Welcome to the Blog of Department of Psychology at Kanya Mahavidyalaya, Miraj

Wednesday, 28 April 2021

Ten Careers in Psychology

 To become a psychologist, professionals must earn a minimum of a master’s degree in psychology. However, a bachelor of arts in psychology also prepares graduates for other careers outside the field due to its developmental course offerings: For example, K-12 teachers must also complete similar classes. Other careers that require psychology coursework include human resources managers, registered nurses, or healthcare services managers.

Students should also understand the difference between a bachelor of science (BS) and a bachelor of arts (BA) in psychology to determine which best suits their career goals. A BS in psychology focuses on mathematics and science courses. Students who plan to earn advanced degrees with an affinity for extensive research methodology should consider a BS in psychology.

A BA in psychology emphasizes liberal arts courses. BA programs offer more options that reflect a student’s specific career goals. Therefore, many BA in psychology graduates may use their degree for careers outside of psychology.

Journalist

Journalists conduct research to compose news articles for various media outlets. Research includes following leads, interviewing people about difficult content, and asking questions that allow the journalist to collect pertinent information. Therefore, earning a bachelor of arts in psychology can provide aspiring journalists with a competitive advantage, as psychology coursework explores the way people behave and think.

The average BA in psychology degree includes perception and cognition, social psychology, evaluating psychological research, and perspectives on psychological issues. While entry-level positions require a bachelor’s degree at a minimum, students may want to consider earning an advanced degree to stand out among other applicants.

Criminologist

Criminologists serve as analysts or scientists who identify the causes of criminal behavior through data collection and statistical analysis. Criminologists may interview officers or incarcerated felons to develop psychological profiles. Therefore, professionals often work in law enforcement or government settings.

Earning a bachelor of arts in psychology can benefit future criminologists by allowing students can tailor the degree to fit their career goals. Furthermore, a bachelor’s degree in psychology contains courses that provide knowledge and skills criminologists need to excel in their job. Entry-level positions typically require a bachelor’s degree from an accredited university. Leadership or management roles may require an advanced degree.

Human Resources Manager

Human resources managers stay up to date on all local, state, and federal laws that impact benefits and organizational activities. These managers oversee compliance, productivity, and effectiveness. Human resources management also requires professionals to identify ways to improve policies and implement change. This role relies heavily on effective communication.

Earning a bachelor of arts in psychology explores human behavior or social psychology, which assists human resources managers in achieving tasks that require interacting with incumbents and executives. While some organizations accept candidates with a bachelor’s degree, many organizations prefer applicants with an advanced degree.

Political Scientist

Political scientists conduct research on topics relating to the political system both nationally and internationally. This role also requires professionals to gather and assess data from surveys, evaluate policies, remain up-to-date on events, and forecast trends.

Political scientist roles typically require a master’s degree or Ph.D. For instance, popular master’s programs include a master of public administration or public affairs. A BA in psychology provides students with foundational knowledge and skills, such as cognitive and social explanations regarding human behavior, the development of belief systems, and the decision-making process.

Social Worker

Social workers develop solutions for clients struggling with everyday issues. Responsibilities include identifying people in need, creating pathways for clients to adjust to life changes, researching resources or solutions to modern dilemmas, improving clients’ quality of life, monitoring progress, and offering psychotherapy assistance.

Earning a bachelor of arts in psychology addresses many of the topics social workers need to do their job. While entry-level positions exist, leadership roles require a master’s degree or Ph.D. Therefore, students should plan to continue their education. Additionally, social workers also need to obtain a state license or certification for nonclinical work.

Substance Abuse, Behavioral Disorder, and Mental Health Counselor

Substance abuse, behavioral disorders, and mental health counselors assist patients struggling with one or more disorders. Duties include assessing a patient’s condition and readiness to begin treatment, educating the client’s families, uncovering factors that prohibit recovery, developing treatment plans, and collaborating with other care team members.

Entry-level positions require a bachelor’s degree from an accredited institution. However, many organizations also require applicants to hold a master’s degree, as many states require licensing and up to 4,000 clinical hours for upper-level duties. A bachelor of arts in psychology offers fundamental knowledge and skills that helps students launch their career.

Marketing Manager

Marketing managers collaborate with staff and other department leaders to identify budgets and marketing or advertising campaign plans. Duties include contract negotiation, campaign evaluation, market research, identifying target clients, developing pricing strategies, and hiring staff. Important qualities include analytical, communication, interpersonal, and decision-making skills.

Employers typically look for candidates with a bachelor’s degree from an accredited institution in a relevant field. By earning a bachelor of arts in psychology, students learn about human behavior and social aspects of psychology that could improve their effectiveness in daily tasks. However, students may continue their education to provide a competitive advantage.

Psychologist

Psychologists work with target populations in multiple settings. Psychologists examine cognitive, social, and emotional processes from a client’s experience. Duties include conducting research or studies on human behavior, conducting interviews and surveys, identifying disorders, researching patterns, developing tests that assist in predicting behavior, educating patients and their families, and creating research papers or articles that other professionals can learn from.

For clinical, counseling, or research roles, employers look for applicants with a Ph.D. or Psy.D. Most states also require practitioners to obtain a state license. Therefore, earning a BA in psychology is the first step toward qualifying for this role.

Marriage and Family Therapist

Marriage and family therapists receive mental health training to address difficult clinical issues, including depression, anxiety, marital problems, and family dilemmas. Duties consist of creating safe environments for clients to discuss sensitive information, making action plans to adjust to change, providing guidance in decision making, developing strategies to cope with difficult circumstances, and maintaining client files.

To qualify for this role, candidates should start by earning a bachelor’s degree in psychology, which explores fundamental information needed to proceed to a master’s in psychology, as this role requires a state license and a set number of clinical hours.

School Counselor

School counselors work with students to address academic and social gaps. Daily duties include evaluating student abilities and interests, uncovering issues that prohibit academic and social success, creating action plans to correct issues, collaborating with teachers and students’ families, maintaining records, and reporting instances of neglect or abuse.

School counselors can work in K-12 settings or adult settings as career counselors. Employers look for candidates with a master’s degree as nearly all states require a license to practice. However, earning a bachelor of arts in psychology remains the first step in working toward this career. At the bachelor’s level, candidates may qualify for relevant support roles.

Selecting the best BA in psychology program requires extra consideration, as this field offers multiple professional opportunities. Prospective students should identify specific goals to develop a career pathway. Additionally, tuition varies and many universities offer in-person, hybrid, or online format options.


(Ref: https://www.psychology.org/resources/jobs-with-a-bachelor-of-arts-in-psychology/) 

Monday, 19 April 2021

शरीर - मन संबंध

        मानवी वर्तनाचे, स्वभावाचे दोन मुख्य पैलू म्हणजे त्या व्यक्तीचे शारीरिक वर्तन व दुसरे  मानसिक वर्तन. या दोन्ही प्रकारच्या वर्तनावर मुख्यतः मेंदूचे व एकूण मज्जासंस्थेचे नियंत्रण असते. भोवतालच्या परिस्थितीचे वेदन व त्याच्या अनुषंगाने घडणारी प्रतिक्रिया ही मेंदूकडून ठरवली जाते. तेंव्हा त्यापूर्वी वेदनांचा जो अर्थ लावला जातो, त्यावर बौद्धिक व मानसिक घटकांचा प्रभाव असतो. आपले सर्व वर्तन हे शरीर व मन यांच्या एकात्म परिणामाने घडते. शरीर व मन यांच्यातील संबंध द्विमार्गी आहे. शरीराचे कार्य व स्वास्थ्य हे व्यक्तीच्या मानसिक वृत्तीने प्रभावित होते. ज्या व्यक्ती हसतमुख, उत्साही, आशावादी असतात, त्यांची शारीरिक स्थिती चांगली राहते. या व्यक्ती सारख्या आजाराच्या तक्रारी करीत नाहीत. तसेच व्यक्तीच्या बोधात्मक कार्यावर, विचार प्रक्रियांवर शारीरिक स्वास्थ्याचा परिणाम होतो. व्यक्तीला शारीरिक आजार झाला असला, की तिच्या विचारांवर परिणाम होतो. व्यक्ती चिडचिडी होते किंवा उदास होते. तेंव्हा शरीर व मन हे परस्परपूरक व परस्परावलंबी आहेत. 

        प्राचीन काळी शरीर स्वास्थ्यावर अधिक भर दिला जात होता. त्या काळची समजूत म्हणजे स्वस्थ मूल हे सुखी मूल असते. (Healthy child is a happy child). सुदृढ  शरीरयष्टीची व्यक्ती जास्त क्रियाशील असते, समाधानी असते. शरीर सुदृढ असेल तर मनही सुदृढ राहते. तसेच शरीरस्वास्थ्य बिघडले तर मानसिक बैचेनही वाढते. फार वर्षांपूर्वी ग्रीक वैद्यकतज्ञ हिप्पोक्रेटस यांनी असे सांगितले आहे की, शरीरातील जैवरसांच्या कमी-अधिक प्रमाणामुळे मानसिक आजार होतात. हल्लीच्या शास्त्रीय संशोधनातून हे आपणास माहिती झाले आहे, की शरीराचा जैव-रासायनिक समतोल ग्रंथींच्या कार्यावर अवलंबून असतो. ग्रंथींच्या कार्यावर स्वायत्त चेतासंस्थेचे नियंत्रण असते. या स्वायत्त चेतासंस्थेचे उद्दीपन मेंदूतील एक अवयव हायपोथँ हायपोथॅलामसमुळे होते. भावनिक अनुभवात मेंदूमुळे स्वायत्त चेतासंस्था कार्यान्वित होते व शरीरांतर्गत विविध बदल घडून येतात. भावनिक अनुभव, मानसिक विचार हे मनाचे कार्य आहे. म्हणून हल्ली म्हटले जाते की, "सुखी मूल हे स्वस्थ मूल" असते. व्यक्तीला सामर्थ्यशाली जीवन जगायचे असेल तर त्याला शरीरस्वास्थ्य व मनस्वास्थ्य या दोन्हीचा समतोल राखता आला पाहिजे. 


(संदर्भ : मानसिक स्वास्थ्य)

Thursday, 15 April 2021

तर प्रत्येकाला कोरोना असेल !

       अमेरिकेत एका कैद्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली तेव्हा तेथील काही शास्त्रज्ञांना वाटले की या कैद्यावर एक प्रयोग करून पहावा. प्रयोगाचा भाग म्हणून त्या कैद्याला फाशी देण्याऐवजी विषारी कोब्रा सापाचा चावा देऊन मारणार असल्याचे सांगण्यात आले. फाशीच्या दिवशी, त्याच्या समोर एक मोठा विषारी साप आणला गेला. त्या कैद्याला खुर्चीवर बसवून त्याचे डोळे बांधण्यात आले. त्यानंतर त्याला सापाचा दंश झाल्याचे भासवण्यात आले परंतु प्रत्यक्षात मात्र त्याला सेफ्टी पीन टोचवण्यात आली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सापाचा दंश न होतादेखील 2 सेकंदातच त्या कैद्याचा मृत्यू झाला.  कैद्याच्या शरीराचे शवविच्छेदन करण्यात आले. त्या अहवालात कैद्याच्या शरीरात 'व्हेनम' सदृश्य विष सापडले. या विषामुळे त्या कैद्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. आता हे विष त्याच्या शरीरात कुठून आले, ज्यामुळे कैदी मरण पावला? याचे उत्तर असे की, हे विष त्या कैद्याच्या शरीरात मानसिक भीतीमुळे त्याच्याच शरीराने निर्माण केले होते. 

    याचा अर्थ असा आहे की, आपल्या शरीरात स्वतःच्या मानसिक स्थितीनुसार सकारात्मक किंवा नकारात्मक उर्जा निर्माण केली जाते. त्यानुसार आपल्या शरीरात विविध प्रकारच्या हार्मोन्सची निर्मिती होते. नकारात्मक उर्जेतून निर्माण झालेले रसस्त्राव विविध रोगांची निर्मिती करतात. सद्यस्थितीत मनुष्य चुकीच्या विचारांचा भस्मासूर निर्माण करून स्वत: चा नाश करीत आहे. 

      माझ्या मतानुसार, कोरोनाबाबत अवास्तव विचार करून त्याचा अवाजवी बाऊ करू नका. आज 5 वर्षांपासून ते 80 वर्षांपर्यंतचे जवळपास सर्वच लोक याबाबत नकारात्मक झालेले आहेत. अंतर्गत व बाह्य कारण घटक यास जबाबदार आहेत. प्रसार माध्यमातून परिस्थिती किती भयावह आहे, किती संख्या वाढली, किती लोकांचा मृत्यू झाला याची आकडेवारी ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवली जाते. त्यातून जनमानसामध्ये भीतीचे वातावरण तयार होते. हीच भीतीची मानसिकता नकारात्मक विचारांना जन्म देते व हे नकारात्मक विचार आजारांना जन्म देतात.  दाखविण्यात येणाऱ्या आकडेवारीवर जाऊ नका कारण पॉझिटीव्ह झालेल्या लोकांपैकी निम्म्यापेक्षा जास्त लोक अगदी व्यवस्थित आहेत. त्रासदायक स्थितीतून जाणारे अनेक लोक बरेही होत आहेत. आजारातून बरे होण्याचा रुग्णांचा रिकव्हरी रेट देखील जास्त आहे. 

       मृत्यू पावणारे फक्त कोरोनामुळेच नव्हे तर त्यांना इतर आजारही होते, ज्यांचा सामना ते  करू शकले नाहीत, हेही लक्षात घेतले पाहिजे. लक्षात ठेवा कोरोनामुळे घरी मरण पावणारे खूप कमी आहेत. बहुतांशी रुग्ण इस्पितळात मरण पावत आहेत. रुग्णालयाच्या वातावरणामुळे आणि मनाच्या भीतीमुळे निर्माण झालेली नकारात्मकता व  त्यातून शरीराची रोग प्रतिकारक यंत्रणा कमी होऊन मृत्यू ओढवण्याची संभाव्यता ही जास्त असते. कोरोना या आजाराची वास्तवता आपणास नाकारता तर येणार नाही परंतु याचा सामना करण्यासाठी नेहमी सकारात्मक रहा, सर्व काही चांगले होणार आहे यावर विश्वास ठेवा आणि आनंदाने जगा. जर आपण नकारात्मकेच्या गर्तेतच अडकून राहिलो तर येणाऱ्या काळात प्रत्येकाला कोरोना असेल..! हे लक्षात ठेवा. 

 *मानसतज्ञांचा सल्ला*

१. कोरोनाशी संबंधित अधिक बातम्या पाहू किंवा ऐकू नका, आपल्याला आवश्यक असलेली सर्व माहिती आपणास आधीच माहित आहे.


२. कोठूनही अधिक माहिती संकलित करण्याचा प्रयत्न करू नका कारण त्यामुळे मानसिक स्थिती अधिक कमकुवत बनते.


३. इतरांना कोरोना व्हायरसबद्दल चुकीचा सल्ला देऊ नका कारण सर्व लोकांची मानसिक क्षमता समान नसते, काही लोक नैराश्याने ग्रस्त होऊ शकतात.


४. जास्तीत जास्त संगीत ऐका, ध्यान-धारणा करा, व्यायाम करा, पुरेसा आहार घ्या,  अध्यात्म, भजन इ. ऐका, मुलांसमवेत घरात इनडोअर गेम खेळा, कुटूंबासमवेत बसा आणि आगामी वर्षांतील कार्यक्रमांचे नियोजन  करा.


५. नियमित अंतराने आपले हात चांगले धुवा, सॅनिटायझरचा वापर करा, सर्व वस्तूंची साफ सफाई केली करा, येणाऱ्या बाहेरील व्यक्तीला १ मीटर अंतर ठेवूनच भेटा. त्रास जाणवल्यास तज्ञांचा सल्ला घ्या. 


६. तुमची नकारात्मक विचारसरणी नैराश्यात वाढ करेल आणि विषाणूशी लढण्याची क्षमता कमी करेल.  सकारात्मक विचारसरणी तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या बळकट करेल आणि कोणत्याही परिस्थितीत किंवा आजाराशी लढण्यास सक्षम ठेवेल.


७. अत्यंत महत्वाचे म्हणजे, हा वाईट काळ लवकरच संपणार आहे आणि आपण नेहमीच निरोगी आणि सुरक्षित राहणार आहोत हा दृढ विश्वास ठेवा. 

               *सकारात्मक व्हा - निरोगी रहा *.


 Think Positive and Believe good will happen..


     *चला तर मिळून  सकारात्मक विचार पसरवूया*


अनुवाद: प्रा. रमेश कट्टीमणी

Wednesday, 14 April 2021

समाधान हेच सर्वोत्तम ध्येय

      आयुष्यात तुम्हाला काय हवे आहे? हा प्रश्न बऱ्याच जणांना विचारल्यावर आपल्याला उत्तरे मिळतात की, मला सुखी व्हायचंय, यश मिळवायचं आहे. मुलांबाबतच्या ईच्छा विचारल्या असता बहुतांशी हेच उत्तर मिळते. आयुष्यात जोपर्यंत आपल्या बाबतीत चांगले घडत असते तोपर्यंत आपल्याला ते हवे असते. परंतु दुःख देणारी परिस्थिती निर्माण झाली की मानसिक संघर्ष अनुभवावा लागतो. पूर्ण जीवनकालामध्ये अनेक प्रसंग येतात मग ती सुखकारक असोत अथवा दुःखदायक असोत. येणाऱ्या प्रत्येक घटना, प्रसंगाकडे आपण कशा  पद्धतीने पाहतो यावर तर समाधान अवलंबून असत. चांगलं जीवन जगण्यासाठी चांगले विचार, योग्य संधी निर्माण करणं, निकोप नातेसंबंध इ. बाबींची आवश्यकता असते. 

        'सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वताएवढे' या उक्तीप्रमाणे सुखाची मात्रा कमी मानली जाते. याचे कारण म्हणजे सुख शोधण्याऐवजी दुःखाचाच आपण जास्त बाऊ करतो. सुख हे मृगजळासारखे असते. त्याच्या पाठीमागे आपण जितके लागू तितके ते आभासी वाटते. इंद्रधनुष्याच्या एका बाजूला सुख तर दुसऱ्या बाजूला दुःख असते. एका बाजूला सुख आणि  दुसऱ्या बाजूला दुःख असल्याने बऱ्याचदा टोकाची परिस्थिती निर्माण होते. आयुष्यातील अशा अनेक घटनांचा आढावा आपल्या घटनात्मक स्मृतीच्या आधारे घेतल्यास  या घटनांना  दुःखाचीही झालर असल्याची जाणीव  आपणास होईल. उदा. मुलाचा जन्म ही घटना विचारात घेतल्यास एकीकडे नवीन सदस्य घरी येणार याचा आनंद तर दुसरीकडे कसलाही धोका न निर्माण होता जन्म होईल का, याची काळजी. सहलीला गेल्यावर लोकांना वाटते की आपण आनंदी होऊ. या विचाराने ते सहलीला जातात, मौजमजा करतात, आनंदित होतात, काळजी दूर ठेवतात आणि सुख अनुभवतात. 

    खरंतर सुख अनुभवण्यासाठी सुखाचे ध्येय ठेवावं लागतं. सुखाचे ध्येय ठेवणे म्हणजे 'उच्चतम उत्तम विचार' करणे होय. सुखाला सीमा नाही त्यामुळे सुखाचे ध्येय गाठण्यासाठी समाधानाचे ध्येय ठेवावे लागेल. कारण सुख मिळविण्यापेक्षा समाधान मिळविणे हीच  आरोग्यासाठी संजीवनी आहे. आयुष्य म्हटलं की थोडं डाव उजव होणारच, मानसिक द्वंद्व निर्माण होणारच. कधी कधी आपणास भरभरून मिळेल, कधी थोडस तर कधी काहीच आपल्या पदरी पडणार नाही. मग जे मिळालंय त्यावर रडत बसायचं की त्यात समाधान शोधण्याचा प्रयत्न करायचा हे फक्त आपल्याच हाती आहे. 

      शेवटी काय तर, आपल्याला निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना व स्वीकार करावाच लागेल. आयुष्य पुढे चालू ठेवावेच लागेल. नेहमी त्या तीव्र दुःखाच्या भावना घेऊन उदासपणे कोणीच जगू शकत नाही. आनंद विरून गेला की समाधानाचीच आशा आपण करू शकतो आणि सुखी होऊ शकतो. त्यामुळे समाधान हेच सर्वोत्तम ध्येय आहे. 


- प्रा. रमेश कट्टीमणी

Sunday, 11 April 2021

डिप्रेशन मुक्त होऊया

 🕉️


 *ही कविता नसून औषध आहे:*

*डिप्रेशन मधून बाहेर पडण्यासाठी*


माणूस काय करतो ?


कुढतो जास्त ,

अन रडतो कमी !

म्हणून त्याचं हृदय ,

धडधडत असतं नेहमी !


बोलणं कमी झाल्यामुळे ,

प्रश्न निर्माण झालेत !

सारं काही असूनही ,

एकलकोंडे  झालेत !


भावनांचा कोंडमारा ,

होऊ देऊ नका !

हसणं आणि रडणं ,

दाबून ठेऊ नका !


आपल्या माणसांजवळ ,

व्यक्त झालं पाहिजे !

खरं खरं दुःख सांगून ,

मोकळं रडलं पाहिजे !


हसण्याने , रडण्याने ,

दबाव होतो कमी !

भावनांचा निचरा ,

ही Fresh होण्याची हमी !


कुणाशी तरी बोला म्हणजे ,

हलकं हलकं वाटेल !

दुःख जरी असलं तरी ,

मस्त जगावं वाटेल !


येऊद्यानं कंठ दाटून ,

काय फरक पडतो  ?

आपल्या माणसाजवळच,

गळ्यात पडून रडतो !


आपली माणसं, आपली माणसं,

बाजारात मिळत नसतात !

नाती-गोती जपून ती ,

निर्माण करावी लागतात !


भौतिक साधनं जमवू नका ,

आपली माणसं जमवा !

नाहीतर तुम्ही गरीब आहात ,

कितीही संपत्ती कमवा !


हाय , हॅलो चे मित्र बाबा,

काही कामाचे नसतात !

तुझी पाठ वळली की ,

कुत्सितपणे हसतात !


हसण्यासाठी , रडण्यासाठी ,

माणसं जपून ठेव !

नाहीतर मग घरात एखादा ,

" रोबोट "तरी  आणून ठेव !


रोबोटच्याच गळ्यात पडून ,

हसत जा , रडत जा !

शांत झोप येण्यासाठी ,

दररोज गोळ्या घेत जा !


दुःख उरात दाबून वेड्या ,

झोप येत नसते !

हसत खेळत जगण्यासाठी 

माणसांचीच गरज असते ,


इथून पुढे भिशी कर ,

हसण्याची अन रडण्याची !

हीच खरी औषधं आहेत ,

डिप्रेशनच्या बाहेर पडण्याची !!


 *टेशन घेऊ नका....टेंशन कोणाला देऊ नका..*

Thursday, 8 April 2021

मानसशास्त्राच्या शाखा - भाग २


 आनुवंशिक/ जैविक (जेनेटिक) मानसशास्त्र : 

विकास मानसशास्त्र ही मानवी वर्तनलक्षणांचा उगम व विकास यांचा अभ्यास करणारी मानसशास्त्राची शाखा होय. सुरुवातीला या विषयाच्या अभ्यासक्षेत्रामध्ये वर्तनाचा जातिविकास (फायलोजेनेसिस), वर्तनाची आनुवंशिकता (इन्हेरिटन्स) व व्यक्तीच्या जन्मानंतरचा विकास (ऑन्टोजेनेसिस) अशा तीन उपक्षेत्रांचा समावेश होत होता. आता तुलनात्मक मानसशास्त्र जातिविकासाचा अभ्यास करते. विकासात्मक (डेव्हलपमेंटल) मानसशास्त्रात व्यक्तीच्या जन्मानंतरच्या विकासाचा अभ्यास होतो. परंतु वर्तनाची आनुवंशिकता हे अजूनही पूर्णपणे न उलगडलेले संशोधनक्षेत्र आहे. त्याचा मानसशास्त्राच्या शाखेमध्ये पूर्ण विकास झालेला नाही. या संसोधनक्षेत्राला आता वर्तन-आनुवंशिकी (बिहेव्हिअर जेनेटिक्स) हे नाव देण्यात आले आहे.

व्यक्तीच्या वर्तनामध्ये दृश्यमान होणारी जी गुणलक्षणे असतात त्यांना सरूपविधा (फेनोटाईप) म्हणतात आणि ती आनुवंशिकतेने मिळणाऱ्‍याजनुकविधांद्वारे (जेनोटाईप) मिळतात. त्यांचे स्वरूप विशिष्ट गुणलक्षणांमध्ये विकास होण्याची सुप्तशक्ती असे असते. ह्या जनुकविधा शरीरपेशींमधील रंगसूत्रांवरील जनुके (जीन्‌स) आहेत. कोणत्या जनुकामधून कोणत्या गुणलक्षणाचा विकास होतो ते शोधणे हा वर्तन-आनुवंशिकीचा प्रधान हेतू आहे. त्यासाठी कोणती गुणलक्षणे आनुवंशिकतेने प्राप्त होत असतात व वर्तनाच्या दृश्यमान गुणलक्षणांच्या विकासामध्ये आनुवंशिकतेचा भाग किती, याचा अभ्यास करण्यासाठी एकच गुणलक्षण किंवा गुणलक्षणसमूह अनेक पिढ्यांमध्ये दिसून येणाऱ्‍यावंशावळींचा (पेडिग्री) अभ्यास, नात्यातील व्यक्तींच्या गुणलक्षणांचा सहसंबंध, एकबीजजन्य व द्विबीजजन्य जुळ्या मुलांमधील सहसंबंध, दत्तक घरे (फोस्टर होम्स) त्याचप्रमाणे निरनिराळ्या कुटुंबांमध्ये किंवा सांस्कृतिक पर्यावरणांमध्ये वाढलेल्या जुळ्या सहोदरांचा अभ्यास वगैरे संशोधनपद्धती वापरतात. यामध्ये आता प्रायोगिक आनुवंशिकी या नावाच्या संशोधन पद्धतीची भर पडली आहे. आण्विक विकीकरण, सूक्ष्मतरंग वगैरेंच्या साहाय्याने जनुकांमध्ये फेरबदल घडवून आणून त्याचा वर्तनाच्या विकासावर काय परिणाम होतो, याचा प्रायोगिक रीतीने अभ्यास केला जातो. हा अभ्यास सध्या फळांवरील ड्रॉसोफिला ही माशी व तत्सम प्राण्यांपुरताच मर्यादित आहे. पण वर्तन- आनुवंशिकी शास्त्रज्ञांची आकांक्षा आहे, की या विज्ञानामुळे नजिकच्या भविष्याकाळात जनुकां मध्ये इच्छित फेरफार करून आपल्याला पाहिजे तशा गुणलक्षणांनी युक्त नवी पिढी जन्माला घालता येईल.


संदर्भ : मानसरंग


Wednesday, 7 April 2021

जागतिक आरोग्य दिन विशेष

      प्रतिवर्षी संपूर्ण जगभरात 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो. जागतिक स्तरावर आरोग्य समस्यांवर  विचारमंथन करण्यासाठी 7 एप्रिल 1948 रोजी जागतिक आरोग्य संमेलन झाले. या संमेलनात मानवासमोर असणाऱ्या आरोग्याच्या समस्या सर्वांनी एकत्र येऊन सोडवाव्यात यावर एकमत झाले. या जगात अनेक वंशाचे लोक राहतात. वंश जरी वेगळे असले तरी मानव या नात्याने सर्वांच्या आरोग्याच्या समस्या या सारख्याच आहेत आणि त्या समस्यांवरील उपाय देखील सर्वसामान्यतः समान आहेत.  त्यामुळे मानवास भेडसावणाऱ्या आरोग्याच्या समस्यांवर उपाय शोधणे, जनजागृती करणे या अनुषंगाने जागतिक आरोग्य संघटना कार्यरत आहे.  त्यानंतर दोन वर्षानंतर 7 एप्रिल 1950 पासून जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनाखाली जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यास सुरूवात झाली. 
      या जगात काही देश विकसित आहेत, काही देश विकसनशील तर काही देश हे मागास आहेत. आर्थिक स्थितीनुसार प्रत्येक देशाची आरोग्य समस्यांवर खर्च करण्याचे प्रमाण हे वेगवेगळे दिसून येते. फक्त पैसाच आरोग्य समस्या कमी करण्यासाठी प्रभावशाली ठरतो असे नाही तर त्यासाठी राबविलेले प्रबोधनपर उपक्रम खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रबोधनपर उपक्रमातून अनेक देशातील विविध आरोग्याच्या समस्या दूर झाली असल्याची काही उदाहरणे आहेत.  भारतात  पोलीओ  मुक्ती, क्षयरोग यांचे त्यामध्ये नाव घ्यावे लागेल.  बदलत्या काळानुसार शारीरिक व मानसिक आरोग्याच्या समस्या खूप मोठया प्रमाणात वाढताना दिसत आहेत. अनेक प्रकारचे विषाणू म्हणजेच व्हायरस आरोग्याची समस्या अधिक गंभीर बनवत आहेत. विषाणूच्या संसर्गामुळे मानवी शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा कमकुवत बनत जाऊन अनारोग्य वाढले आहे. 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात असुरक्षित लैंगिक संबंध आणि रक्तसंक्रमणातून पसरणारा एचआयव्हीचा विषाणूने गंभीर रूप दाखविले तर गेल्या दशकात अनेक नवीन संसर्गजन्य गंभीर आजार अस्तित्वात आले. उदा. बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू इ. मधल्या काळात आफ्रिकेत निर्माण झालेला ईबोला, भारतात मोठ्या प्रमाणात झालेले चिकणगुणिया, डेंग्यू हे आजार जीवघेणे ठरले. सद्यस्थितीत मधुमेह, रक्तदाब, हृदय विकार, कर्करोग अश्या आजारांनी अनेकांना ग्रासलेले आहे. या आजारांना रोखण्यासाठी अनेकविध उपायदेखील शोधले गेले व ते प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्नही केला जात आहे. या सर्व बाबींचा विचार करता जागतिक आरोग्य संघटनचे कार्य, महत्व आणि जबाबदारी आणखी वाढल्याचे दिसून येते. 
      जसजसा काळ बदलत चालला आहे तसतसे मानसिक आरोग्य संघटनेपुढे नवनवीन आव्हाने उभी राहत आहेत. बदलत्या काळात आरोग्य समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन जागतिक आरोग्य संघटना काम करते. गतवर्षी आरोग्य दिन साजरा करण्यासाठीची थीम म्हणून ‘डिप्रेशन अर्थात नैराश्य’ या समस्येकडे सर्वांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला गेला. सुमारे 7 अब्ज इतक्या लोकसंख्येच्या या जगात यातील साधारण 35 कोटी लोक नैराश्याच्या विकाराने ग्रस्त आहेत. नैराश्याला उदासीनता असेही म्हणतात. नैराश्य ही संकल्पना मानसिक आरोग्याशी संबंधित असून डी. एस. एम. 5 मध्ये यावरील उपचारपद्धती देखील सांगण्यात आली आहे.  नैराश्य या विकृतीने त्रस्त असणाऱ्या व्यक्तीमध्ये आत्महत्येचे विचार सतत भेडसावतात.  तसे प्रयत्नही केले जातात त्यामुळे या विकृतीकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. सध्याच्या स्पर्धात्मक व धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला ताणतणावाला सामोरे जावे लागते. जो निर्माण झालेल्या प्रत्येक परिस्थितीतिला  सामोरे जातो तो प्रगतीच्या दिशेने पुढे जातो व जो सतत अपयशी ठरतो तो नैराश्याला बळी पडतो. सहा महिने किंवा त्यापेक्षा अधिक काळ सततची आढळून येणारी उदासीनतेची लक्षणे ही व्यक्तीच्या दैनंदिन कार्य पार पाडण्यात अडचणी निर्माण करतात. नैराश्याची बाल्यावस्थेतील कटू प्रसंग, सदोष पालकत्व, लिंग असमानता, व्यक्तिमत्व जडणघडणीतील दोष, घटस्फोट, आर्थिक नुकसान, प्रेमभंग, कौटुंबिक विसंवाद, कमीपणाची भावना, आत्मविश्वासाचा अभाव, विघातक वर्तन अशी अनेक कारणे सांगता येतील. एकाकीपणा, अतिसंवेदनशीलता, नकारात्मक विचार, स्वतःला दोषी समजणे, अती काळजी, अबोलपणा, झोपेचा अभाव, भूक न लागणे, आत्महत्येचे विचार ही काही नैराश्याची ठळक लक्षणे होत. मनातील चुकीची विचारधारा काढून टाकून सकारात्मक विचारांची पेरणी करणे हाच त्यावरील सर्वोत्तम उपाय. यासाठी समुपदेशनाचा मार्ग अत्यंत प्रभावी ठरतो. सध्या जगात अनेक मानसिक सेवा देणाऱ्या संस्था, मानसशास्त्रज्ञ व समुपदेशक विविध मानसशास्त्रीय उपचार पद्धती वापरून नैराश्य कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. या जोडीला भारतात ध्यान धारणा व अध्यात्माचा देखील वापर केला जात आहे.

         गेल्यावर्षी म्हणजेच वर्ष 2019 च्या शेवटी आणखी एका नवीन व्हायरस चा जन्म झाला आणि पुन्हा आरोग्य संघटनेसमोर एक मोठे आव्हान निर्माण झाले. तो म्हणजे कोरोना व्हायरस. यातून होणाऱ्या आजाराला कोविड-19 असे नाव दिले गेले. चीनच्या वुहान प्रांतातून आढळलेला हा विषाणू संसर्गाच्या माध्यमातून बघता बघता संपूर्ण जगभर पसरला आणि या आजाराने जागतिक महामारीचे रूप धारण केले. अनेक देशांना आजाराला प्रतिबंध करण्यासाठी पूर्ण देश लॉकडाउन करावा लागला. सर्दी, खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास होणे, घशात खवखवणे अशी या आजाराची सामान्य लक्षणे. संसर्गजन्य असल्याने व शरीरातील प्रतिकारशक्ती संपवत असल्याने हा आजार जीवघेणा ठरला. यात कित्येक व्यक्तींचा बळी गेला. कित्येक महिन्याच्या कठोर उपाययोजनानंतर काही प्रमाणात यावर नियंत्रण मिळविणे शक्य झाले परंतु आता पुन्हा रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून लॉकडाउन सारखे पर्याय प्रशासनाला अवलंबावे लागत आहेत. या आजारापासून दूर राहण्यासाठी आपली वैयक्तिक जबाबदारी म्हणून गर्दीत जाणे टाळणे, मास्कचा वापर करणे, सॅनीटायझरचा वापर, सुरक्षित अंतर राखणे, गरज असेल तेंव्हाच बाहेर पडणे, वेळीच तपासणी व उपचार करून घेणे, लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. शासन व प्रशासन त्यांच्या परीने करीत असलेल्या उपाययोजनांना प्रतिसाद सर्वानी देणे गरजेचे आहे. शेवटी प्रत्येकांनी नियम पाळले, आपली स्वतःची काळजी घेतली तर याचा प्रसार बऱ्याच अंशी कमी होण्यास मदत होईल.  

      आज ७ एप्रिल २०२१ जागतिक आरोग्य दिवस. "प्रत्येकासाठी सुदृढ व आरोग्यदायी जग बनविणे" ही यावर्षीच्या या दिनाची मुख्य संकल्पना आहे. या दिनाच्या निमित्ताने या लेखाच्या माध्यमातून जुन्या आजारापासून ते सद्यस्थितीत थैमान घालत असलेल्या काही शारीरिक व मानसिक आजारांचा आढावा प्रयत्न केला आहे. आज या दिनाच्या निमित्ताने शेवटी इतकाच संदेश द्यावासा वाटतो.....

वेळ नाजूक आहे, जरा  सांभाळून राहा !

हे युद्ध थोडं वेगळं आहे, अंतर राखूनच लढा..!

खर पाहीलं तर, जीवनावश्यक काहीच नाही !

आपले जीवनच आवश्यक आहे.!!!


लेखक - प्रा. रमेश कट्टीमणी
सहाय्यक प्राध्यापक
कन्या महाविद्यालय, मिरज 


Tuesday, 6 April 2021

मानसशास्त्राच्या शाखा – भाग – १


*विकासात्मक वा बालमानसशास्त्र*

   जन्मानंतरच्या पहिल्या काही महिन्यांत मुलांच्या प्रतिक्रियांमध्ये संयोजन आणि जटिलता यांचा अभाव असतो. त्यांची संवेदने, त्यांच्या भावना, त्यांच्या संकल्पना, इतरांच्या संबंधात त्यांचे वर्तन वगैरेही जटिल नसतात पण मासप्रतिमास त्यांच्या मज्जसंस्थेचा परिपक्वनात्मक विकास होत जातो शिवाय, त्यांचे अनुभवाने शिकणेही चालू असते. परिणामी वर्तन आणि मानसिक जीवन उत्तरोत्तर जटिल होत जाते. वर्तनाच्या आणि मानसिक व सामाजिक जीवनाच्या या उत्तरोत्तर अवस्थांचा अभ्यास म्हणजे विकासात्मक मानसशास्त्र होय. अर्थातच बालमानसशास्त्र हा विकासात्मक मानसशास्त्राचाच एक विभाग होय. तथापि विकासात्मक मानसशास्त्रामध्ये गर्भावस्था, बाल्यावस्था, किशोरावस्था, तारुण्य, वार्धक्य या अवस्थांचाही शारीरिक-मानसिक दृष्ट्या अभ्यास करण्यात येतो. त्या त्या अवस्थेतील विकासास पोषक तसेच बाधक ठरणारे घटक, त्या त्या अवस्थेत घडून येणारे बदल व त्यामुळे अनुकूलनाच्या बाबतीत सर्वसाधारणपणे ज्या समस्या निर्माण होत असतात त्यांचा अभ्यास करणे, हे विकासात्मक मानसशास्त्राचे प्रमुख उद्दिष्ट होय. लहान मुलांची माता-पित्यांनी टिपून ठेवलेली निरीक्षणे विविध प्रसंग निवडून बालकांच्या वर्तनाचे –बोलण्यावागण्याचे-निरीक्षण बालकांना प्रश्न विचारणे तसेच कृतिचाचण्या देणे किशोरांच्या, प्रौढांच्या तसेच वृद्धांच्या मुलाखती इ. पद्धती व तंत्रे विकासात्मक मानसशास्त्रातील संशोधनासाठी वापरली जातात.

संदर्भ : मानसरंग 

Sunday, 4 April 2021

परीक्षेची भीती

      परीक्षा म्हटली की, सर्वाच्याच पोटात गोळा येतो. दहावी किंवा बारावीत असलेल्या मुलांनाच नव्हे, तर त्यांच्या पालकांनाही त्यांच्या परीक्षेची चिंता लागून राहते. दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत ८० टक्के गुण मिळवूनही चांगल्या महाविद्यालयामध्ये आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत ९५ टक्के गुण मिळवूनही आपल्या आवडत्या विषयात विश्वविद्यालयीन पदवी मिळवण्यासाठी आणि चांगल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे परीक्षा जसजशी जवळ येते, तसतसा प्रत्येक विद्यार्थ्यांला थोडा तरी परीक्षेचा ताण अनुभवास येतो. या तणावामुळेच विद्यार्थी रात्री जागून अभ्यास करतात आणि त्यांचे अभ्यासावर लक्ष केंद्रित होते; परंतु हाच ताण अधिक प्रमाणात वाढल्यास परीक्षेच्या काळजीमुळेच विद्यार्थ्यांचा अभ्यास होत नाही. त्यांची झोप उडते आणि ते निराश होतात. परीक्षा जवळ आल्यावर मग रात्रंदिवस अभ्यास करण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या सल्ल्यानुसार पहिल्यापासून जोमाने अभ्यास करावा.

        जी मुले आरंभापासूनच नियमितपणे अभ्यास करत नाहीत, त्यांना परीक्षा जवळ आल्यावर परीक्षेची भीती आणि ताण वाढणे हे स्वाभाविकच आहे; परंतु ब-याच वेळा उत्तम अन् नियमित अभ्यास करणा-या हुशार विद्यार्थ्यांच्या मनावरही परीक्षेचा ताण येतो; कारण त्यांच्या मनात मला ९५ टक्के गुण मिळाले नाहीत किंवा माझा पहिला क्रमांक आला नाही, तर आई-वडिलांना आणि आपल्या नातेवाइकांना काय वाटेल, ही भीती सतत डोकावत असते. अशा वेळी पालकांनी तू योग्य शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली नियमितपणे आणि चांगला अभ्यास करावा, हीच आमची अपेक्षा आहे. जास्तीत जास्त प्रयत्न करूनही तुला अल्प गुण मिळाले किंवा दुर्दैवाने तू अनुत्तीर्ण झालास, तरी आम्हाला काहीच वाटणार नाही, असे आश्वासन मुलाला द्यावे. त्याला गीतेतील श्रीकृष्णाच्या वचनाची ‘फलाची अपेक्षा न करता कर्म करणे (अभ्यास करणे) हेच तुझे कर्तव्य आहे’, याची आठवण करून द्यावी.

     आपल्या घरात अभ्यासू, शांत, आनंदी, वातावरण निर्माण करून देणे, हे पालकांचे उत्तरदायित्व त्यांनी पार पाडावे. मुलांचे अभ्यासात लक्ष लागून त्यांची एकाग्रता वाढवण्यासाठी खालील गोष्टी उपयोगी पडतील.

>> मुलाला अभ्यासासाठी वेगळी खोली द्यावी किंवा शक्य नसल्यास खोलीतील एका भागात छोटीशी विभागणी (पार्टीशन) करून द्यावी.

>> घरात दूरचित्रवाणी आणि आकाशवाणी लावू नये.

>> घरात आई-वडिलांची किंवा इतर मुलांची भांडणे होणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी.

>> घरातील भांडणतंटे मुलाच्या समोर सोडवू नयेत.

>> आपले मित्र किंवा आपल्या मुलाचे मित्र यांना घरी बोलावू नये.

>> अभ्यासासाठी मुलगा रात्री जागत असल्यास आपणही तत्त्वज्ञान किंवा आपल्या आवडीच्या विषयाचे वाचन करून त्याला साथ द्यावी.

     परीक्षेचा विषय चांगल्या रीतीने समजण्यासाठी आणि परीक्षेत प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासाठी तज्ज्ञ शिक्षकांची योजना करावी. या तज्ज्ञ शिक्षकांना शिकवण्याची आवड असावी आणि कठीण विषय सोपा करून सांगण्याची हातोटी असावी. विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्याच्या सर्व शंका त्यांनी प्रेमळपणे आणि न रागावता त्याला समजेपर्यंत समजावून सांगाव्यात. शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांकडून परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सोडवून घ्याव्यात. प्रश्नपत्रिका परीक्षेच्या ठरावीक काळातच सोडवून त्याला आवश्यक ते मार्गदर्शन करावे. प्रत्येक विषयाची प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळे मुलाच्या मनातील परीक्षेची भीती निघून जाईल आणि त्याचा आत्मविश्वास वाढेल.
विद्यार्थ्यांला प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी पुरेसा वेळ नसल्यास मनातील परीक्षेची भीती घालवण्यासाठी खालील उपक्रमांचा लाभ होईल. या कामी पालकांनी मुलांना सहकार्य करावे.

      विद्यार्थ्यांनी पाठ टेकून बसावे आणि डोळे मिटून शरीरातील सर्व अवयव शिथिल करून स्वस्थ अन् शांत मनाने पुढील सूचनांकडे लक्ष देऊन ऐकावे आणि सूचनांशी मनाने एकरूप व्हावे. ‘तुझी परीक्षेच्या सर्व विषयांची संपूर्ण सिद्धता झालेली आहे. उद्या परीक्षा आहे. रात्रभर शांत झोप मिळाल्याने तू सकाळी ताजातवाना होऊन उठलेला आहेस. आपल्या आजच्या विषयाचे टाचण तू भराभर चाळत आहेस’. आता कोणत्याही प्रश्नाचे उत्तर चांगल्या प्रकारे लिहू शकेन, असे तुला वाटत आहे. थोडासा अल्पोपहार घेऊन तू परीक्षेच्या सभागृहात वेळेवर पोहोचलेला आहेस. पहिली घंटा (बेल) वाजलेली आहे. आपल्या जागेवर बसून, डोळे मिटून, निर्विचार अवस्थेत तू शांतचित्ताने बसलेला आहेस. आता दुसरी घंटा (बेल) वाजलेली आहे. तुझ्या हातात प्रश्नपत्रिका मिळालेली आहे.

      प्रत्येक प्रश्न वाचून आणि गुण पाहून तू कोणते प्रश्न सोडवणार आहेस, याचा विचार केलेला आहेस. परीक्षेचे सर्व प्रश्न सोपे आहेत. तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर समाधानकारक लिहिले जात आहे. शेवटची १० मिनिटे राहिल्याची घंटा (बेल) वाजत आहे. तू भराभर सर्व पाने चाळून सर्व प्रश्न अचूक लिहिले आहेस का, याची निश्चिती करून घेतलेली आहेस. शेवटची घंटा (बेल) वाजली आहे आणि तू आपली प्रश्नपत्रिका पर्यवेक्षकांच्या हातात आणून देत आहेस. तू आता घरी आला आहेस आणि घरातील सर्वाना प्रश्नपत्रिका सोपी गेली आहे, असे सांगत आहेस. आता जेवून तू थोडा वेळ झोपणार आहेस आणि नंतर उद्याच्या परीक्षेची सिद्धता करणार आहेस. सर्व धडय़ांचा सारांश वाचून झालेला आहे आणि आता तू शांत झोपत आहेस. याप्रमाणे ५-६ वेळा सूचनांद्वारे मनाने परीक्षेच्या सभागृहामधून प्रश्नपत्रिका सोडवून आल्यामुळे विद्यार्थ्यांची परीक्षेची भीती न्यून होईल.


संदर्भ : प्रहार

Thursday, 1 April 2021

कोणताही आजार आपल्याला का होतो ?

➖➖➖➖➖➖➖➖➖


कुठलाही आजार आपल्याला का होतो ? तर त्याचे सहज सोपे उत्तर आहे. तुमच्या मनाने स्विकारल्यामुळे!


बुद्ध सांगतात की, तुमचे मन आणि विचार हेच सर्वकाही आहे. जसा विचार कराल तसेच तुम्ही घडाल !


आपल्या शरीरात पाण्यावर तरंगण्याची नैसर्गिक शक्ती आहे. पण तरीही माणूस पाण्यात बुडून मरतो. याला काय म्हणाल? आपल्या मनाने अतिशय प्रखरपणे स्विकारलेय की मला पोहायला येत नाही आणि कोणालाही पोहायला येत नाही ही अंधश्रद्धा आहे. हत्ती किती जड आहे पण तोही पोहतो. कारण त्याने ठरवलेले नाही. त्याला माहीतच आहे तो पाण्यावर तरंगणार आहे. 


सापाला तर हात नि पाय ही नसतात. तरीही तो पाण्यात पोहतो. म्हणजे हात पाय हलवले, तरच आपण पाण्यावर तरंगू शकतो हाही गैरसमजच आहे. जी माणसं पाण्यात बुडून मरतात त्यांचे शरीर काही वेळाने पाण्यावर तरंगायला लागते. याप्रमाणेच आपल्यात प्रतिकारशक्ती आहे. 


आपल्याला कसलाच आजार होऊ नये यासाठी आपले मनच सतत कार्यरत असते. त्या मनाला प्रखरपणे मान्य करायला शिकवा. हेच खरे शरीर शास्त्र आहे. मेडीकल सायन्स ही शक्ती तुमच्यात नसेल तर काहीच करू शकत नाही. 


ताप आल्यावर, सर्दी झाल्यावर, शिंक आल्यावर कसलाही आजार झाल्यावर थोडे थांबा. तुमच्यातील प्रतिकार शक्तीला काम करू द्या. अशा आजारांवर वारेमाप खर्च करणे शरीरावर अत्याचार आहेत. ही अंधश्रद्धा आहे. शरीरशास्त्रात नैसर्गिक प्रतिकार शक्ती म्हणजेच खरे विज्ञान आहे.


आपल्या शरीरातली अर्ध्याहून अधिक आजारांच्या मागे आपलं अज्ञ मन असतं. पण कित्येकदा आपल्याला याची माहीती नसते. डॉक्टरांकडे गेलं आणि उपचार घेतले की तात्पुरतं बरं वाटतं, थोड्या दिवसांनी पुन्हा दुखणं उफाळून येतं, काय करावं, ते समजत नाही.


*मन नि शरीर यांना जोडणारी काही लक्षणे* :


* एखाद्या गोष्टीची भिती किंवा चिंता वाटली की घशाला कोरड पडते. 

* परीक्षेचा किंवा अजून कसला तणाव असेल तर पोटात गोळा येतो.

* समोर एखादा अपघात किंवा दुर्घटना पाहिली की हातापायातली शक्ती गळून जाते. आणि याविपरीत सतत हसतमुख असणारी व्यक्ती क्वचितच आजारी पडते.


आपल्या शरीरातल्या आंतरिक क्रियांवरही अज्ञात मनाची सत्ता चालते. जसं की, समोर मातीचे कण उडाले की सेकंदाच्या दहाव्या भागात लगेच पापण्या मिटतात. अज्ञात मन शक्तीशाली आहे पण एखाद्या सेनापती सारखं, त्याच्यावर सत्ता चालते ती फक्त आपल्या विचारांची.


ताकतवार असला तरी तो गुलामच. दिलेला आदेश पाळणं एवढचं त्याचं काम. आपण जे काही बोलतो तेच आपले विचार आहेत.


समजा एखादा माणुस, नकळत, अशी वाक्ये पुन्हा पुन्हा वापरत असेल; त्याला बघितलं की माझं रक्तच खवळतं, ह्यांच्यासाठी मी रक्ताचं पाणी केलं आणि हे बदलले, माझी तळपायाची आग मस्तकाला जाते.


क्वचित अशी वाक्ये वापरली गेली, तर हरकत नाही; पण पुन्हा पुन्हा हेच बोलल्यास आणि ते सुप्त मनात गेल्यास त्याचा विपरीत परिणाम रक्ताभिसरणावर नक्कीच होतो. डॉक्टरकडे गेल्यावर औषध नि उपचाराने काही काळ बरं वाटतं, पण अज्ञ मन त्याचा पिच्छा अजिबात सोडत नाही.


ही सर्व वाक्य सतत तणावात असणार्‍या व्यक्तीच्या सवयीचा भाग बनतात आणि लवकरच ब्लडप्रेशर आणि मोठ्या स्वरुपाचे हृदयाचे विकार घेरण्यास सुरुवात करतात. थोडक्यात सतत मानसिक तणाव, हताश पणा आणि निराशा अनुभव करणाऱ्या व्यक्तीला हृदयाचे विकार लवकर घेरतात.


जी व्यक्ती स्वतःलाच घालून पाडून बोलते, स्वतःची निंदा करते, स्वतःला दुबळा समजते, त्या व्यक्तींना छोट्या आतड्यांच्या विकारांची समस्या उदभवते.


बहुसंख्य लोक अपचन या आजाराने त्रस्त असतात. खरं तर मलविसर्जन ही अतिसहज आणि नैसर्गिक क्रिया आहे. तरीही काही जणांना ‘धक्का देण्यासाठी’ कृत्रिम उपायांचा, जसं की एखादे चुर्ण किंवा एखादं औषध ह्यांचा आधार घ्यावा लागतो.


काही वेळा ह्याचं कारण बाल्यावस्थेत दडलेलं सापडतं. कडक शिस्तीच्या नादात आई वडीलांनी मुलाला केलेली शिक्षा. त्याचा राग त्याच्या मनात असतो. लहान मूल आईवडीलांवर राग काढू शकत नाही. त्याला त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकावीच लागते. त्यांना विरोध म्हणून ही क्रिया तो रोखून धरतो. हळुहळू तो मोठा होतो. शिस्तीचा बडगाही संपतो पण आपल्या आतड्यांवरचं नैसर्गीक नियंत्रण तो हरवून बसतो. 


जेव्हा व्यक्ती आर्थिक संकटात सापडते, तेव्हा तिची पचनशक्ती कमजोर होते. जे लोक कंजुष वृत्तीचे असतात, त्यांच्यामध्ये मुळव्याध्याची समस्या जास्त आढळते. छोट्याछोट्या गोष्टींवरही एखादी व्यक्ती वारंवार उत्तेजित होते, चिडते, अस्वस्थ होते आणि मग त्याचा परिणाम जठर आणि पित्ताशयावर पडतो.


आजकाल बहुतांश महिला वर्गाला झंडुबाम शिवाय झोपच येत नाही. कारण काय असेल बरं? ह्या व्यक्तीला बघितलं की माझं डोकं दुखतं, त्याने माझं खुप डोकं खाल्लं, आमच्या ह्यांच्या समोर कितीही डोकं फोडा काहीही फायदा नाही. निरंतर, नकळत असं बोलत राहील्याने अज्ञ मनात संदेश पोहचतो की माझ्या डोक्याला दुखायचे आहे आणि मायग्रेनचा त्रास चालू होतो.


डोकेदुखीची अजुनही काही कारणे आहेत. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एखादी अप्रिय घटना घडलेली असतेच, पण तिला मनातल्या मनात पुन्हा पुन्हा उगाळण्याचा स्वभाव असेल तर डोकेदुखी सुरु होते. तेव्हा असे कटु अनुभव विसरुन जाणेच हेच इष्ट!


कधी नकोसे वाटणारे काम, त्रासदायक काम अंगावर येऊन पडते आणि डोके दुखते. जितके ते काम पुढे ढकलल्या जाते तेवढा त्रास होतो, तेव्हा अशी कामे तात्काळ निपटून काढावीत.


एखादी व्यक्ती सतत जबाबदारीच्या ओझ्याने वाकून थकुन गेली असेल तेव्हा तिला पाठदुखीला वा कंबर दुखीला सामोरं जावं लागतं. असह्य वेदना होतात. ह्यात माने पर्यंतचे स्नायू आखडले जातात. त्यांच्या वरचा ताण जाणवतो. चेहरा मूळ स्थानी न राहता उजवीकडे किंवा डावीकडे कलतो.


आता ह्यावर उपाय काय आहे? आपापले औषधौपचार चालू ठेवा. पण हे रोग शरीरातून समूळ उपटून काढायचे असतील तर स्वयंसुचना हाच त्यावरचा एकमेव उपाय आहे.


*एक उदाहरण घेऊ या* :


तंद्रावस्थेत जाऊन आपल्या अज्ञात मनाला सुचना द्या. आता माझं डोकं एकदम हलकं हलकं होत आहे, आता ते अजून शिथील आणि हलकं झालं आहे, डोके दुखण्याचे प्रमाण कमी होत आहे, माझ्या डोक्यात जमा झालेलं अतिरीक्त रक्त आता शरीराच्या इतर भागात सुरळीतपणे पसरत आहे. माझा डोके दुखीचा त्रास नाहीसा होत आहे, काही क्षणांमध्ये ही बैचेनी दुर होईल. आणि डोकेदुखी गायब होईल.


प्रत्येक रोगासाठी अशा सुचना तयार करुन त्या अज्ञ मनापर्यत पोहचवून रोगमुक्त होता येते. सारांश काय तर, भावनांची कोंडी करुन जगू नका. रोग बनून ते शरीराला पोखरतील. राग व्यक्त करा, आणि मोकळे व्हा.


इथे एका महापुरुषाचा दृष्टांत आठवतो. त्यांना राग आल्या क्षणी ते कागद घ्यायचे आणि सविस्तर लिहून काढायचे. मनातले संपुर्ण भाव ओतून रिते व्हायचे. ते कागद दोन चार दिवस तसेच टेबलावर ठेवायचे आणि नंतर जाळून किंवा फाडून टाकायचे.


अशा प्रकारे मनातली सारी खळबळ बाहेर काढून टाकता येते. शेवटी क्रोधाची भावना नाहीशी होते आणि हलकं हलकं वाटतं.


*तुम्हा सर्वांना, निरोगी आणि ठणठणीत आयुष्यासाठी मनःपुर्वक शुभेच्छा !*

Wednesday, 31 March 2021

आनंदी क्षणाच्या आठवणी

तरुण संजय अचानक वारला. त्याचे आई वडील, पत्नी व नऊ वर्षाचा मुलगा त्याच्या शवाजवळ  रडत बसले.

ते सर्वजण एका साधुला खूप मानत होते.


 त्या  साधुनांं  संजयची दुखःद बातमी कळताच ते संजयच्या कुटुंबियाना भेटायला आले.


घरात प्रवेश करताच संजयचे पूर्ण कुटूंब रडत असल्याचे पाहिले. साधुनां  पहाताच संजयची बायको अजून जोरात रडू लागली.

दुखाःने म्हणाली, " महाराज, हे तरुण वयात आम्हाला सोडून गेले आता माझ्या मुलाच कसे होईल...?😭

याना परत आणा.

 त्याना परत आणण्यासाठी मी काही क़रायला तयार आहे." साधुमहाराजानी पत्नी व वृध्द आई वडिलांचे सांत्वन करण्याचा खूप प्रयत्न केला पण संजयच्या अकाली मृत्यूचा आघात पचविणे त्याना जड जात होते.


शेवटी साधुमहाराज  म्हणाले, " ठिक आहे, मला पंचपात्रभर पाणी द्या." ते शवाजवळ पंचपात्र घेवून बसले

व म्हणाले, "ज्याला कोणाला संजय जिवंत व्हावा असं वाटते त्याने पंचपात्रातील पाणी प्यावे. संजय जिवंत होईल पण पाणी पिणारा मरण पावेल"


स्मशान शांतता.!🤕


"चला, तुम्हीच म्हणाला होता ना की, संजय कुटुंबातील एकुलता एक कमविता आहे? त्याच्या ऐवजी कोण मरायला तयार आहे? ही एक आदलाबदलीची चांगली संधी आहे,


 हो ना?"


संजयची बायको व वृध्द आई एकामेकीच्याकडे पाहू लागल्या. वृध्द वडिल संजयच्या मुलाकडे पाहू लागले. पण कोणी पुढे येईना 

साधु वडिलांना  म्हणाले, " बाबूजी, तुम्ही तुमचे आयुष्य तुमच्या मुलासाठी देत नाही का?"

बाबूजी म्हणाले, "माझ्या पत्नीची

जबाबदारी माझ्यावर आहे. मी मेलो तर तिच्याकडे कोण पाहिल? मी नाही आयुष्य देवू शकत."


महाराजांनी  प्रश्नार्थक मुद्रेने वृध्द आईकडे पहात विचारले, " आई..तुम्ही ?"

आई म्हणाली, "माझ्या मुलीचे पहिले बाळंतपण आहे. ती आता येणार आहे. मी मेले तर मुलगी व होणार्‍या बाळाला कोण पाहिल? तुम्ही संजयच्या बायकोला का विचारीत नाही?”

साधु महाराजांनी हसून संजयच्या तरुण पत्नीकडे पाहिले. ती अश्रूने भरलेले डोळे विस्फारुन म्हणाली, "महाराज, मला माझ्या मुलासाठी जगले पाहिजे. मी मेले तर त्याला कोण? कृपा करुन मला हा त्याग करायला सांगू नका..”साधुनी संजयच्या मुलाला विचारले, "बाळा! तू तुझे आयुष्य वडिलाना देण्यास तयार आहे?"


मुलगा काही बोलायच्या आत त्याच्या आईने मुलाला ओढून छातीजवळ धरून म्हणाली,

"साधु महाराज, 

तुम्हाला वेड लागलय "?

माझा पोरगा फक्त नऊ वर्षाचा आहे. त्याने अजून पुरेसं जग पण पाहिलं नाही. तुम्ही त्याचा कसा विचार करु शकतो.

साधुमहाराज म्हणाले, "बहुतेक याचा अर्थ तुम्हा सर्वांची या जगात काही ना काही कारणासाठी जरुरी आहे. संजयचं एकटा बिन कामाचा होता म्हणून तो गेला. तरी आता त्याचे अंतिम संस्कार करायला सुरवात करायची का? आधीच ऊशीर झाला आहे”


एवढे बोलून साधु निघून गेले. 

तात्पर्य :---

जोपर्यत जीवंत आहात प्रेम तोपर्यंतच.

त्यानंतर फक्त आनंदी क्षणाच्या आठवणी..!


संकट समयी प्रामाणिक व श्रीमंतीत साधे रहा.

अधिकार असताना समंजस व रागावलेला असताना शांत रहा. .....


म्हणुनच कवी भा. रा. तांबे 

म्हणतात......जन पळभर म्हणतील हाय हाय ............

              🙏🙏🙏🙏


संदर्भ: मनसंवाद

Saturday, 27 March 2021

जीवन

 त्रासाने भरलेल्या खोक्यावर

मी "आनंद" असं लिहितो

...आणि दुःख confuse होतं


येणाऱ्या प्रत्येक संकटाला

एक छानशी smile देतो

...आणि दुःख confuse होतं


खरं सांगायचं तर खूप वेळा

मी कोलमडून जातो

सगळं संपलं असं वाटून

अगदी गर्भगळीत होतो

कुठूनतरी देव येऊन

माझ्या हातात हात देतो

...आणि दुःख confuse होतं


संकटाच काय? ती येणारच

आल्यावर थोडं फार छळणारच

आपण स्थिर राहायचं काही काळ

संकटाचं पाणी पाणी होणारच

आलेलं संकट हसता हसता

नकळत नाहीसं होतं

...आणि दुःख confuse होतं


किती दिवसाचं हे आयुष्य

आज ना उद्या संपणारच

अमुक आहे-तमुक नाही 

आपलं चालू राहणारच

फाटक्या गोधडीत पाय आखडून

मी सुखाने झोपी जातो

...आणि दुःख confuse होतं


म्हटलं तर जीवन सुंदर 

म्हटलं तर वाईट आहे

मग त्याला सुंदर म्हणण्यात 

सांगा काय वाईट आहे? 

जीवनाकडे बघण्याचा

मी चष्मा विकत घेतो

...आणि दुःख confuse होतं.

Friday, 26 March 2021

भावना व्यक्त करणे

दिवसभरात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे भावनानुभव येतात . त्यातील काही अनुभव सुखद तर काही अनुभव दुःखद असतात . मानसिक स्वास्थ्यासाठी स्वत : च्या भावना स्वीकारा. अगदी राग , भीती , आक्रमता , हेवा , तिरस्कार या स्वत : च्या भावनासुद्धा मान्य करा . कारण दुसऱ्यांचा राग येणे , कधीतरी हेवा वाटणे हे नैसर्गिकच आहे . तेव्हा त्या भावना टाळण्याचा किंवा दडपून टाकण्याचा प्रयत्न करू नका . मात्र त्या भावनांच्या आहारी जावू नका . त्यांना चिकटून राहू नका . भावना सतत दडपण्याची सवय लागली, तर नंतर कधीतरी त्या विकृत रूपात उफाळून येण्याची किंवा भावनांचा उद्रेक होण्याची शक्यता असते . तेव्हा भावतरंग उमटू द्या. भावना नियंत्रित प्रमाणात व योग्य पद्धतीने व्यक्त करता आल्या पाहिजेत. मानसिक स्वास्थ्यासाठी एक भावना अत्यावश्यक असते. ती म्हणजे प्रत्येक दिवशी थोडेतरी मनमोकळे हसावे. आनंद व समाधान ही मानसिक स्वास्थ्याचा प्राणवायू आहे. हल्ली बऱ्याच मोठ्या शहरांतून हास्य क्लब ' सुरू झाले आहेत हे तुम्हाला माहितच असेल. हसण्यामुळे चेहऱ्याचे स्नायू, श्वसन संस्था व पचनसंस्था यांना चांगला व्यायाम मिळतो. तसेच हसण्याने जे जैवरस स्त्रवतात ते शारीरिक व मानसिक स्वास्थ्याला पोषक असतात, असे काही शास्त्रज्ञांनी संशोधनाअंती सांगितले आहे.  म्हणून रोज आनंद , सुख या भावना जरूर अनुभवा. शिवाय तुम्ही हसतमुख असलात तर तुमचा सहवास इतरांना प्रिय वाटतो. तुमच्याबरोबर राहून तेही आनंदी होतात. हसतमुख राहायचे की स्वत : च्या दुःखाचे, तक्रारींचे रडगाण गात राहायच हे तुमच्याच ( हातात ) इच्छेवर अवलंबून असत . यासंदर्भात कवी मंगेश पाडगावकरांची एक छान कविता आहे. 

सांगा ! कस जगायचं ?

कण्हत, कण्हत की गाण म्हणत

तुम्हीच सांगा !

Thursday, 25 March 2021

सुविचार

 💞बिरबलाच्या हजर जबाबीपणाची सतत परीक्षा घेणाऱ्या अकबरानं नेहमीप्रमाणे त्याला ‘अवघड’ कोडं घातलं. 


💞 अकबर ने जमिनीवर एक रेष ओढली आणि बोलला ‘काढलेली रेषा न पुसता छोटी करून दाखव.’ 


💞बिरबलाचं उत्तर तयारच होतं. त्यानं त्याच रेषेजवळ एक मोठी रेष मारली आणि जुनी रेष आपसूकच ‘छोटी’ होऊन गेली.


💞तसंच माणसाच्या मनाचंही आहे. जेव्हा 

मनात नकोसे वाटणारे विचार येतात तेव्हा ते त्रास देतात,असे दुःखाची अनुभूती करून देणारे विचार आपल्याच मनात निर्माण होतात


💞 अशा विचारांना पराभूत करून मनाला स्वास्थ्याकडे घेऊन जाणारे सामर्थ्य ही आपल्याच मनात दडलेले असते


💞 जेव्हा एखादी दुर्दैवी घटना घडते तेव्हा त्या घटने बाबत येणाऱ्या विचाराचे स्रोत आपोआप मनात सरू होते. आपले मन सातत्याने त्यावर विचार प्रवाहित करते.


💞आपण प्रवाहाला वेळीच लगाम न घातल्यामुळे जास्त विचार प्रवाहित होऊन  मनाची शक्ती कमी कमी होत जाते आणि आपला तणाव वाढत जाऊन आपण तणावग्रस्त बनतो


💞अशा वेळी आपण बिरबला प्रमाणे  नकारात्मक रेषे शेजारी एक सकारात्मक विचारांची मोठी रेषा ओडून नकारात्मक विचाराची लांबी वेळीच कमी करावी ....


💞 दुःखाला मोठ करायचं किंवा सुखाला मोठ करायचं हे मनाच्या हातात असते. 

फक्त गरज असते तुम्ही सतर्क राहून वेळीच आपल्या मनाला आदेश देण्याची..


- अजय ढगे

Wednesday, 24 March 2021

अतिनैराश्य

अकारण दुःखी मन, कशातही रस नसणे, निद्रानाश इतरांशी मिळून मिसळून न राहणे या सर्व ‘अतिनैराश्याच्या’ खाणाखुणा आहेत. या मानसिक लक्षणांबरोबरच काही शारीरिक लक्षणेही (भूक नसणे, बध्दकोष्ठ, सैलपणा, थकवा, इ.) आढळतात. असा रुग्ण आत्महत्या करण्याचा संभव असतो. मृत्यू हेच औषध आहे अशी त्यांतल्या ब-याच जणांची खात्री असते. अशा दर दहा मनोरुग्णांपैकी एखादा तरी आत्महत्या करतो.

उदाहरण

रघुनाथ वकिलांची वकिली हळूहळू बंद झाली. सुरुवातीला अगदी हुशार म्हणून त्यांचा लौकिक होता. नंतर त्यांच्यात बदल दिसू लागले. सुरुवातीला खूप बडबड, चिडकेपणा सुरू झाला. त्यानंतर अशीलांना उर्मटपणे बोलणे, आरडाओरड करणे, कामावरचे लक्ष कमी होणे, स्वतःबद्दल अव्वाच्या सव्वा बोलणे, अनोळखी माणसांनाही हसून खेळून सलगी दाखवणे, खूप महत्त्वाकांक्षा, इत्यादी प्रकार दिसून येऊ लागले. आक्रमक बोलणे, वागणे जास्त झाल्यावर व्यवसायाला उतरण लागली. एक-दोन वर्षातच त्यांच्याकडे अशील जाणे थांबले, पण कोर्टात जाणे-येणे चालूच होते. काम मिळेनासे झाल्यावर ही सर्व लक्षणे जास्त वाढली. मध्येमध्ये यामध्ये चढउतार व्हायचे आणि आठवडा-दोन आठवडे चांगले जायचे. डॉक्टरकडून मानसोपचार झाल्यावर हळूहळू त्यांची लक्षणे सौम्य झाली. यानंतर त्यांचे वागणे बरेच सुसह्य झाले. हा ‘उन्माद’ आजार म्हणता येईल.

उन्माद व अतिनैराश्य या दोन्ही प्रकारच्या रुग्णांवर औषधोपचाराचा चांगला उपयोग होतो. याबरोबरच इतर नातेवाईकांनी मानसिक आधार देऊन समजूतदारपणा दाखवून मनोरुग्णास मदत केली पाहिजे.

उन्माद व अतिनैराश्य ही दोन टोके आहेत. एकाच रुग्णात ही दोन्ही टोके दिसू शकतात. कधी उन्माद तर कधी अतिनैराश्य.

(संदर्भ : आरोग्यविद्या डॉट कॉम)

Tuesday, 23 March 2021

मेंदूची उचकी



मनात येणाऱ्या विचारांच्या प्रवाहापासून अलग होऊन ते विचार जाणणे हे मेंदूतील सर्वात पुढील भागाचे कार्य आहे. कपाळावर माणसे टिळा किंवा कुंकू लावतात तेथेच मेंदूचा हा भाग असतो. गेल्या मिनिटांत आपापल्या मनात कोणते विचार होते हे सामान्यत: सर्वाना पाहता येते. याला मेटाकॉग्निशन म्हणतात. रोज काही वेळ विचारांच्या प्रवाहापासून असा अलग होण्याचा सराव करता येतो. असा सराव करत असताना मेंदूचे परीक्षण केले असता वरील भाग सक्रिय झालेला दिसतो. त्याच्या शेजारी असलेला भाग माणूस ठरवून एखाद्या ठिकाणी लक्ष देतो त्या वेळी सक्रिय होतो. ओसीडीचा (ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डर) त्रास होत असतो त्या वेळी या दोन्ही भागांचे कार्य नीट होत नाही. वय वर्षे सहा ते अठरा या वयातील २०० मुलांपैकी एकाला मानसोपचार आवश्यक आहेत असा ओसीडीचा तीव्र त्रास असतो. सौम्य स्वरूपात हा त्रास खूप मुलांना असतो. वय वाढते तसा हा त्रास वाढत जातो आणि १८ वर्षे वयातील मुलात त्याचे प्रमाण दुप्पट झालेले दिसून येते. अनेक हुशार मुलांचे करिअर अशा त्रासाने धोक्यात येते. ओसीडीला ‘मेंदूची उचकी’ अशी उपमा देतात. माणसाच्या छाती व पोट यांच्या मध्ये श्वासपटल असते. त्याचे झटका आल्यासारखे आकुंचन होते त्या वेळी उचकी लागते. काही कारण नसतानाही उचकी लागू शकते. ‘ओसीडी’मध्ये मेंदूतील ठरावीक विचाराची फाइल अशीच खूप वेळ पण झटका आल्यासारखी प्रबळ होऊन राहते. त्या वेळी अन्य कोणतेही भान राहत नाही. सतत विचारात राहणे हे असे होण्याचे एक कारण असू शकते. पण असे कारण नसते म्हणजे मुलेमुली नृत्य करणारी किंवा मैदानी खेळ खेळणारी असली तरी त्यांनाही असा त्रास होऊ शकतो. काहींना असा त्रास ठरावीक प्रसंगात होत नाही. म्हणजे एखाद्या सर्जनला ऑपरेशन करत असताना विचारांचा त्रास होत नाही, पण कुणाशीही अनौपचारिक गप्पा मारत असताना त्रासदायक विचार छळत राहतो. लक्ष देत असताना मेंदूतील पुढील भाग सक्रिय राहात असल्यानेच ऑपरेशन करीत असताना त्रास होत नाही. मात्र सतत असे लक्ष देणे शक्य नसते. याचसाठी अधूनमधून मनात आपोआप येणाऱ्या विचारांना प्रतिक्रिया न करता जाणणे हे कौशल्य उपयोगी ठरते. ते शालेय वयापासून शिकवायला हवे.


🖋 *डॉ. यश वेलणकर* yashwel@gmail.com

=================

*संकलन- नितीन खंडाळे*

        -चाळीसगाव

*दै_लोकसत्ता*

Monday, 22 March 2021

मानवी मेंदूची रचना व कार्य


Brain Structureप्राणीजगताच्या उत्क्रांतीमध्ये मानवाचा मेंदू सर्वात प्रगत आहे. अर्थातच मानवी मेंदूच्या उत्क्रांतीत इतर प्राण्यांच्या मेंदूच्या विकासाचे टप्पे पायाभूत आहेतच. इतर प्राण्यांच्या मेंदूच्या मूलभूत घडणीखेरीज काही नवे ‘थर’ मानवी मेंदूत आहेत. मेंदूरचनेत हे ‘थर’ स्पष्टपणे दिसून येतात. मेंदूच्या रचनेत लहान मेंदू व मोठा मेंदू ही सामान्यपणे प्रचलित विभागणी आहे. मानसशास्त्राच्या दृष्टीने तीन विभाग धरलेले आहेत.

  • मूळ मेंदू – सर्वात खालचा, चेतारज्जूशी जोडलेला ‘देठाचा’ भाग (ब्रेनस्टेम)
  • मध्यमेंदू – मधला थर (मिडब्रेन)
  • मुख्यमेंदू – वरचा थर (सेरेब्रम)

मूळ मेंदू अगदी मूलभूत शारीरिक कामांचे नियंत्रण करतो – यात श्वसन, रक्ताभिसरण, शुध्दी किंवा जाणीव, इत्यादी प्राणिजीवनाला लागणारी प्राथमिक कामे येतात. मूळ मेंदूला इजा झाल्यास बेशुध्दी, श्वसन व हृदयक्रिया थांबणे आणि मृत्यू येणे संभवते.

मध्यमेंदू हा भावना, वासना, लैंगिक इच्छा, इत्यादी नियंत्रित करतो. प्रजननासाठी लैंगिक इच्छा, स्वसंरक्षण व आक्रमण या प्राणिजीवनासाठी आवश्यक पण उत्क्रांतीतल्या नंतरच्या प्रवृत्ती आहेत. या सर्व मध्यमेंदूतून नियंत्रित होतात. हिंसा आणि लैंगिक वासना या काही ‘पाशवी’ वाटणा-या गोष्टी मध्यमेंदूत आहेत, त्यांचा वारसा प्राचीन आहे. झोपेचे केंद्रही यातच आहे.

मुख्यमेंदू हा मध्यमेंदूच्या वर, पुढे, मागे, बाजूला पसरलेला असतो. याचे डावा-उजवा असे दोन स्पष्ट भाग असतात. या दोन्ही भागांचे काम जरा वेगळे असते. डावा भाग विचारशक्ती, बोलणे, भाषा, तंत्रज्ञान, इत्यादी प्रगत कामे पार पडतो. उजवा भाग संगीत, नृत्य, भावना, जाणिवा, आध्यात्मिक उर्मी आणि अवकाशज्ञान (म्हणजे आपल्या आजूबाजूला कोठली वस्तू कोठे कशी आहे याचे ज्ञान), इत्यादी जबाबदा-या सांभाळतो. यातही मोठया मेंदूचा पुढचा कपाळातला भाग विचारशक्ती आणि सामाजिक भान सांभाळतो. या भागाला इजा झाली तर विचारशक्ती दुबळी होईल आणि सामाजिकदृष्टया अयोग्य गोष्टी त्या व्यक्तीकडून होतील (उदा. चारचौघांत लघवी करणे, नागवे होणे, इ.). मेंदूचा मानेकडचा मागचा भाग हा दृष्टीज्ञानाशी संबंधित आहे. कानाकडचा भाग ध्वनिज्ञान आणि वासाचे ज्ञान सांभाळतो. वरचा मध्यभाग शरीराची हालचाल आणि संवेदना ज्ञान सांभाळतो.

मेंदूचे काम कोटयवधी मेंदूपेशींमार्फत (चेतापेशी) चालते. या मेंदूपेशींना असंख्य टोके असतात. ही टोके आजूबाजूच्या पेशींच्या टोकांना जोडलेली असतात. या जोडणीचे स्वरूप ‘रासायनिक + विद्युत’ असे असते. एका पेशीतून निर्माण झालेला संदेश दुस-या पेशीपर्यंत असा पोहोचतो यात टोकांमध्ये असलेले ‘रासायनिक ‘ माध्यम आणि त्यातून जाणारा ‘विद्युत’ संदेश यांचा मुख्य वाटा असतो. या रासायनिक पदार्थाचे प्रमाण वाढले किंवा कमी झाले किंवा विद्युतसंदेशांमध्ये बिघाड झाला तर मेंदूचे कामकाज बिघडते. अल्झायमरच्या आजारात असाच बिघाड होतो.

एवढे आता माहीत असले तरी मन व मानसिक आजार यांबद्दल शास्त्राला अजूनही पुष्कळ कळायचे शिल्लक आहे.

संदर्भ: आरोग्यविद्या डॉट कॉम

Sunday, 21 March 2021

विचारधारा

 एखादा माणूस माझ्या मनातून उतरला की मी आयुष्यभर त्याच्याकडे ढुंकूनही बघणार नाही ह्या 

अश्या स्वतःच्या 

ग्रेट स्वभावाचा

काही लोकांना प्रचंड गर्व असतो 

म्हणूनच हा मेसेज मला सगळ्यांबरोबर शेअर करावासा वाटला ...

नाती


कधी तरी निवांत बसून आयुष्यात येऊन गेलेल्या आणि दुरावलेल्या नात्यांचा डोळसपणे अभ्यास केला की, 

लक्षात येतं की, 

असे अनेकजण ... 

ज्यांनी  "आपल्याला दुखावलं" म्हणून आपल्या आयुष्यातून आपण वजा केलं होतं ते अनेकदा समर्थनीय नव्हतंच ...


भावना दुखावल्या असं म्हणत आपण आपल्या अहंकाराला विनाकारण जोपासत बसलो 

आणि 

सोन्यासारखी माणसं आपल्या प्रतिक्षेला कंटाळून आपापल्या मार्गे निघूनही गेली. 


त्यांची एखादी कृती, 

चूक हा जणूकाही 

जन्म - मरणाचा प्रश्न बनवून 

ती हकनाक 

आपल्या अहंकाराची बळी कधी झाली 

हे कळलंच नाही. 

नाजूक नात्यांना शेवटी अहंकार नाही, 

तर मायेच्या ओलाव्याचीच गरज असते ...


आपण जसे जसे परिपक्व होत जातो तसंतसं लक्षात येतं की, 

भावना आणि अहंकार

 ह्यांच्यात असलेली 

सूक्ष्म रेषा 

योग्य वेळी जाणून वागायला हवं होतं. 

त्या माणसांनी आपल्यासाठी केलेल्या चांगल्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या होत्या. 

स्वतःच्या चुकासुद्धा आठवून 

निदान स्वतःशी तरी मान्य करायला हव्या होत्या ... 

भावना क्षमाशील असते 

तर अहंकार मात्र 

एक घाव दोन तुकडे करून मोकळा होतो ...

भावना दुखावली 

असं आपण म्हणतो 

तेव्हा खूप वेळा भावना नाही 

तर अहंकार दुखावलेला असतो ...


अगदी एखादी आनंदाची बातमी जरी कुणी आपल्याला उशिरा दिली 

तर त्या गोष्टीचं दुःख आणि राग म्हणून त्यांचं अभिनंदनही आपण केलेलं नसतं आणि हे अनेकदा घडतं ...


जगणं म्हणजे फक्त श्वास घेणं नसतं तर त्या जगण्यालाही स्वतःचं असं वेगळं रूप आणि अस्तित्व असतं ...


कुणाचंच कुणावाचून काही अडत नाही, 

पण आयुष्यात आलेली चांगली माणसं जेव्हा गैरसमजुतींमुळे दुरावतात, 

तेव्हा मात्र जर ती माणसं आपल्या आयुष्यात राहिली असती तर जगणं अजून सुंदर आणि अर्थपूर्ण झालं असतं 

असं मात्र नक्कीच वाटून जातं ... 

क्षणभंगुर आयुष्याचे लाड करताना 

आपल्या जगण्याचा दर्जा आपण राखायला हवा आणि ह्यासाठीच ते जगणं सुसंस्कृत आणि अर्थपूर्ण बनवणाऱ्या चांगल्या माणसांची ओळख आणि जोपासना करणं आणि अहंकारामुळे त्यांना न गमावणे हे जाणीवपूर्वक आपण करावं असं मनापासून वाटतं ...

बऱ्याचदा तर समोरच्या व्यक्तिच्या वागण्याचा आपण 

आपल्या मतानुसार अर्थ काढतो, 

तसा विचारही समोरच्याचा नसतो, 

तो सहज आपलं म्हणून वागत असतो ...

परंतु आपण चुकीचा अर्थ काढून समोरच्याला आयुष्यातून सहज काढून टाकतो ... 

आणि आपला अहंकार आपल्याला या गोष्टीची जाणीवही होऊ देत नाही ... म्हणून ...


कुणाची कितीही मोठी चूक असली तरी ती आयुष्यापेक्षा आणि नात्यापेक्षा मोठी निश्चितच नाही ...!!


 अप्रतिम.

आपल्या सगळ्यानाच अंतर्मुख करायला लावेल असा लेख.👌🏻👌🏻🙂

नक्की वाचा.🙏🏻

Saturday, 20 March 2021

म्हणून मी नेहमी आनंदी असतो..


मी भुतकाळ चघळत नाही

ना मी भविष्याची चिंता करतो

मी वर्तमानात जगतो

म्हणून नेहमी आनंदी असतो......


मी कुणाकडुन काडीची अपेक्षा करत नाही

मी कुणाबद्दल राग मनात 

धरत नाही

मी लगेच सगळ्यांना माफ करतो

म्हणून मी नेहमी आनंदी असतो...


मी कसलाच हव्यास आणि लोभ करत नाही

बकरीचा मी दिवसभर सारखाच 

चरत नाही

मी समाधानी राहुन  फक्त दोन वेळाच खातो

म्हणून मी नेहमी आनंदी असतो


मी हायफाय राहण्यासाठी धडपडत नाही

कोणासाठी कधीच दुःखाने

तडफडत नाही

साधं राहुन आपल्या माणसांत सुखानं रमतो

म्हणून मी नेहमी आनंदी असतो


कोण काय बोलतं ह्याचा मी कधीच विचार करत नाही

कोणी काहीही बोलल तरी 

पुन्हा मी ते स्मरत नाही

माझां जीवन स्वछंदी आहे ते

मी मजेत जगतो

म्हणून मी नेहमी आनंदी असतो...


मला पदाचा ना ज्ञानाचा अहंकार

कधी शिवला नाही

तुच्छतेचा विचार कधी

मनाला भावला नाही

पाय जमिनीवर ठेऊन प्रसंगी 

अनवाणी चालतो 

म्हणून मी नेहमी आनंदी असतो..


जगायला काहीच भौतिक सुख 

लागत नाही

म्हणून मी गर्वाने कधीच

वागत नाही

सगळ्यांशी प्रेमाने आदराने 

आपुलकीने वागतो

म्हणून मी नेहमी आनंदी असतो


जन्म शाश्वत आहे तसा मृत्यू देखील शाश्वत आहे ही जाणीव आहे

माझ्यातही दोष आहेत आणि 

काहीतरी नक्कीच उणीव 

आहे

माझ्या दोष मी रोजच पाहुन

सुधारण्याचा प्रयत्न करतो

म्हणून मी नेहमी आनंदी असतो....,......😊😊


संदर्भ : आपले मानसशास्त्र

Friday, 19 March 2021

Thursday, 18 March 2021

सुख म्हणजे काय?

 सुख म्हणजे काय? दोन परंपरा ( What is Happiness ? Two Traditions ) 


आपले कसे चालले आहे ? या प्रश्नाचे उत्तर व्यक्तिगत व अनेक पद्धतीने आपणास देता येते . चांगले जीवन म्हणजे काय ? सुख म्हणजे काय ? समाधानकारक जीवनाची व्याख्या काय आहे ? चांगले जीवन जगणे म्हणजे काय ? कोणत्या प्रकारच्या जीवनाचे आपणास मार्गदर्शन करावे असे वाटते ? लोक मला कसे आठवू शकतील ? इत्यादी प्रश्नांचे नेमके उत्तर आपणास हवे आहे. 
१. विलासी सुख ( Hedonic Happiness ) 
विलासी सुखाता सुखासक्ती सुख, ऐहिक सुख किंवा भौतिक सुख या नावानेही ओळखले जाते. विशेषतः बिलासी सुख हे इंद्रियजन्य सुख समजले जाते. सुख हेच अंतिम ध्येय असा विचारप्रवाह या सुखामध्ये मोडतो. आपल्यापैकी प्रत्येकजण दीर्घायुष्याची आशा बाळगत असतो. अपरिपक्वनामुळे एखाद्याचा शेवट होत नाही, ' आत्महत्या ' या संकल्पनेद्वारे आपणाला जीवनातील संख्यात्मकतेऐवजी जीवनातील गुणात्मकता अधिक महत्त्वाची वाटते. गुणात्मक जीवनामध्ये हर्ष / आनंद फार महत्त्वाचा आहे. प्रत्येक जण हर्षभरीत ( आनंदी ) आणि समाधानी जीवन जगण्याची आशा करतो. अशी आशा बाळगण्यानेच आपल्यातील चांगल्या गोष्टी आणि सुखदायक अनुभव आपल्यातीलच वाईट गोष्टींचा समूळ नायनाट करीत असतात. विशेषतः अमेरिकन संस्कृतीनुसार चांगल्या जीवनाची व्याख्या ही एखाद्याच्या व्यक्तिगत सुखावर अवलंबून असते ; हाच खुशालीच्या विलासी ( सुखासक्ती ) दृष्टिकोनाचा सर्वसामान्य बीजविषय आहे. विलासी तत्वज्ञानाच्या समांतर रेषेत विलासी मानसशास्त्राचे घटक सामावलेले दिसून येतात. प्राचीन ग्रीक काळापासून सुख जावज्ञानाचे अनेक प्रकार पुढे आले आहेत. विलासी सुख म्हणजे हर्ष ( आनंद ) आणि सुखाचा पाठपुरावा करणे होय , हेच जीवनाचे मुख्य ध्येय आहे. मानसशास्त्राच्या विचारधारेतून खुशालीचा दृष्टिकोन व्यक्तिनिष्ठ खुशाली मधून उदयुक्त होतो ( डायनर , १९८४ ; डायनर व इतर , १९९९ ). सुखाचा अल्पतम पाठपुरावा किंवा शारीरिक सुख या विलासी सुखासक्तीच्या संकुचित दृष्टिकोनाच्या पलीकडे जाऊन व्यक्तिनिष्ठ खुशालीकडे अधिक विस्ताराने पाहिले जाते. सुखाच्या विस्तारित दृष्टिकोनाचा व्यक्तिनिष्ठ खुशाली हा एक मर्यादित घटक आहे . ' व्यक्तिनिष्ठ खुशाली ' ( Subjective Well - Being - SWB ) म्हणजे जीवन समाधान , सकारात्मक भावविकारांची उपस्थिती आणि सापेक्षतः नकारात्मक भावविकारांची अनुपस्थिती होय . एकंदरीत, या तीन घटकांना मिळून सुखाचा संदर्भ लावला जातो. यामुळे व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये आणि जीवनानुभवातून ' कोण सुखी आहे ? काय केल्याने सुखी बनता येते ? ह्या प्रश्नांची उत्तरे मिळण्यास मदत होते . 

२. आत्मसुख ( Eudaimonic Happiness )
आत्मसुखाला स्त्र - वास्तविकीकरण, विशुद्ध सुख, वा पारलौकिक सुख असेही प्रतिशब्द आहेत. चांगल्या जीवनासाठी सुख पुरसे असते काय ? जर तुम्ही सुखी असाल तर तुम्ही तृप्त आणि समाधानी असू शकता काय ? सेलिग्मन ( २००१ अ ) यानी सूचित केलेल्या अभ्युपगमी उदाहरणांचा येथे विचार करावा लागेल. जर तुम्हाला कार्यक्षम यंत्राच्या साहाय्याने उदा. गळाच्या साहाय्याने मासा पकडतात तसे आकड्यासारखे वाकडे बांधून ठेवले तर काय होईल ? यामुळे तुम्हाला सातत्याने हर्षभरीत सुखाच्या अवस्थेत राहता येईल किंवा तुम्ही कोणत्याही सकारात्मक भावनांची इच्छा व्यक्त करीत असाल वा तुमच्या जीवनात काहीही घडले असले, तरीसुद्धा विलासी दृष्टिकोनानुसार, सदा सर्वकाळ तुम्हाला सुखाचा विपुल प्रमाणात अनुभव येत राहील. तुम्ही आकड्यासारखे बांधून ठेवलेल्या जीवनाची निवड करू शकता काय ? काही क्षणांसाठी तुम्हाला ते आवडेल ; परंतु, आपल्या पुष्कळ भावनांपैकी केवळ एक भावना आणि जीवन घटना - प्रसंगांच्या विविधतेसाठी सारखीच सुखी प्रतिक्रिया आणि आव्हाने प्रत्यक्षात जीवनानुभवांना दुर्बल करू शकतात . आपण जे काही गमावतो ते मौल्यवान असू शकते. उदा. भीतीसारख्या नकारात्मक भावना आपल्याला निवड करण्यास मदत करतात ; त्यामुळे आपल्या खुशालीऐवजी जीवनात बाधा निर्माण होऊ शकते. भीतीशिवाय आणि इतर सकारात्मक भावनेमुळे आपण वाईटातल्या वाईट गोष्टींची निवडी करीत असतो. आपण सुखी असू शकतो परंतु दीर्घकाळ शकत नाही .

संदर्भ : सकारात्मक मानसशास्त्र ; 
          डॉ. विश्वनाथ शिंदे

Wednesday, 17 March 2021

सामाजिक मानसशास्त्र

 

( सोशल सायकॉलॉजी ). सामाजिक–सांस्कृतिक संदर्भांत मानवी वर्तनाचा शास्त्रशुद्घ अभ्यास करणारी मानसशास्त्राची एक शाखा वा उपक्षेत्र. सामाजिक मानसशास्त्राची बीजे प्राचीन तत्त्ववेत्त्यांच्या लेखनातूनही आढळतात. ⇨प्लेटो आणि ⇨ ॲरिस्टॉटल ह्या तत्त्वज्ञांनी सामाजिक जीवनातील प्रश्नांचा विचार केला होता. त्यानंतर ⇨झां बॉदँ, ⇨टॉमस हॉब्ज, ⇨ जॉन लॉक, ⇨ झां झाक रुसो ह्यांनीही व्यक्ती आणि समाज ह्यांच्या संबंधांबाबत चिंतन केले होते. एकोणिसाव्या शतकात फ्रेंच तत्त्वज्ञ ⇨ऑग्यूस्त काँत ह्याने मानवाच्या सामाजिक जीवनाची रचना कशी करता येईल ह्याचा विचार केला. समाजजीवनाच्या स्थित्यंतरावरही त्याने विचार मांडले. विख्यात फ्रेंच समाजशास्त्रज्ञ ⇨एमील द्यूरकेम (१८५८–१९१७) ह्याने समूहाच्या वा सामुदायिक जाणिवेच्या अभिव्यक्तीचे तत्त्व मांडले. इंग्लंडमध्ये ⇨हर्बट स्पेन्सर ह्या तत्त्ववेत्त्याने क्रमविकासाच्या कल्पना सामाजिक विकासाला लावण्याचा प्रयत्न केला. ⇨गाबीएल तार्द (१८४३–१९०४) आणि ल बों (१८४१–१९३१) ह्या दोन सामाजिक विचारवंतांनी समाजजीवनाविषयी महत्त्वाचे लेखन केले.समाजजीवन हे मुख्यत्वेकरून अनुकरणावर अवलंबून असते, हा विचार तार्दने मांडला, तर ल बों याने समूहाच्या वर्तनाचे स्पष्टीकरण ⇨सूचन आणि सूचनक्षमता ह्यांच्या आधारे करण्याचा प्रयत्न केला. विसाव्या शतकाच्या आरंभी सामाजिक मानसशास्त्राला स्वतंत्र अभ्यासक्षेत्राचे स्थान मिळवून देणारे दोन ग्रंथ प्रसिद्घ झाले : (१)⇨ एडवर्ड ॲल्झवर्थ रॉस ह्याचा सोशल सायकॉलॉजी (१९०८) आणि (२) ⇨विल्यम मॅक्डूगल (१८७१–१९३८) ह्याचा ॲन इंट्रोडक्शन टू सोशल सायकॉलॉजी (१९०८). रॉसवर तार्दच्या अनुकरणप्रणालीचा प्रभाव होता. मॅक्डूगलने ⇨सहजप्रेरणांची प्रणाली मांडली. समूहजीवन आणि सामाजिक आंतरप्रक्रिया ह्यांचा आधार म्हणून त्याने काही सहजप्रेरणांची सूचीच दिली.माणसे आणि मानवेतर प्राणी ह्यांच्या कृतींच्या मूलचालक (प्राइम मूव्हर्स) म्हणून त्याने सहजप्रेरणांना महत्त्व दिले. सी. एच्. कुली ह्याने ह्यूमन नेचर अँड द सोशल ऑर्डर (१९०२) ह्या त्याच्या ग्रंथात व्यक्ती आणि समाज ह्यांच्यातील नात्याच्या अतूटपणाचा मुद्दा मांडला. माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास कुटुंब, बालोद्यान, प्ले ग्रू प अशा ठिकाणी कसा होतो, हे त्याने सोशल ऑर्गनायझेशन (१९०९) मध्ये दाखवून दिले. ए स्टडी ऑफ द लार्जर माइंड मध्ये शहरीकरण, जलद वाहतूक आणि संदेशवहन, औद्योगिकीकरण आणि विशेषीकरण, वर्गसंघर्ष इत्यादींचा मानवी व्यक्तिमत्त्वावर काय परिणाम होतो, ह्याचे विवेचन केले. आनुभविक (एम्पिरिकल) पद्घतीचा प्रथम वापर १९२० च्या दशकात सुरू झाला. या पद्घतींनी सामाजिक प्रभाव आणि व्यक्तिगत वर्तन यांमधील संबंधांची साधनसामग्री पुरविली. या क्षेत्रात सर्वप्रथम अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात संशोधनास सुरू वात झाली. त्यावेळेपासून सामाजिक मानसशास्त्र ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक प्रणाली वा शास्त्र म्हणून विकासित झाले. साहजिकच अमेरिकेतील संशोधकांचा या क्षेत्रावर अधिकतर प्रभाव जाणवतो. माणसाच्या भोवतालचा परिसर जसा भौतिक, तसा सामाजिक आणि सांस्कृतिकही असतो. व्यक्तीचा समाजातील अन्य व्यक्तींशी वा व्यक्तिसमूहांशी संपर्क येत असतो. त्यांच्याशी व्यक्तीच्या आंतरक्रिया (इंटरॲक्शन्स) होत असतात. त्या व्यक्तींची काही एक संस्कृतीही असतेच. त्यांची मूल्यव्यवस्था, जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोण, रीतिरिवाज, विधिनिषेध, जीवनशैली ह्या संस्कृतीचा भाग असतात. ह्या साऱ्यांचा व्यक्तीवर काही प्रभावही पडत असतो. अशा सामाजिक–सांस्कृतिक आंतरक्रियांमधूनच व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होत असते.

आयुष्य संपवण्याचे विचार मनात कसे येतात आणि ते कसे रोखावेत?

        आत्महत्या हा अनेक दशके आपल्या समाजात दुर्लक्षलेला विषय राहिला आहे. सुशांत सिंग राजपूत, जिया खान, भय्यूजी महाराज अशा व्यक्तींच्या आत्...