्या प्रत्येकामध्ये वाईट सवयी असतात, मी एका महिन्याला एक वाईट सवय सोडायची आहे, आणि एक चांगली सवय जोडायची आहे, असं प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला अंतर्मनाला सांगतो. महिनाभर त्याची कसोशीने अंमलबजावणी करतो.

10) आपल्या आजुबाजुला प्रसन्नतेचा शिडकावा करा - घरातुन बाहेर पडण्याआधी एकदा आरशात बघुन स्वतःलाच वचन देतो की आज माझ्या संपर्कात येणार्‍या प्रत्येक व्यक्तीला मी आनंद आणि प्रसन्नता वाटणार आहे. प्रत्येकाच्या चेहर्‍यावर हसु फुलवणार आहे.

कधी एखाद्या उपाशी माणसाला पोटभर खावु घालावं, कधी एखाद्या लहान मुलाशी लहान बनुन खेळावं!

कधी रस्त्याने जाताना कोणाला लिफ्ट द्यावी, कधी जोक्स सांगुन लोकांना खळखळुन हसवावे.

11) जे मिळालयं त्याबद्द्ल कृतज्ञ रहा.

जो कृतज्ञ आहे, त्यालाच ब्रम्हांड अजुन जास्त भरभरुन देतं, हेच सिक्रेट आहे.

आपल्याला मिळालेल्या दहा वरदानांबद्द्ल रोज मनःपुर्वक आभार व्यक्त केल्यास आयुष्यातली सगळी दुःखे आपोआप नाहीशी होतात, याचा मी स्वतः अनुभव घेतला आहे.

12) यशस्वी लोकांसोबत मैत्री करा - असे लोक ज्यांनी स्वतःचा ठसा ह्या जगात उमटवला आहे, त्यांच्याशी अधिकाधिक ओळखी कराव्यात, त्यांच्याशी भेटण्याच्या संधी शोधाव्यात.

यश ही उत्साहासारखं संसर्गजन्य असतं!

13) सुरक्षित अंतर ठेवा - जे लोक आपलं मानसिक खच्चीकरण करतात, आपली टर उडवतात, अशा लोकांपासुन चार हात दुर रहावे. निगेटीव्ह लोकांना आपल्या आयुष्यात आणि आपल्या मनात कुठेही स्थान देऊ नये.

14) तीस दिवसांचा प्लान - पुढच्या तीस दिवसात मी काय करणार आहे, ह्याचा प्लान महिन्याच्या सुरुवातीला तयार करुन भिंतीला चिटकवुन टाकावा.

एकेक लक्ष्य साध्य केलं की ‘विजयी’ असं लिहुन त्याचं अगदी उत्साहाने आणि आनंदाने ‘सेलिब्रेशन’ करावं....!!!!


*सुनील इनामदार*

Sunday, 2 May 2021

मानसशास्त्रज्ञांकडून काही सूचना

 

१. विषाणूच्या (व्हायरस) बातम्यांपासून स्वतःला दूर ठेवा. (याबद्दल आपल्याला जे जे माहिती असायला हवं ते एव्हाना माहिती झालेलं आहे).


२. कितीजण दगावले ते पाहत बसू नका. ही एखादी क्रिकेट मॅच नाही की ज्याचा लेटेस्ट स्कोर काय झाला ते तुम्हाला माहिती असायलाच हवं, त्यामुळे याकडे लक्ष देणे पूर्णपणे टाळा.


३. इंटरनेटवर अधिक माहिती शोधू नका, याने तुमचे मानसिक खच्चीकरण होऊ शकते. 


४. गंभीर मेसेजेस इतरांना पाठवणे त्वरित थांबवा. तुम्ही जितके मनाने खंबीर असाल तितकीच खंबीर समोरची व्यक्ती असेलच असे नाही (याने मदत तर होणार नाहीच उलट तुम्ही समोरच्याला डिप्रेशनमध्ये टाकू शकता).


५. शक्य झाल्यास घरात शांत मंद आवाजात आवडते संगीत ऐका. लहानग्यांशी खेळ खेळा, त्यांना छान छान गोष्टी सांगा भविष्यात काय काय करणार याविषयी चर्चा करा. 


६. आयुर्वेदिक काढा, अमृतप्राश, गरम सूप, हळदीचे दूध, ताजे जेवण यांचा समावेश असुद्यात.


७. स्वतःच्या मनाने औषधे घेणे टाळा. आयुर्वेदिक औषधांचा सुपरिणाम सर्वज्ञात आहे, त्यामुळे आपल्या ओळखीच्या आयुर्वेदिक तज्ञांचा सल्ला जरूर घ्या. (घरगुती आयुर्वेदिक उपचार किंवा ऐकीव औषधे टाळा.)


८. तुमचा सकारात्मक मूड तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीला वाढवतो, परंतु तोच मूड नकारात्मक असेल तर तीच रोगप्रतिकारक शक्ती मंदावते आणि विषाणूशी लढा देण्यास कमकुवत ठरते.


९. सर्वात महत्वाचे, हे सगळं एक ना एक दिवस टळणार आहे आणि आपण सर्वजण सुरक्षित होणार आहोत हे ध्यानात ठेवा.... !


१०. तुमचे भविष्यातील आखाडे काय असतील त्यावर लक्ष केंद्रित करा , हीच ती योग्य वेळ आहे जीचा सदुपयोग तुम्हाला तुमची वैयक्तिक आणि व्यावसायिक उद्दिष्टे काय आहेत त्यावर विचार करण्याची..


११. विनोदी चित्रपट, साहित्य पहा कारण विनोदाने बराच ताणतणाव कमी होतो आणि ते एक उत्तम औषध आहे. 


१२. आपल्या परिचीत कोणी अत्यवस्थ असेल, रेमेडिसिव्हीर/ व्हेंटिलेटर/ बेड ची व्यवस्था होत नसेल तरी धीर सोडू नका, सोबत आयुर्वेदिक औषधे चालू करा, अनेक गंभीर अवस्थेतील रुग्ण या औषधाने आजारातून यशस्वीपणे बाहेर आले आहेत.


 

*सकारात्मक रहा.*


(कॉपी पेस्ट) 

आयुष्य संपवण्याचे विचार मनात कसे येतात आणि ते कसे रोखावेत?

        आत्महत्या हा अनेक दशके आपल्या समाजात दुर्लक्षलेला विषय राहिला आहे. सुशांत सिंग राजपूत, जिया खान, भय्यूजी महाराज अशा व्यक्तींच्या आत्...